Water Drinking Time: पाणी पिण्याचीही योग्य वेळ आणि योग्य पद्धत असते. जर पाणी पिण्याबाबत छोट्या-मोठ्या चुका केल्या तर त्याचा आरोग्याला फायद्यापेक्षा जास्त तोटा होऊ शकतो. त्यामुळे अनेकांना आंघोळ केल्यानंतर लगेच पाणी प्यावे की नाही, याबाबत संभ्रम असतो. चला जाणून घेऊया, आंघोळीनंतर पाणी पिणे शरीरासाठी फायदेशीर आहे की नुकसानकारक.

आंघोळीनंतर पाणी प्यावे की नाही?

असे म्हटले जाते की आंघोळीनंतर पाणी प्यायल्याने पचनशक्ती कमकुवत होते किंवा शरीरातील ऊती (टिश्यू) कमकुवत होतात. मात्र, ही माहिती योग्य नाही. वैद्यकीयदृष्ट्या पाहिले तर आंघोळीनंतर पाणी प्यायल्याने शरीराला आवश्यक पाणी मिळते आणि त्याचा कोणताही अपाय होत नाही.

पाण्याच्या तापमानाची काळजी घेणे गरजेचे

पाणी पिताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आंघोळीनंतर खूप थंड पाणी प्यायल्यास तब्येत बिघडू शकते आणि शरीराला तात्पुरता धक्का बसू शकतो.

कसे पाणी प्यावे?

आंघोळीनंतर पाणी पित असाल तर खोलीच्या तापमानाचे किंवा थोडे थंड पाणी पिऊ शकता. त्यामुळे शरीराला योग्य प्रमाणात पाणी मिळते.

आंघोळीनंतर किती वेळाने पाणी पिणे योग्य?

आंघोळ होताच लगेच पाणी पिणे टाळावे. त्याऐवजी आंघोळीनंतर १५ ते २० मिनिटांनी पाणी पिणे अधिक योग्य मानले जाते. खोलीच्या तापमानाचे पाणी पिऊ शकता. थोडे थंड पाणीही चालेल, पण ते खूप थंड नसावे याची काळजी घ्या.

बसून पाणी प्या

पाणी पिण्याची योग्य पद्धतही महत्त्वाची आहे. उभे राहून पाणी पिण्याऐवजी बसून पाणी प्या. बसून पाणी प्यायल्याने मज्जासंस्था (नर्व्हस सिस्टिम) आणि स्नायू रिलॅक्स राहतात.

या वेळी नक्की प्या पाणी

तज्ज्ञांच्या मते, सकाळी उठल्यानंतर खोलीच्या तापमानाचे किंवा कोमट पाणी पिणे फायदेशीर असते. त्यामुळे शरीरातील घाण आणि विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते तसेच पोटही चांगल्या प्रकारे साफ होते.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)