एका सोप्या चाचणीच्या सहाय्याने मानेच्या कर्करोगाचे निदान होत असल्याचे शास्त्रज्ञांनी सिध्द केले आहे. व्यक्तिच्या रक्तामधील उष्णतेच्या (प्लाजमा थर्मोग्राम) सहाय्यानेच या कर्करोगाचे निदान होऊन त्याची तिव्रता समजत असल्याचा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे.
निखोला गार्बेट यांच्या मार्गदर्शनाखाली अमेरिकेतील लुईसव्हिल विद्यापीठातील संशोधकांनी काही प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तिला मानेचा कर्करोग आहे किंवा नाही याचे निदान करण्याचा शोध लावला आहे.
या संशोधनामध्ये रक्ताचा नमुना विरघळवून त्या संबंधित व्यक्तिची आरोग्य स्थिती दर्शविणाली जाते. या चाचणीमध्ये प्लाजमा थर्मोग्राम मिळवण्यासाठी रक्ताचा नमुना विरघळवण्यात येतो. त्यामध्ये रक्तात असलेल्या प्रथिनांची वास्तविकता समोर येते. भिन्न उष्णतामापनाच्या सहाय्याने रक्ताचे सूक्ष्म विश्लेषण केलेल जाते. रक्ताच्या नमुन्यामध्ये कर्करोगाचा अंश असल्यास त्याचा परिणाम थर्मोग्रामवर होत असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. या संशोधनाच्या सहाय्याने वेळीच निदान झाल्यामुळे पुढील उपचार करणे सोपे होणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.