तुम्ही शहरात राहत असाल आणि ओला किंवा उबेर आणि इतर अॅप्स वापरून ऑटो बुक करत असाल तर तुम्हाला आता तुमचा खिसा हलका करावा लागेल. कारण पुढील वर्षापासून ओला किंवा उबेरसारखे अॅप वापरणे महाग होणार आहे. या सेवांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला १ जानेवारी २०२२ पासून ५% GST भरावा लागेल. सरकारने जाहीर केले आहे की ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे ऑफर केलेल्या ऑटो-रिक्षा ५% GST अंतर्गत येतील. अर्थ मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, इंटरनेट प्लॅटफॉर्मवर प्रवासी वाहतूक सेवा देणाऱ्या ऑटो-रिक्षांना जीएसटी सूट महसूल विभागाने रद्द केली आहे. त्याचबरोबर ऑफलाइन ऑटो-रिक्षाच्या सेवेवर जीएसटी भरावा लागणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणत्याही ऑनलाइन मार्केटप्लेसद्वारे प्रदान केलेल्या माहितीनुसार, सेवा १ जानेवारी २०२२ पासून ५% दराने कर-सवलतीच्या अधीन असतील. या नव्या दुरुस्तीचा थेट परिणाम ई-कॉमर्स उद्योगातील कंपन्यांवर होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कारण आजच्या काळात ऑनलाइन ऑटो सेवा मोठ्या ते लहान शहरांमध्येही वापरली जात आहे. सवारीसाठी सोयीची व्यवस्था म्हणून त्याचा वापर केला जात आहे. प्रवासी वाहतूक सेवा सुविधेसाठी ई-कॉमर्स व्यवसायाने बाजारपेठेत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shock to those who book autos with ola and uber rent will be expensive will have to pay 5 percent gst scsm
First published on: 27-11-2021 at 16:40 IST