Shikshak Din Shubhecha Marathi : शिक्षण म्हणजे उत्तम भविष्याचा पाया, तर शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना योग्य दिशा देणारा शिल्पकार. लॉकडाऊनच्या काळात अनेक गोष्टींना कुलूप लागले; पण शिक्षणाचा दरवाजा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी खुला राहिला. कितीही तंत्रज्ञान आले तरी शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शिकवण आजही प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसते आहे, त्यामुळे या शिक्षण संस्थेत प्रत्येक शिक्षकाचा खूप मोलाचा वाटा आहे; तर शिक्षक दिनानिमित्त शाळा-कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांबरोबरच ट्युशन, घरगुती किंवा सार्वजनिक क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रत्येक शिक्षकाचेही आपण आभार मानून त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या पाहिजेत.

अलीकडे कोणताही सण उत्सव म्हटलं की, त्याच्या ऑनलाइन शुभेच्छा देणं हा महत्त्वाचा भाग ठरतो. सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या मराठी शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आपल्यासाठी काही खास Whatsapp Status, Facebook, Instagram Story वर पोस्ट करता येतील असे HD images घेऊन आलो आहोत, तर आजच ते आपल्या फोनवर सेव्ह करा आणि तुमच्या शिक्षकांना आठवणीने शेअर करा.

‘शिक्षक दिना’च्या मराठीतून द्या शुभेच्छा! (Teacher’s Day Wishes In Marathi) :

विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देणाऱ्या सर्व शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

shikshan din shubhecha

ज्ञानाचा सागर आणि मार्गदर्शनाचा प्रकाश
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देणाऱ्या सर्व शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

उत्तम शिक्षक तुम्हाला उत्तर देत नाहीत,
तुम्हाला स्वतः उत्तर शोधण्यासाठी तयार करतो
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

teachers day

आज कितीही वाढला असो AI चा प्रभाव,
शिक्षकांशिवाय विद्यार्थ्यांचं भविष्य नाही घडणार!
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्यांनी दिले भरपूर ज्ञान
त्यांचा करू या आज खास सन्मान
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

teachers day and shikshak din

आज कितीही असो तंत्रज्ञानाचा प्रभाव
शिक्षकांच्या शिकवणीशिवाय विद्यार्थ्यांच्या भविष्याला नाही आकार!

एक पुस्तक, एक पेन, एक शिक्षक
संपूर्ण जग बदलण्याची असते यांच्यामध्ये ताकद
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

शिकवला धडा
कविता करून घेतली पाठ
आयुष्याच्या परीक्षेत पास होण्यासाठी
तुमच्यासारख्या शिक्षकांचा
नेहमीच असतो आमच्या पाठीशी हात!
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

teachers day celebration

गिरवला ज्ञानाचा खडू
वाचला शिस्तीचा धडा
अक्षरांनी घडवलं भविष्य
असा शिक्षक मिळणं विद्यार्थ्यांचं असतं भाग्य
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरुविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान,
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

साक्षर आम्हास बनवले
जीवन काय आहे ते समजावले
बरोबर-चूक ओळखायला शिकवले
असे शिक्षक आम्हास लाभले
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!