उन्हाळ्यामध्ये मका खाणे अति उत्तम मानले जाते. कारण या ऋतूत मका पोटाला जड होत नाही. उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरातले महत्त्वाचे द्रव निघून जातात. अशा वेळेस मका त्या घटकांची भर घालतो.

  • मक्यामध्ये स्टार्च असल्यामुळे त्याच्यापासून दीर्घ काळ ऊर्जा मिळत राहते.
  • मक्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहू शकतो. हायपरटेन्शन कमी होते.
  • काही महत्त्वाच्या देशांमध्ये मका हाच मुख्य आहार आहे.
  • मक्यामध्ये विटामिन अ, ई आणि ए आणि पुष्कळ प्रमाणात खनिजे आहेत.

43-lp-foodमका सालासह मायक्रोवेव्हमध्ये भाजणे

साहित्य :

मक्याची ३-४ कणसे

बटर

मीठ.

कृती :

मक्याची तीन चार कणसे घेणे, ती सालासह मायक्रोवेव्हमध्ये तीन-चार मिनिटे हाय पॉवरवर भाजणे आणि मायक्रोवेव्हमध्येच तीन-चार मिनिटे ठेवणे. मग त्याचे साल काढून बटर व मीठ लावून गरम गरम आस्वाद घेणे.

टीप :

१. मका सालासकट भाजण्याने, मक्याचा ओलावा तसाच राहतो.

२. ज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह नसेल, त्यांनी फॉइलमध्ये मका ठेवून त्यावर िलबू पिळून व बटर लावून पाहिजे ते मसाले घालून, फॉइल बंद करून गॅसवर पण फॉइलसह मका भाजावा किंवा कोळशावर फॉइलसह मका भाजू शकतात. अशी भाजलेली मक्याची कणसे अतिशय चविष्ट लागतात.

46-lp-foodबेबी कॉर्न फ्रीट्टेर्स

साहित्य :

बेबी कॉर्न २५० ग्राम

कॉर्नफ्लोअर ३ टेस्पून

मैदा ५ टेस्पून

तेल १ टीस्पून

बेकिंग पावडर अर्धा टीस्पून

मीठ चवीप्रमाणे

आल्याचा रस १ टीस्पून

अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर

१ टेस्पून तीळ.

कृती :

सर्व एकत्र करावे आणि पाणी घालून थोडे पीठ घट्ट भिजवावे आणि त्यात बेबीकॉर्न घालून तेलात सोडावे..  बेबीकॉर्न अख्खे तेलात सोडावे किंवा बेबीकॉर्नला उभे चिरून दोन भाग करून पण तळू शकता. शेजवान सॉस बरोबर सव्‍‌र्ह करणे.

44-lp-foodकॉर्न डीप

साहित्य :

एक-दीड कप मक्याचे उकडलेले दाणे

२०० ग्रॅम क्रीम चीझ

३-४ कमी तिखट हिरव्या मिरच्यांचे तुकडे

अर्धा कप चेडर (ूँीीि१) चीझ (ते नसेल मिळत तर प्रोसेसड् चीझ वापरू शकता)

बारीक चिरलेली कोिथबीर.

कृती :

एका फ्राय पॅनमध्ये क्रिम चीझ, मक्याचे दाणे, मिरच्याचे तुकडे, चेडर (chedder) चीझ हे सर्व एकत्र करून पाच मिनिटे मंद गॅसवर गरम करा. क्रीम चीझ विरघळले की गॅस बंद करून त्या वर कोिथबीर टाका आणि गरमगरम डीप ताकोस बरोबर किंवा मोनॅको बिस्कीट बरोबर आस्वाद घ्या.

45-lp-foodकॉर्न सलाड

साहित्य :

१ कप शिजलेले मका दाणे

२-३ टोमेटो बारीक चिरलेले

१ कांदा मोठे चौकोनी तुकडे करून

२ टिस्पून ऑलीव ऑइल

१ टीस्पून व्हिनेगर

मीठ आणि मिरी पावडर चवीप्रमाणे

ड्राय मिक्स हर्ब

कृती :

सर्व एका बोलमध्ये मिक्स करून थोडे गार करून खाणे.

47-lp-foodकॉर्न कॅरेमल पॉपकॉर्न

साहित्य :

२ कप पॉपकॉर्न

१ कप बटर (मीठ वाले)

२ कप ब्राऊन शुगर

१ टीस्पून मीठ

अर्धा कप लाईट कॉर्न सिरप (सर्व मार्केटमध्ये उपलब्ध असते)

१ टीस्पून बेकिंग सोडा.

कृती :

मायक्रोवेव्ह २०० सेल्सिअस डिग्रीवर प्रीहिट करून घेणे. एका पॅनमध्ये बटर, ब्राऊन शुगर, मीठ आणि कॉर्न सिरप एकत्र ५ मिनिटे शिजू देणे. गॅसवरून खाली उतरून बेकिंग सोडा घाला. चांगले हलवा आणि पोपकॉनवर ओता. सर्व पॉपकॉनवर लागले का हे बघून बेकिंग ट्रेवर पसरावे आणि ४५ मिनिटे ते १ तास बेक करावे.. दर १५ मिनिटांनी मायक्रोवेव्ह उघडून हलवावे. कॉर्न कॅरेमल खायला तयार.
सीमा नाईक – response.lokprabha@expressindia.com