Shiv Jayanti 2026 Wishes in Marathi: छत्रपती शिवाजी महाराज हे १७ व्या शतकातील एक महान शूर वीर आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. बालपणापासूनच त्यांनी शौर्य, रणनीती आणि नेतृत्वाची कला आत्मसात केली. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी अथक परिश्रम केले आणि अनेक किल्ले जिंकून मराठा साम्राज्याची स्थापना केली. ते केवळ युद्धकौशल्यासाठीच नाही, तर न्यायप्रिय प्रशासन, सैनिकांच्या कल्याणासाठी धोरणे आणि नागरिकांसाठी विकासकामे करण्यासाठीही ओळखले जातात.

दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी केली जाते. या दिवशी भारतभरात, विशेषतः महाराष्ट्रात, स्मरण सभा, शौर्यदर्शक कार्यक्रम, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. ही जयंती शिवाजी महाराजांच्या शौर्य, कर्तृत्व, दूरदर्शी नेतृत्व आणि स्वराज्यस्थापनेच्या आदर्शांना उजाळा देण्याचा एक मार्ग आहे. या दिवशी सोशल मीडियावर शिवजयंतीच्या शुभेच्छा दिसून येतात. चला तर मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक शिवप्रेमीला, मित्रपरिवाराला खास शुभेच्छा पाठवूया आणि शिवरायांना अभिवादन करूया…

शिवजयंतीच्या खास शुभेच्छा… (Shiv Jayanti Wishes in Marathi)

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti marathi wishes

निधड्या छातीचा, दणकट कणांचा,
मराठी मनांचा, भारत भूमीचा एकच राजा…
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti

श्वासात रोखुनी वादळ,
डोळ्यांत रोखली आग,
देव आमचा छत्रपती,
एकटा मराठी वाघ!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

shivjayanti marathi wishes
Shiv Jayanti Marathi Wishes

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त
सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!
जय जिजाऊ, जय शिवराय!

Shiv Jayanti Wishes marathi
Shiv Jayanti Wishes Marathi

स्वराज्याचे बांधून तोरण,
शत्रूंना आणले शरण,
देशाला आहे त्यांचा अभिमान,
छत्रपती शिवरायांचे गाऊया गुणगान!

Shiv Jayanti 2026 Wishes
Shiv Jayanti 2026 Wishes

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा फोटो (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Photo Marathi)

इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर,
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणाऱ्या राजाला म्हणजे राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

शिवराय म्हणजे धैर्याची मूर्ती,
शिवराय म्हणजे प्रेरणेची गाथा,
शिवराय म्हणजे हिंदवी स्वराज्याचा नवा प्रकाश!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

जगणारे ते मावळे होते,
जगणारा तो महाराष्ट्र होता,
पण स्वत:च्या कुटुंबाला विसरून
जनतेवरून मायेने हात फिरवणारा,
राजा छत्रपती होता
शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

जिजाऊच्या पोटी बाळ शिवबा जन्मला
शिवनेरी किल्ल्यावर माझा भगवा फडकला
नाही जगात दुसरा कोणी माझ्या छत्रपतीवानी
नाही होणार दुसरा कोणी माझ्या छत्रपतीवानी
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

माझ्या रक्ताने धुतले जरी तुमचे पाय,
तरी तुमचे माझ्यावरचे उपकार फिटणार नाय,
धन्य धन्य माझे शिवराय
जय जिजाऊ, जय शिवराय!