हिवाळ्याचा ऋतूची चाहूल लागली आहे त्यामुळे बाजारात आता आरोग्याचा खजिना असलेला शिंगाडा दिसत आहे. चवीला कुरकुरीत आणि पोषक तत्वांनी समृद्ध असलेला शिंगाडा फक्त पोटाच्या गंभीर समस्यांपासून सुटका देत नाही तर शरीराला सुस्ती आणि थकव्यापासून सुटका देतो. जर तुम्हाला हिवाळ्यात भरपूर उर्जा हवी असेल आणि पचन क्रिया तंदरुस्त ठेवू इच्छित असाल तर शिघांडा तुमच्या डाएटचा महत्वाचा भाग ठरवू शकता.

आदर्श आयुर्वेदिक फार्मसी, हरिद्वारामध्ये आयुर्वेदिक डॉक्टर दिपक कुमार यांच्या मतानुसार, शिंगाडा आरोग्य सुधारण्यासाठी आणि उर्जा वाढवण्यासाठी हिवाळ्यात आदर्श फळ आहे. हिवाळ्यात आपण कमी पाणी पितो आणि शरीरामध्ये निर्जलीकरणाचा धोका वाढतो अशा स्थितीमध्ये शिंगाड्याचे सेवन केल्याने शरीराला पाण्याची पातळी टिकून राहते आणि शरीराला थकवा जाणवत नाही.

१०० ग्रॅम शिंगाड्यामध्ये कोणते पोषकत्व असतात? (What nutrients are in 100 grams of Water Chestnut?)

  • १०० ग्रॅम शिंगाड्यामध्ये उपलब्ध असलेले पोषकतत्व –
  • उर्जा (कॅलरी) – १३१
  • चरबी (फॅट) – १.४ ग्रॅम
  • संतृप्त चरबी (सॅच्युरेडेट फॅट) – ०.३ ग्रॅम
  • कोलेस्ट्रॉल – ० मिलीग्रॅम
  • सोडियम – २७ मिलीग्रॅम
  • पोटॅशिअम – ७१५ मिलीग्रॅम
  • कर्बोदके (कार्बोहाइड्रेट): २८ ग्रॅम
  • प्रोटीन: २ ग्रॅम
  • याशिवाय, शिंगाड्यात व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम यांसारखी पोषक तत्वे देखील आढळतात.
Water Chestnut
शिंगाड्याचे पोषकतत्व (फोटो सौजन्य – AI)

हिवाळ्यात शिघांडा खाण्याचे फायदे (Water Chestnut Benefits in Marathi)

शरीराला मिळते भरपूर उर्जा (The body receives plenty of energy)

शिंगाडामध्ये असलेले कर्बोदके आणि आवश्यक खनिजे शरीराला उर्जा देण्यासाठी मदत करते. USDAआणि पोषण विज्ञानाच्या अभ्यासानुसार, १०० ग्रॅम कच्चा शिंगाडामध्ये २३.९ ग्रॅम कॉम्लेक्स कार्बोहायड्रेट आणि साधारण ९७ल कॅलरीज असतात. यात असलेले स्टार्च आणि कॉम्लेक्स कार्बोहायड्रेट शरीरात हळू हळू पचतात ज्यामुळे शरीरात दिर्घकाळ उर्जा मिळत राहते आणि थकवा अथवा अशक्तपणा लगेच जाणवत नाही.

The body receives plenty of energy
शरीराला मिळते भरपूर उर्जा (फोटो सौजन्य – magnific/ Freepik)

रोगप्रतिकारशक्तीला आधार देतो(Supports immunity)

यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अंन्टीऑक्सिडेंट शरीरातील रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी मदत करू शकते. बायोमेडिकल रिसर्च आणि फायटो फार्माकोलॉजिकल स्टडीनुसार, शिंगाड्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी६ आणि संरक्षणात्मक फायटोकेमिकल्स आढळतात. व्हिटॅमिन सी पांढऱ्या रक्त पेशींच्या उत्पादन वाढवण्यास चालणा देते. पण त्यातील अँटी-मायक्रोबियलल आणि अॅन्टी इन्फ्लेमेटरी गुण हंगामी संसर्ग, सर्दी-पडसे आणि बॅक्टेरियांचा हल्ल्यापासून शरीराचे संरक्षण करते.

Supports immunity
रोगप्रतिकारशक्तीला आधार देतो (फोटो सजौन्य – magnific)

फ्री रेडिकल्सपासून बचाव (Protection against free radicals)

शिंगाडामध्ये अँटीऑक्सिडंट पेशींना मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवते. जर्नल ऑफ फायटोकेमस्ट्री आणि पबमेड रिपोर्टनुसार, शिंगाडाच्या अर्क फिनालिक कंपाउंड फेरुलिक अॅसिड आणि फ्लेवोनायॉड्स खूप मोठ्या प्रमाणात आढळते. हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट शरीरात उपलब्ध असलेले हानिकारक मुक्त रेडिकल्सचे प्रभाव निष्क्रिय करते ज्यामुळे ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करू शकते आणि पेशीं वेळेआधीच नष्ट होणे किंवा वृद्ध होण्यापासून वाचतात.

