Shilpa Shetty Yoga Tips: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नुकताच एका आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पाय फ्रॅक्चर झाला. या दुर्घटनेनंतर सहा आठवड्यांसाठी डॉक्टरांनी तिला आराम करण्याचा सल्ला दिला होता. शिल्पाने आपल्या सर्व नियमित जबाबदाऱ्यांमधून ब्रेक घेतला असला तरी आपली फिटनेसची आवड तिने या अवस्थेतही जपली आहे. पायाला फ्रॅक्चर असताना व्हीलचेअर वर बसून योगा करतानाचे व्हिडीओ शिल्पाने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहे. या आसनांमुळे आपल्याला पायाचे फ्रॅक्चर भरून निघण्यास मदत होत असल्याचे सुद्धा शिल्पाने पोस्टमध्ये म्हंटले आहे. पायाचे स्नायू भरभक्कम करण्यासाठी नक्की कोणती आसने करावीत हे आज आपण शिल्पाच्या पोस्टमधून जाणून घेऊयात ..

शिल्पा शेट्टीने सांगितली गुडघेदुखी असणाऱ्यांसाठी आसने

पर्वतासन: मन आणि शरीराला शांती, सामर्थ्य आणि ऊर्जा प्रदान करणारे हे सर्वात सोपे आणि प्रभावी योगासन आहे. त्याला ‘माउंटन पोझ’ असेही म्हणतात. जर आपण सूर्यनमस्कार करत असाल तर तुम्हाला हे आसन ओळखीचे वाटेल. डोक्यावर नेलेले हात हे निमुळत्या होत गेलेल्या पर्वताच्या टोकाप्रमाणे भासतात. म्हणून या आसनाला ‘पर्वतासन’ असे म्हणतात.

sugarcane juice selling Business
Viral Video: लय भारी जुगाड! दुकानदाराने ऊसाचा रस थंड राहण्यासाठी बिना बर्फाचा केला भन्नाट जुगाड; दुकानावर झाली गर्दीच गर्दी
how to get rid of house rats tips
Cleaning tips : घरातील उंदरांना पळवून लावण्यासाठी ‘गव्हाचा’ करा वापर! पाहा या दोन टिप्स…
loksatta analysis report on status of leopards in india
विश्लेषण : बिबटे वाढलेत… शेतात, गावच्या वेशीवर आणि सिमेंटच्या जंगलातही!
beauty tips in marathi get rid of dark neck
Beauty tips : मानेवरील काळपटपणा घालवण्यासाठी काय करावे, काय नको? पाहा ‘या’ टिप्स

उत्थिता पार्श्वकोनासन: हे योगासन आरोग्य आणि हृदयासाठी चांगले आहे कारण ते हृदयाच्या स्नायूंना पुरेसा व्यायाम व लवचिकता प्रदान करते. गुडघ्याला दुखापत, कमकुवत स्नायू यांसारख्या पायांच्या समस्या दूर करण्यातही याची मदत होते.

भारद्वाजासन: या आसनाच्या नियमित सरावाने पचनक्रिया सुधारते. भारद्वाजाच्या ट्विस्टमुळे नितंबाची लवचिकता वाढते, पाठीचा कणा मजबूत होतो, अंतर्गत अवयवांची मालिश होते आणि संधिवाताच्या वेदना कमी होतात

शिल्पा शेट्टी इंस्टाग्राम

शिल्पाने पोस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्यांना जमिनीवर बसता येत नाही, गुडघेदुखी किंवा पाठदुखीचा त्रास होत असेल ते खुर्चीवर बसून सुद्धा ही आसने करू शकतात. ही आसने पाठीचा कणा आणि पाठीच्या स्नायूंची लवचिकता मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहेत. तुमच्या शरीराची हालचाल झाल्याने आजारपणात अपचनाचा त्रास जाणवणार नाही. तथापि, गरोदरपणात तिसरी मुद्रा ‘भारद्वाजासन (ट्विस्टिंग पोझ)’ टाळली पाहिजे.