Eating Sweets And Drinking Water: अनेकांना मिठाई खायला आवडते. पण अनेकजण मिठाई खाल्ल्यानंतर लगेच पाणी पितात. तुम्ही सुद्धा असं करत असाल तर आजचं थांबवा. दक्षिण अमेरिकेतील सुरीनाम मधील शास्त्रज्ञांनी फक्त मिठाई खाणाऱ्या आणि पाण्यासोबत मिठाई खाणाऱ्या लोकांच्या ब्लड शुगर लेव्हलचे विश्लेषण केले आणि असे आढळले की ज्यांनी मिठाई पाण्यासोबत खाल्ली त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी जास्त आहे.
एका संशोधनानुसार, तुम्ही जितके जास्त पाणी प्याल, तितकेच कमी साखर आणि सॅच्युरेटेड फॅट असलेले पदार्थ खाल. परंतु आता एका नवीन अभ्यासात असे समोर आले की, मिठाई खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी प्रचंड वेगाने वाढू शकते. अँटोन डी कॉम युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात फक्त डोनट्स खाणे समाविष्ट होते, परंतु हेच तत्व इतर गोड पदार्थांना देखील लागू होते.
गोड पदार्थ खाल्ल्यानंतर तहान का लागते?
हे ग्लुकोजमुळे होते. गोड पदार्थांमध्ये असलेले ग्लुकोज पचण्यास वेळ लागतो. त्यामुळे द्रव पदार्थ आतड्यात पोहोचत नाही. त्यामुळे तुम्हाला तहान लागते. यावेळी जर तुम्ही पाणी प्याल तरी तुमची तहान भागणार नाही. तुम्हाला पुन्हा पुन्हा तहान लागत राहील. तुमच्या शरीरातील सर्व ग्लुकोज संपेपर्यंत तुम्हाला तहान लागत राहील.
( हे ही वाचा: लघवीमध्ये कॅल्शियम वाढल्यास होऊ शकतो Kidney Stone; चुकूनही ‘या’ पदार्थांसोबत मीठ खाऊ नका)
पाचन तंत्र कसे कार्य करते?
जेव्हा तुम्ही खाण्यास सुरुवात करता तेव्हा तोंडातील लाळ ग्रंथी तयार होऊ लागतात. ज्यामध्ये एंजाइम असतात. जे खाण्याची क्रेविंग्स कमी करण्यास मदत करते. आम्लयुक्त जठरासंबंधी रस मिसळून पोटात जाड द्रव तयार होतो. द्रवपदार्थ लहान आतड्यात जातात आणि पोषक द्रव्ये शोषली जातात. रक्तातील पोषक घटक वेगवेगळ्या भागात जातात. उरलेले पदार्थ बाहेर आल्यावर पचनक्रिया थांबते. पचन प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी २४ ते ७२ तास लागतात. पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थांचे नियमित सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे.