Cooler Electricity Saving Tips: उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे गारव्यासाठी पंखे, कूलर किंवा एसी वापरण्याचं प्रमाण वाढलं आहे. या उपकरणांमुळे विजेचा वापर वाढतो आणि वीजबिल जास्त येतं. अशा स्थितीत वीज वाचवण्याकरिता अनेक प्रयत्न केले जातात. पण, काळजी करू नका. कूलरमुळे येणारे वीजबिल कसे कमी करता येईल, यावर एका गृहिनीने भन्नाट जुगाड दाखविला आहे. या जुगाडाचा वापर करून तुम्ही विजेची बचत करू शकता.
गृहिणींकडे बरेच घरगुती जुगाड असतात. काही गृहिणी याचे व्हिडीओ करून, ते सोशल मीडियावर पोस्ट करतात. दरम्यान, असाच एक जुगाड दाखवणारा अनोखा व्हिडीओ एका महिलेने शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. उन्हाळ्यात कूलरपासून येणारे वीजबिल कसे कमी करता येईल, यावर एका महिलेने भन्नाट जुगाड दाखविला आहे. हा जुगाड तुमच्या कामी येऊ शकतो. केलेला जुगाड पाहून तुम्ही थक्क होऊन जाल. एका गृहिणीने या जुगाडाचा शोध लावला असून, या अनोख्या जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गृहिणीने कूलरचा वापर अधिक प्रभावी करण्यासाठी एक भन्नाट आणि अतिशय सोपा जुगाड शोधून काढला आहे. प्लास्टिकच्या बाटलीचा वापर करून कूलर लवकर थंड हवा देईल आणि विजेची बचतही होईल, असा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. सध्या हा जुगाड सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, अनेक जण हा उपाय करून पाहत आहेत.
नेमकं काय करायचं?
कूलर सुरू करण्याच्या आधी खोलीतील पंखा सुरू करा. त्यामुळे खोलीतील गरम हवा बाहेर जाईल आणि त्यानंतर पंखा बंद करा, असे गृहिणीने सांगितले. गृहिणीने व्हिडीओमध्ये दाखवल्यानुसार, एक प्लास्टिकची बाटली घेतली आहे. या प्लास्टिकच्या बाटलीमध्ये पाणी घेऊन कूलरच्या मागे असलेल्या गवताच्या जाळीवर प्लास्टिकच्या बाटलीमधील पाणी हळूहळू टाका. पाणी टाकल्याने सुकलेले गवत ओले होईल. त्यामुळे कूलरला जाळी ओली करायला जास्त वेळ लागणार नाही आणि कूलर लवकर थंड हवा देईल. त्यामुळे तुमच्या विजेचीही बचत होईल, असा दावाही महिलेने केला आहे.
Avika Rawat Foods या यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करून पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का, ते आम्हाला कमेंट करून कळवा.
येथे पाहा व्हिडीओ
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)
