scorecardresearch

पर्यटनासाठी सिंगापूरला भारतीयांची सर्वाधिक पसंती

मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबादमधून सर्वाधिक पर्यटकांनी सिंगापूरला भेट

सिंगापूर
परदेशी पर्यटनाला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातून सिंगापूरला भारतीयांची सर्वाधिक पसंती असल्याचं समोर आलं आहे. सिंगापूरने २०१८ मध्ये सलग चौथ्यांदा एक दशलक्षहून अधिक भारतीय पर्यटकांचं स्वागत केलं. भारतातीत आउटबाउंड प्रवासासाठी सिंगापूर हे एक सर्वात पसंतीचे ठिकाण असल्याचेही यातून पुन्हा अधोरेखित झालं आहे. सिंगापूरसाठी व्हिजिटर सोर्स अरायव्हल (व्हीए) सोर्स मार्केट म्हणून भारताने चीन आणि इंडोनेशियानंतर तिसरं स्थान स्थान कायम राखलं असल्याचं सिंगापूर टुरिझम बोर्डने (एसटीबी) जाहीर केले आहे.

२०१७ मध्ये भारतानं पहिल्यांदा या यादीत स्थान मिळवलं होतं. बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली आणि मुंबई अशा शहरांतून सर्वाधिक पर्यटक सिंगापूरला गेले. गतवर्षांच्या तुलनेत या शहरातून सिंगापूरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत ८% नी वाढ झाली आहे. तर हैदराबाद, कोलकाता, पुणे, अमृतसर, कोइम्बतूर व विशाखापट्टणम यांसारख्या शहरातून ही पर्यटक सिंगापूरमध्ये जाण्याचं प्रमाण वाढलं आहे. ही वाढ 12% इतकी आहे. २०१८ मध्ये क्रुझ हॉलिडेनिमित्त भारतातून सुमारे १, ६०,०० पर्यटक सिंगापूरमध्ये आले होते. त्यामध्ये २७ % वार्षिक वाढ झाली आणि सिंगापूरसाठी आघाडीचे क्रुझ ट्रॅव्हल सोर्स मार्केट म्हणून भारताचे स्थान कायम राहिले.

सिंगापूर टुरिझम बोर्डनं भारतीय बाजारपेठ विचारात घेता भारतीय पर्यटकांसमोर अनेक पर्याय ठेवले. सिंगापूरमधील वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळे व साइटसीइंग, तसेच प्रवाशांच्या निरनिराळ्या आवडीनिवडींना वाव देणारे आकर्षक उपक्रम व वर्षभरातील महोत्सव व साजरीकरण विचारात घेता, २०१९ मध्ये भारतातील अधिकाधिक व्हिजिटरचे सिंगापूरमध्ये स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत अशी प्रतिक्रिया एसटीबीचे एसएएमईएचे प्रादेशिक संचालक जी. बी. श्रीथर यांनी दिली.

‘ज्वेल चांगी’ विमानतळ

चालू वर्षात सर्वाधिक लोकांनी सिंगापूरला भेट द्यावी यासाठी विविध कार्यक्रमाही राबवण्यात येणार आहे. १७ एप्रिल रोजी, ‘ज्वेल चांगी’ विमानतळाचे भव्य उद्घाटन होणार आहे. १.७ अब्ज डॉलरची गुंतवणूक, १० मजली संकुल असणाऱ्या या प्रकल्पात २८० हून अधिक दुकाने व फूड अँड बेव्हरेज आउटलेट असतील. त्याचप्रमाणे जगातील सर्वात उंच इन्डोअर धबधबा ही इथे पर्यटकांना पाहायला मिळणार आहे.

सिंगापूर केबल कार

सिंगापूर केबल कार हे सिंगापूरमधील एक लोकप्रिय आकर्षण आपली 45 वर्षे पूर्ण करत आहे आणि त्यानिमित्त फेबर पीक सिंगापूर येथील अरबोरा या टेकडीवरील रेस्तराँमध्ये अंदसना झाडावर व्हीडिओ-मॅपिंग शो पहिल्यांदाच दाखवला जाणार आहे. सिंगापूरच्या या एकमेव हिलटॉप ठिकाणी अनेक उपक्रम, कार्यक्रम नियोजित करण्यात आले आहे. मादाम तुसाद सिंगापूरच्या सहयोगाने टॉलिवूड सुपरस्टार महेश बाबू २५ मार्च २०१९ रोजी हैदराबाद येथे जगातील आपल्या पहिल्या व एकमेव वॅक्स पुतळ्याचे अनावरण करणार आहे.

 

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Singapore is most popular travel destination for indians

ताज्या बातम्या