कडक सूर्यप्रकाश, माती, घाम, प्रदूषण आणि केमिकल प्रॉडक्ट्समुळे त्वचा निस्तेज, खराब दिसू लागते. अनेक उपाय करूनही त्वचा उजळ दिसत नाही. यात काही जण वेगवेगळ्या ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर करतात. मात्र यातून मिळणारा उजळपणा हा काही दिवसांपुरताच मर्यादित असतो; नंतर तो निघून जातो. अशा वेळी अनेक जण त्वचा चमकदार करण्यासाठी घरगुती उपायांचा अवलंब करतात. ज्यामुळे त्वचेला केमिकल्सचा धोका कमी होतो. अशा वेळी महागड्या फेसवॉशऐवजी तुम्ही फ्रिजमध्ये ठेवलेले दूध वापरू शकता. कारण दूध हे त्वचा उजळ करण्यासाठी चांगले असल्याचे मानले जाते. व्हिटॅमिन ए, डी आणि लॅक्टिक अॅसिडने समृद्ध असलेले दूध चेहऱ्याला नैसर्गिक चमक देण्यासाठी प्रभावी ठरते. यामुळे चेहरा आणि त्वचा चमकदार करण्यासाठी दुधाचा वापर कसा करावा हे जाणून घेऊ…

दुधाने चेहरा धुण्याचे फायदे

दुधाने चेहरा धुतल्याने त्वचेवरील घाण आणि डेड स्किन सेल्स निघून जातात. दुधाच्या लॅक्टिक अॅसिडमध्ये ऑइल सोल्यूबल घाण काढून टाकण्याची क्षमता असते. यामुळे चेहरा धुण्यासाठी एका भांड्यात ताजे दूध काढून ते थोडे तळहावर घेऊन चेहरा धुवा. चेहरा धुतल्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने चेहरा धुवून स्वच्छ करा. आता चेहरा स्वच्छ कापड किंवा मऊ फेस टॉवेलने पुसून घ्या. एकाच वेळी भरपूर दूध चेहऱ्यावर लावण्याऐवजी कापसात दूध घेऊन चेहऱ्याला चोळू शकता. त्यामुळे त्वचेवरील डेड स्किन सेल्स निघून जातील.

How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?
f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
best ways to kill and repel ants naturally know how to get rid of ants in the kitchen without toxic chemicals
घरात लागल्या मुंग्यांच्या रांगाच रांगा? मग केमिकल नाही तर वापरा किचनमधील ‘हे’ तीन पदार्थ? मुंग्या जातील पळून
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?

चेहऱ्यावरील वृद्धत्वाच्या खुणा कमी होतात

त्वचेला अँटी एजिंग गुण देण्यासाठी दूध प्रभावी आहे. चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या तर तुम्ही दुधाचा वापर सुरू करू शकता. दुधामुळे त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे तर कमी होतातच शिवाय त्वचा मुलायम होऊन चमकते.

मॉर्निंग वॉक करूनही वजन कमी होत नाही का? मग वॉकदरम्यान ‘या’ पाच गोष्टी लक्षात ठेवा अन् लठ्ठपणाला करा बाय-बाय

उन्हामुळे होणारे नुकसान कमी करता येते

कडक उन्हामुळे त्वचेचे खूप नुकसान होते. अशा वेळी उन्हापासून त्वचेला आराम मिळण्यासाठी दूध लावणे फायदेशीर ठरते. हे त्वचेला थंड करते. सूर्यप्रकाशामुळे त्वचेचे टॅनिंगही सुरू होते. अशा वेळी दुधाच्या वापरामुळे टॅनिंग कमी होण्यास मदत होते.

त्वचा एक्सफोलिएट होते

त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी दुधाचा वापर करता येतो. दुधाने चेहरा धुतल्यानंतर त्वचेवर साचलेली घाण बाहेर पडू लागते आणि चेहरा स्वच्छ आणि चमकदार दिसू लागतो.