Benefits Of Skipping Dinner For Weight Loss : आजकाल लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळा डाएट ट्रेंड फॉलो करताना दिसतात. त्यात काही जण रात्रीचं जेवण टाळतात, लोकांचा असा विश्वास आहे की, रात्री न जेवल्याने वजन काही दिवसांत कमी होण्यास मदत होते. परंतु, यावर आहारतज्ज्ञांनी काय सल्ला दिला तो जाणून घेऊ…

आहारतज्ज्ञ सोनिया नारंग यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केलाय, ज्यात त्या सांगतायत की, फक्त रात्रीचे जेवन न केल्याने वजन कमी होईलच असे नाही. वजन कमी करण्याचा खरा नियम काही वेगळाच आहे.

वजन कमी करण्याचा खरा नियम

आहारतज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्याचा किंवा वाढवण्याचा सर्वांत मोठा घटक म्हणजे एकूण कॅलरीज. दिवसभरात आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरीज खाल्ल्याने वजन वाढते तसेच गरजेपेक्षा कमी कॅलरीज खाल्ल्याने वजन कमी होते.
याचा अर्थ असा की, वजन कमी करण्यासाठी तुम्हाला रात्रीचे जेवन वगळण्याची गरज नाही. तुम्हाला दिवसभरात तुमच्या एकूण कॅलरीजच्या सेवनावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.

Award Banner

आहारतज्ज्ञांच्या मते, बरेच लोक असे मानतात की, रात्रीचे जेवल्याने वजन वाढते; पण असे नाही. तुम्ही सकाळी, दुपारी व संध्याकाळी तुम्ही कॅलरीजचे सेवन केले असेल, तर तुम्ही संतुलित कॅलरीजचे सेवन करता. त्यामुळे वजनात फारसा फरक पडत नाही. त्यासाठी तुम्ही नाश्ता, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण यात कॅलरीजचे विभाजन करणे ठीक आहे. तसेच सकाळी जास्त आणि रात्री कमी कॅलरीजचे सेवनही ठीक असू शकते.

शरीरानुसार आहार निवडा

प्रत्येकाचे शरीर वेगळे असते. काही लोकांना हलके जेवण केल्याने बरे वाटते; तर काहींना मध्यम आकाराचे जेवण केल्याने अधिक ऊर्जा मिळते. जर तुम्हाला रात्रीचे जेवण वगळल्याने अशक्तपणा, थकवा किंवा जास्त भूक लागत असेल, तर ती पद्धत तुमच्यासाठी योग्य नाही.

रात्रीचे जेवण वगळणे योग्य ठरू शकते का?

जर एखाद्या व्यक्तीला हलके जेवण जेवल्यानंतर पोट फुगल्यासारखे वाटत असेल, हलके वाटत असेल आणि चांगली झोप येत असेल, तर ते ही पद्धत वापरून पाहू शकतात. पण, वजन कमी करण्यासाठी रात्रीचे जेवण सोडण्याची गरज नाही.

संतुलित आहार गरजेचा

वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. तसेच कॅलरीजच्या सेवनावरही नियंत्रण आवश्यक आहे. या सर्व गोष्टी योग्य असतील तरच वजन कमी करणे शक्य होते.