scorecardresearch

कॉफी प्यायल्याने होणार नाही ‘हे’ आजार, पण अतिसेवन आरोग्यासाठी ठरेल नुकसानदायी

टाईप २ मधुमेह, कर्करोग आणि फॅटी लिव्हर यासारख्या गंभीर आजारांमध्ये कॉफी पिणे फायदेशीर ठरू शकते, असे काही संशोधनातून समोर आले आहे.

कॉफी मर्यादित प्रमाणात पिण्याचा फायदा असला तरी त्याचा जास्त सेवन हानिकारक ठरू शकतो. (photo credit: file photo)

सकाळी उठल्यावर अनेकांना ताजेतवाने वाटण्यासाठी तसेच दिवसाची सुरुवात उत्तम होण्यासाठी कॉफीचे सेवन करतात. याच्या सेवनाने शरीरात झटपट ऊर्जा येते आणि चांगले वाटते. तर टाईप २ मधुमेह, कर्करोग आणि फॅटी लिव्हर यासारख्या गंभीर आजारांमध्ये कॉफी पिणे फायदेशीर ठरू शकते, असे काही संशोधनातून समोर आले आहे. कॉफी मर्यादित प्रमाणात पिण्याचा फायदा असला तरी त्याचा जास्त सेवन हानिकारक ठरू शकतो.

निरोगी राहण्यासाठी कॉफी प्या

तज्ज्ञांच्या मते, उकळलेल्या कॉफीमध्ये कॅफेस्टोल आणि काहवेओल नावाचे नैसर्गिक तेल असते, जे शरीरातील कोलेस्ट्रॉलची निर्मिती कमी करते, सध्याच्या युगात फिल्टर केलेली कॉफी देखील खूप वापरली जाते. हे खास पेय एका दिवसात किती प्यावे हे जाणून घेऊया.

१ ते 3 कप कॉफी पिण्याचे फायदे

तज्ज्ञांच्या मते, एक कप कॉफीमध्ये सुमारे १०० मिलीग्राम कॅफीन असते, जे शरीराच्या आतड्यांसंबंधी हालचाल करण्यास मदत करते. यामुळे थकवा दूर होतो. त्याच वेळी २ कप कॉफी प्यायल्याने लोकांच्या व्यायामाची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात सुधारते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. याशिवाय 3 कप कॉफी प्यायल्याने हृदयरोगाचा धोका १२ टक्क्यांनी कमी होतो.

तुम्ही ४ ते ६ कप कॉफीचे सेवन केल्याने काय होते?

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, दररोज ४ कप कॉफी प्यायल्याने नॉन-अल्कोहोल रोगाचा धोका १९ टक्क्यांनी कमी होतो. त्याच वेळी, ५ कप कॉफीचे सेवन केल्याने टाइप २ मधुमेहाचा धोका सुमारे 29 टक्क्यांनी कमी होतो.

कधीही जास्त कॉफी पिऊ नका

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक धोकादायक असतो असे म्हणतात. कॉफीचे जास्त सेवन केल्यास झोप न लागणे, अस्वस्थता, पोट खराब होणे, उलट्या होणे, डोकेदुखी, हृदय गती वाढणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

(टीप: वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Side effects of consuming coffee how many cups should be safe to drink per day scsm

ताज्या बातम्या