Urad Dal For Skin: आपल्या सर्वांनाच आपली त्वचा स्वच्छ आणि चमकदार असावी असे वाटते.कोणत्याही ऋतूमध्ये आरोग्याचीच नव्हे तर, त्वचेचीही विशेष काळजी घेणे गरजेचे असते. आपली त्वचा ही अनेक थरांनी बनलेली असते या थरांमध्ये नवे नव्या पेशी सतत बनत असतात आणि नष्ट होत असतात.

उडदाची डाळ तुमच्या त्वचेसाठी चमत्कार करू शकते. यामुळे तुमच्या त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होऊ शकतात. ते कसे वापरायचे ते आम्ही तुम्हाला सांगतो. चला तर मग जाणून घेऊया उडीद डाळीचा फेस पॅक घरी कसा बनवायचा. यामुळे कमी पैशामध्ये तुम्ही सुंदर त्वचा मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात उडीद डाळेचा तुम्ही कसा वापर कराल. कधीकधी आपली त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसू लागते. अशा परिस्थितीत हे फेस मास्क त्वचेवर नैसर्गिक चमक आणतात.

Health Sepcial, Rishi Panchami, vegetables,
Health Sepcial: ऋषिपंचमीच्या दिवशी ‘या’ भाज्या का खातात? त्यातून कोणती पोषक तत्त्वे मिळतात?
Health Special, Back pain, Back pain self diagnosis,
Health Special: कंबरदुखी- नेटवरील माहितीवर आधारलेले स्वनिदान टाळा! (भाग २)
Ganpati rangoli from betel Leaves
Video : फक्त एका मिनिटात विड्याच्या पानांपासून साकारला गणपती, व्हिडीओ एकदा पाहाच
Is blackcurrant and chia seed water really beneficial for health Get expert advice l काळ्या मनुक्यांचे आणि चिया सीड्सचे पाणी आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
काळ्या मनुक्यांचे आणि चिया सीड्सचे पाणी आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Five Rangoli Designs For Ganpati Bappa
Ganesh Chaturthi Rangoli Designs : बाप्पाचे सुंदर चित्र तर फुलांच्या पाकळ्या! लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी काढा ‘या’ सोप्या पाच रांगोळ्या
Back Pain, Back Pain Fear, Back Pain Awareness,
Health Special : कंबरदुखी: भीतीतून जागरूकतेकडे (भाग १)
Bananas and Curd
केळी आणि दह्याचे एकत्रित सेवन लैंगिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात
Lalbaugcha Raja 2024 Darshan Timings live stream link
Lalbhagcha Raja च्या दर्शनासाठी योग्य वेळ कोणती? ऑनलाइन दर्शन अन् प्रसाद ऑर्डर करण्यासाठी लिंक कोणत्या? जाणून घ्या A टू Z माहिती
virat kohli Anushka Sharma monotrophic diet benefits in marathi
विराट-अनुष्काचा ‘मोनोट्रॉफिक डाएट प्लॅन’ शरीरास खरंच फायदेशीर असतो का? वाचा तज्ज्ञ काय सांगतात

टॅनिंग फेसपॅक – तुम्हाला टॅनिंगची समस्या असली तरीही तुम्ही ते वापरू शकता.

कसे वापरावे

१. एक चतुर्थांश वाटी उडीद डाळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवा
२. नंतर सकाळी त्याची पेस्ट बनवा.
३. त्यात दही मिसळून पेस्ट तयार करा.
४. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर आणि सनबर्न झालेल्या भागावर लावा.
५. साधारण १५ ते २०मिनिटांनी थंड पाण्याने स्वच्छ करा.

​मुरुमांसाठी उपाय – या डाळीमध्ये मुरुमांसाठी नैसर्गिक अँटीसेप्टिक असते. यामुळे चेहऱ्यावरील बॅक्टेरियामुळे होणारे मुरुम दूर होतात. तसेच, जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही ते वापरू शकता.

कसे वापरावे

१. अर्धी वाटी उडीद डाळ रात्रभर पाण्यात ठेवा.
२. त्यानंतर सकाळी त्याची पेस्ट बनवा.
३. त्यात दोन चमचे गुलाबजल आणि ग्लिसरीन मिसळा.
४. शेवटी २ चमचे बदामाचे तेल घालून लावा.
५. १५ मिनिटांनी थंड पाण्याने धुवा.

हेही वाचा >> रात्री लवकर झोप लागत नाही? १० मिनिटाचा सोपा उपाय; अंथरुणावर पडताच लागेल शांत झोप

चेहऱ्यावर उजळपणा आणण्याासाठी – तुमची त्वचा निस्तेज असेल तर अशा त्वचेसाठी उडीद डाळ अतिशय फायदेशीर ठरते. ही डाळ नैसर्गिक ब्लीचप्रमाणे त्वचेवर काम करते आणि त्वचेचा रंग उजळवण्यासाठी याची मदत मिळते

कसे वापरावे

१. १/४ कप उडीद डाळ आणि ८-९ बदाम एकत्र पाण्यात रात्री भिजत ठेवा. सकाळी याची पेस्ट करून घ्या
२. ही पेस्ट तुम्ही चेहऱ्यावर साधारण १५–२० मिनिटे तशीच लावून ठेवा
३. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा आणि परिणाम पाहा