Tips For Damp Proofing Walls : पावसाळ्यात अनेकांच्या घरातील भिंतींवर ओलावा दिसून येतो. घराच्या भिंतींमध्ये झिरपणाऱ्या पाण्यांमुळे ही समस्या जाणवते. पण काहींच्या घरी केवळ पावसातच नाही, तर इतर ऋतूंमध्येही या समस्येचा सामना करावा लागतो. ओलसरपणामुळे भिंतींचा रंग निघून जातो आणि त्यावर काळे-हिरवे डाग दिसू लागतात. काही दिवसांनी ओलाव्यामुळे घरात कुबट, कुजकट वास येतो. जर ही समस्या लवकरात लवकर सोडवली नाही, तर त्यामुळे घराच्या भिंती रंगहीन दिसू लागतात. अनेकांना वाटते की, भिंतींवरील ओलाव्याची समस्या सोडवणेहे खूप महागडे काम आहे; परंतु तसे नाही. तुम्ही अगदी कमी खर्चात या समस्येपासून सुटका करून घेऊ शकता.
ओलसरपणामुळे खराब झालेल्या भिंती ‘अशा’ करा दुरुस्त (How to prevent wall dampness)
१० खोलीत एक्झॉस्ट फॅन बसवा
बऱ्याचदा घरात योग्य त्या प्रमाणात व्हेंटिलेशन नसल्यामुळे भिंतींमध्ये ओलसरपणाची समस्या उद्भवते. व्हेंटिलेशन नसल्यामुळे भिंतींमध्ये ओलावा जमा होतो. हे टाळण्यासाठी तुम्ही घरात एक्झॉस्ट फॅन बसवू शकता.
२) जंगरोधक वापरा (वॉटरप्रूफ पेंट)
ओल्यापणाची समस्या टाळण्यासाठी तुम्ही भिंतींवर जंगरोधक रंग वापरू शकता. त्यासाठी भिंती पूर्णपणे स्वच्छ करा आणि नंतरबुरशीनाशक प्रायमर लावा. नंतर त्यावर जंगरोधक रंग मारा. त्यामुळे ओलावा टाळता येईल आणि भिंत सुरक्षित राहील.
३) पाइपलाइनची तपासणी करा
भिंतीला जोडलेल्या पाइपलाइनमधील गळतीमुळे ही ओलाव्याची समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही घरातील सर्व पाईपलाईन नीट तपासा आणि जिथून गळती होत असेल, ती दुरुस्त करून घ्या. तसेच गळती दुरुस्त झाल्यानंतर पंखा किंवा हीटरच्या मदतीने खोली पूर्णपणे कोरडी करून घ्या.
४) भिंतीमधील भेगा भरून घ्या
जर भिंतीला ओलसरपणामुळे भेगा पडल्या असतील, तर अशा परिस्थितीत तुम्ही प्रथम सिमेंट किंवा पुठ्ठीच्या मदतीने त्या भेगा भरून घ्या. जर तुम्ही वेळेत त्या दुरुस्त केल्या नाहीत, तर ही समस्या वाढू शकते.