अ‍ॅपल व पायनापल चाट

साहित्य : दोन अ‍ॅपल (बारीक तुकडे केलेले), दोन पायनापल (बारीक तुकडे केलेले), एक जुडी कांद्याची पात (बारीक केलेले)…

61-lp-foodसाहित्य :
दोन अ‍ॅपल (बारीक तुकडे केलेले)
दोन पायनापल (बारीक तुकडे केलेले)
एक जुडी कांद्याची पात (बारीक केलेले)
अर्धा जुडी कोथिंबीर (बारीक केलेला)
अर्धी जुडी पुदिना (बारीक केलेला)
पाव चमचा मिरची पावडर
दोन चमचे लोणी किंवा बटर
पाव चमचा भाजलेले जिरे
पाव चमचा आमचूर पावडर
पाव चमचा साखर
मीठ चवीनुसार.

कृती :
एका छोटय़ा काचेच्या भांडय़ात लोणी, मिरची, जिरा, आमचूर, साखर, मीठ मिक्स करून मायक्रो लोवर २ मिनिटे ठेवावे. दुसऱ्या काचेच्या बाऊलमध्ये अ‍ॅपल, कांदा, कोथिंबीर, पुदिना, पायनापल टाकून मायक्रो हायवर दोन मिनिटे ठेवावे. बाहेर काढून मसाल्याचे व अ‍ॅपल पायनॅपलचे मिश्रण हळुवार मिक्स करून थोडेस गरम सव्‍‌र्ह करावे. तसे हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवून थंड करूनसुद्धा सव्‍‌र्ह करता येते.

60-lp-foodटोमॅटो तुलसी सूप

साहित्य :
अर्धा किलो टोमॅटो (बारीक चिरलेला)
दोन/तीन पाकळय़ा लसूण
अर्धा कप तुलसी (बारीक चिरलेली)
२ चमचे टोमॅटो केचअ‍ॅप
अर्धा चमचा जिरे
अर्धा चमचा मिरी पावडर
मीठ चवीनुसार
दोन कप पाणी किंवा वेजेटेबल स्टॉक

कृती :
एका काचेच्या भांडय़ात टोमॅटो, कांदा, लसूण, वेजेटेबल स्टॉक मिक्स करून मायक्रो मीडियमवर १० मिनिटे ठेवावे. त्यानंतर त्याच्यात टोमॅटो केचअप तुलसी पाने, जिरे, मिरी पावडर, मीठ टाकून मायक्रो हायवर ५ मिनिटे ठेवावे. गरम गरम सूप सव्‍‌र्ह करावा.

62-lp-foodचिकन आणि मशरूम सूप

साहित्य :
१०० ग्रॅम चिकन बारीक तुकडे केलेले
५ ते ६ मशरूम उभे कापलेले
अर्धा तुकडा आलं
अर्धी जुडी कोथिंबीर बारीक चिरलेली
२ चमचे सोया सॉस ल्ल अर्धा चमचा काळी मिरी
मीठ चवीनुसार.

कृती :
एका काचेच्या भांडय़ात चिकन व थोडेसे पाणी घेऊन मायक्रो ओव्हनमध्ये ३ ते ४ मिनिटे मीडियममध्ये ठेवावे. दुसऱ्या काचेच्या भांडय़ात मशरूम, दोन वाटी पाणी, सोया सॉस, काळी मिरी, मीठ चवीनुसार टाकून दोन मिनिटे मीडियम मायक्रो हायवर ठेवावे. नंतर त्यात शिजवलेले चिकन व बारीक कोथिंबीर टाकून मायक्रो हायवर २ मिनिटे ठेवावे.
गरम सव्‍‌र्ह करावे.

65-lp-foodकांद्याची ग्रेव्ही

साहित्य :
१ किलो सोललेले व्हाइट कांदे
१ चमचा काळी मिरी
अर्धा चमचा गरम मसाला पावडर
२ चमचे तेल.

कृती :
एका काचेच्या भांडय़ात सोललेले कांदे व २ कप पाणी टाकून मायक्रो हायवर ८ ते १० मिनिटे ठेवावे. मग याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे.
दुसऱ्या एका भांडय़ात थोडे तेल टाकून काळी मिरी गरम मसाला मायक्रो हायवर २ मिनिटे ठेवावे. त्यामध्ये बारीक केलेल्या कांद्याची पेस्ट दोन कप पाणी त्यात टाकून मायक्रो मीडियमवर ८ ते १० मिनिटे ठेवावे. ही ग्रेव्ही ४ ते ५ दिवस चांगली राहते. कुठल्याही व्हेज ड्राय डिशमध्ये ही ग्रेव्ही वापरू शकता.

64-lp-foodटोमॅटो ग्रेव्ही

साहित्य :
अर्धा कृती टोमॅटो
अर्धा कप साखर
३ ते ४ तेज पत्ता
१ चमचा काळी मिरी
१ चमचा जिरे
१ चमचा तेल.

कृती :
एका काचेच्या भांडय़ात २ कप पाणी व टोमॅटो घेऊन मायक्रो हायवरती ८ ते १० मिनिटे ठेवावे. थंड झाल्यावर टोमॅटोच्या साली व आतील बिया काढून टाकाव्यात. उरलेल्या टोमॅटोचा गर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावा.
एका काचेच्या भांडय़ात तेल टाकून तिखट, जिरे, काळी मिरी, तेजपत्ता टाकून मायक्रो हायवर १ मिनिट ठेवावे. त्यात टोमॅटोची पेस्ट व साखर टाकून मायक्रो मीडियम ८ ते १० मिनिटे ठेवावे. या ८ मिनिटांत १ ते २ वेळा मध्ये थोडेसे मायक्रो पॉज करून थोडेसे ढवळत राहावे.
या ग्रेव्हीपासून मख्खनी बटर चिकन व कुठल्याही चिकन किंवा व्हेज डिशेस बनवता येतात.

63-lp-foodव्हाइट ग्रेव्ही

साहित्य :
अर्धा किलो काजू (एक रात्र भिजवलेले)
एक चमचा काळी मिरी    ल्ल अर्धी वाटी खसखस
तेल २ चमचे.

कृती :
एका काचेच्या बाऊलमध्ये दोन चमचे पाणी घेऊन खसखस, काजू मायक्रो हायवर ८ ते १० मिनिटे ठेवावे. नंतर त्याला मिक्सरमध्ये वाटून बारीक पेस्ट करून घ्यावी.
दुसऱ्या काचेच्या बाऊलमध्ये काळी मिरी व तेल टाकून मायक्रो हायवर २ मिनिटे ठेवावे. त्यात काजूची पेस्ट व एक कप पाणी टाकून नीट मिक्स करावे व मायक्रो हायवर ५ मिनिटे ठेवावे.
ही ग्रेव्ही साधारणत: पनीर पसंदाता किंवा कुठल्याही ग्रेव्हीमध्ये वापरावी.

टीप : बेसिक ग्रेव्हीज जेव्हा आपण रोजच्या जेवणात वापरू शकतो त्याचप्रमाणे या गोष्टी ग्रेव्ही रेडीज करून फ्रि जमध्ये ठेवून एक ते दोन दिवस ठेवू शकतो.
विवेक ताम्हाणे – response.lokprabha@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Smart cooking