बदामामध्ये आरोग्यास पोषकघटकांचा समावेश असल्यानं डॉक्टर आपल्याला त्याचे नियमित सेवन करण्याचा सल्ला देतात. आकारानं छोट्या असलेल्या या सुकामेव्याचे शरीराला होणारे फायदे आश्चर्यकारक आहेत. यात प्रथिने, फायबर, चरबी, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, तांबे, फॉस्फरस आणि बरंच काही असतं. हे वजन कमी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी सुद्धा बदाम उपयुक्त असतात.

बदाम कसे खावेत त्यासोबतच एका दिवसामध्ये किती बदाम खावेत याचा ही विचार करणे गरजेचं आहे. बदामांचे सेवन नियमित केल्याने हृदय, मेंदू, त्वचा आणि केसांशी संबंधित विकार दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर बदामाचे सेवन मधुमेह, खोकला, अनिमिया, श्वसनरोगामध्येदेखील फायद्याचे आहे. बदामाच्या सेवनाने पचनशक्ती आणि शरीराच्या मेटाबोलिक रेटमध्ये सुधार होतो. तसंच वजन घटविण्यासाठी देखील बदामाचे सेवन फायदेशीर आहे. पण बहुतेक व्यक्तींना एका दिवसामध्ये किती बदाम खाल्ले जावेत ह्याची कल्पना नसते.

bird flu precautions in marathi, bird flu precautions marathi news
Health Special: बर्ड फ्ल्यूची भीती नको पण काळजी आवश्यक
Simple bathroom tiles cleaning tips
बाथरूमची डाग पडलेली, बुळबुळीत फरशी ठेवा स्वच्छ! कपड्यांचा साबण अन् ‘हे’ पदार्थ ठरतील उपयुक्त…
agility training exercises in marathi, agility training importance marathi news, agility training important for everyone marathi
Health Special: ‘अजिलिटी ट्रेनिंग’ प्रत्येकासाठी का महत्त्वाचं?
summer drinks recipes make cool dragon fruit juice know the refreshing drink recipe
उन्हाळ्यात ड्रॅगन फ्रूटपासून फक्त 5 मिनिटांत बनवा थंडगार ज्यूस; नोट करा रेफ्रिशिंग रेसिपी

आहार तज्ज्ञांच्या मते, तुम्ही राहत असलेल्या ठिकाणचे हवामान, दिवसभरामध्ये तुम्हाला शारीरिक श्रम किती होतात, यावर बदामाचे सेवन अवलंबून असायला हवे. जर तुम्ही उष्ण हवामानाच्या ठिकाणी रहात असाल, तर एका दिवसामध्ये पाच ते सहा बदामाचे सेवन करावे. त्याचबरोबर शारीरिक श्रम जास्त होत असतील दररोज आठ ते दहा बदाम खाणे योग्य आहे. बदामाच्या अतिरिक्त सेवनाचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात. यामध्ये बद्धकोष्ठ, काही प्रकारचे त्वचा रोग, अत्याधिक प्रमाणामध्ये घाम येणे अश्या प्रकारचे दुष्परिणाम बदामाच्या अति सेवनाने होऊ शकतात.

मॅक्स हेल्थकेअरच्या प्रादेशिक प्रमुख-आहारतज्ज्ञ रितिका समद्दर यांच्या मतांनुसार, एका दिवसात 1 औंस किंवा २८-२३० ग्रॅम बदाम म्हणजेच २२-२३ बदाम खावेत.

रितिका म्हणाल्या की, उत्तर आरोग्यासाठी बदाम उपयुक्त आहेतच. एका अभ्यासानुसार, बदामावर स्नॅक खालल्याने पोटाची चरबी आणि कंबरेचा घेर कमी होण्यास मदत होते. दररोज मूठभर बदाम खाल्ल्याने हृदयाच्या आरोग्यासह वजन संतुलित राहते.

यासोबतच आहारतज्ज्ञ रितिका यांनी बदाम खाण्यासंदर्भात सर्व गैरसमज दूर केले आहेत.

गैरसमज: बदामांमध्ये कोलेस्टेरॉल असतं.
तथ्य: बदाम कोलेस्टेरॉलमुक्त असतात. त्यांच्यात शून्य कोलेस्टेरॉल आहे. वनस्पती उत्पादनांमध्ये कोलेस्टेरॉल नसते. बदाम खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात आणि हृदय रुग्णांसाठी प्रभावी आहेत.