Signs You Are Using the Wrong Face Wash: जर चेहरा धुल्यानंतरही तुमची त्वचा स्वच्छ, ताजी आणि मऊ वाटत नसेल, तर दरवेळी धुळ, माती किंवा प्रदूषणाला दोष देणे योग्य नाही. अनेकदा ही समस्या तुमच्या फेसवॉशमध्येच दडलेली असू शकते. चुकीच्या स्किन टाईपसाठी वापरलेला फेसवॉश त्वचेचा नैसर्गिक ओलावा कमी करू शकतो.
त्यामुळे केवळ फेसवॉश किती फेस (झाग) तयार करतो किंवा चेहरा किती ‘क्लीन’ वाटतो हे पाहणे पुरेसे नाही. आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार आणि गरजेनुसार योग्य प्रॉडक्ट निवडणे जास्त महत्त्वाचे आहे. तुमचा फेसवॉश तुमच्या त्वचेसाठी योग्य आहे की नाही, हे कोणत्या लक्षणांवरून ओळखायचे ते जाणून घेऊया.
फेसवॉश तुमच्या त्वचेसाठी योग्य नाही हे कसे ओळखाल?
चेहरा धुल्यानंतर त्वचा ताणल्यासारखी वाटणे:
फेसवॉश वापरल्यावर लगेचच त्वचा खूप जास्त ताणली गेलेली किंवा कोरडी वाटत असेल, तर याचा अर्थ तो क्लिंझर तुमच्या त्वचेसाठी गरजेपेक्षा जास्त कडक (हार्ड) आहे.
त्वचा खूप जास्त ड्राय होणे:
चेहरा धुल्यानंतर वारंवार त्वचेवर कोरडेपणा, खवले किंवा ड्राय पॅचेस दिसत असतील, तर वापरत असलेल्या फेसवॉशकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
चेहरा धुल्यानंतर जळजळ किंवा लालसरपणा:
फेसवॉश लावल्यानंतर जळजळ, बोचल्यासारखे वाटणे किंवा लालसरपणा येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. एखाद्या विशिष्ट घटकाची (ingredient) ॲलर्जी हे याचे कारण असू शकते.
त्वचा आधीपेक्षा जास्त तेलकट होणे:
काही वेळा त्वचेतील नैसर्गिक तेल पूर्णपणे निघून गेल्यामुळे त्वचा अस्वस्थ होते आणि काही लोकांमध्ये नंतर चेहरा अधिक तेलकट दिसू लागतो.
छोटे-छोटे पुरळ किंवा पिंपल्स येणे:
नवीन फेसवॉश वापरण्यास सुरुवात केल्यानंतर सतत पुरळ, खाज किंवा जळजळ वाढत असेल, तर त्याचा वापर थांबवून त्वचारोग तज्ज्ञांचा (Dermatologist) सल्ला घेणे योग्य ठरेल.
त्वचेच्या प्रकारानुसार असा निवडा फेसवॉश:
ऑयली स्किन (तेलकट त्वचा): लाइट आणि नॉन-कॉमेडोजेनिक क्लिंझर फायदेशीर ठरू शकतो.
ड्राय स्किन (कोरडी त्वचा): असा क्लिंझर निवडा जो त्वचेला गरजेपेक्षा जास्त ड्राय करणार नाही.
सेंसिटिव्ह स्किन (संवेदनशील त्वचा): कमी सुगंध असणारा आणि सौम्य (जेंटल) फॉर्म्युला असलेला क्लिंझर उत्तम पर्याय आहे.
कॉम्बिनेशन स्किन: असा प्रॉडक्ट निवडा जो त्वचेला खूप जास्त ड्राय किंवा जास्त तेलकट बनवणार नाही.