शरीराला मिळणारे पोषक तत्व (Nutrients provided to the body)

यामध्ये असलेले पोटॅशिअम आणि इतर मिनरल्स शरीरातील सामान्य कार्यासाठी आवश्यक आहे. पोषणासंबधी विश्लेषणातून लक्षात येते की, शिंगाड्यामध्ये पोटॅशिअम मँगनीज आणि कॉपरचा एक चांगला स्त्रोत आहे. सोडियमचा प्रभाव संतुलित करण्यासाठी, ब्लड प्रेशर आणि इलेक्ट्रोलाइटचे संतुलन राखण्यासाठी फायदेशीर आहे. तसेच मँगनीज आणि कॉपर(तांबे) हाडांच्या तंदरुस्तीसाठी आणि मज्जासंस्थेचे कार्य सुरळीत पार पडण्यासाठी आणि एन्जमाईमचे कार्य सुधारण्यासाठी मदत करते. शिंगाड्यामध्ये असलेले कार्बोहायड्रेट उर्जेचा चांगला स्त्रोत असते. यास संतुलित आहाराचा भाग म्हणून समाविष्ट केल्यास शरीराची उर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी मदत मिळू शकते.

Nutrients provided to the body
शरीराला मिळणारे पोषक तत्व (फोटो सौजन्य – (magnific)

शिंगाडा पचन कसे सुधारतो (How does Water Chestnut improve digestion?)

हिवाळ्याता शिंगाड्याचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होते. यामध्ये उपलब्ध असलेले फायबर मल सहज बाहेर पडतो आणि बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळण्यास मदत होते. संतुलित प्रमाणात शिघांड्याचे सेवन केले आणि पुरेसे पाणी प्यायल्याने पोट साफ होण्यास मदत मिळू शकते. शिघांड्याच्या सेवनामुळे दिर्घकाळापासून त्रास देणारी बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळू शकते. Food & Nutrition Researchच्या संशोधनानुसार, १०० ग्रॅम शिंगाड्यामध्ये साधारण ३ ग्रॅमपेक्षा जास्त डाएटरी फायबर उपलब्ध असते. हे फायबर आतड्यांमध्ये तयार होणारे मल किंवा शौचाचे प्रमाण वाढवते आणि पेरिस्टाल्टिक मुव्हमेंट म्हणजे आतड्यांची स्वाभाविक संकुचन गती सक्रिय करतो. त्यामुळे दिर्घकाळापासून आतड्यातं साचलेला मल सहज बाहेर पडतो आणि पोट साफ होते.

Constipation with Digestive System Illustration
शिंगाडा पचन कसे सुधारतो (फोटो सौजन्य – magnific)

शिंगाड्याचे (Water Chestnut) सेवन कसे करावे?

शिंगाड्याचे (Water Chestnut) सेवन तुम्ही अनेक चवदार आणि आरोग्यासाठी फायदेशीर अशा पद्धतींनी करू शकता. मुख्यत्वे खालील प्रकारांनी शिंगाडा खाल्ला जातो:

१. कच्चा शिंगाडा (Raw)

  • कसे खावे: ताज्या हिरव्या किंवा काळ्या शिंगाड्याची वरची साल काढून त्यातील पांढरा गर (गर) थेट खाल्ला जातो.
  • चव: हा खायला कुरकुरीत, गोडसर आणि अतिशय रसाळ लागतो.

२. उकडलेला शिंगाडा (Boiled)

  • कसे खावे: शिंगाडे स्वच्छ धुवून कुकरमध्ये किंवा पातेल्यात थोडे पाणी आणि मीठ घालून १-२ शिट्ट्या देऊन उकडून घ्या.
  • सर्व्ह करण्याची पद्धत: उकडल्यानंतर त्याची साल सहज निघते. त्यावर चाट मसाला, सेंधव मीठ (काळे मीठ) किंवा लिंबू पिलून खाल्ल्यास ते अतिशय स्वादिष्ट लागते.

३. शिंगाड्याचे पीठ (Shingada Atta / Flour)

उपवासासाठी शिंगाड्याच्या पिठाचा सर्वाधिक वापर केला जातो:

  • पुऱ्या/पराठे: शिंगाड्याचे पीठ आणि उकडलेला बटाटा एकत्र मळून त्याच्या पुऱ्या किंवा थालीपीठ/पराठे बनवता येतात.
  • शिरा/हलवा: पिठात तूप, साखर आणि दूध घालून चवदार हलवा/शीरा बनवला जातो.
  • पकोडे/भजी: उपवासाचे भजी किंवा कटलेट बनवण्यासाठी हे पीठ वापरतात.

४. भाजी आणि सॅलड (Salad & Bhaji)

  • सॅलड: कच्चे किंवा हलके उकडलेले शिंगाडे बारीक चिरून त्यात काकडी, टोमॅटो, कोथिंबीर आणि लिंबू-मीठ घालून उत्तम सॅलड तयार होते.
  • भाजी: उत्तर भारतात शिंगाड्याची (विशेषतः उकडलेल्या शिंगाड्याची) रस्याची किंवा सुकी चवदार भाजीही बनवली जाते.

महत्त्वाच्या टिप्स:

  • स्वच्छता: शिंगाडा पाण्याखाली वाढतो, त्यामुळे तो खाण्याआधी किंवा उकडण्याआधी २-३ वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा.
  • प्रमाण: शिंगाडा पचायला हलका असला तरी अतिप्रमाणात खाणे टाळावे. दिवसभरात १०० ते १५० ग्रॅम शिंगाडा खाणे पुरेसे ठरते.

टीप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.