जाणून घ्या ‘रेडमी नोट फोर’ची वैशिष्ट्ये

आधीच्या आवृत्तीपेक्षा अधिक चांगला आहे

हा मोबाइल अ‍ॅण्ड्रॉइड ६.०.१ या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो. या मोबाइलमधे जलद चाìजग होऊ शकत नाही आणि फक्त ऑनलाइन उपलब्ध आहे.

स्वस्त, सुंदर, टिकाऊ.. आपल्या भारतीय बाजारपेठेत या गोष्टीला खूप महत्त्व आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन ‘शिओमी’ ही कंपनी भारतीय बाजारपेठेत आपले मोबाइल घेऊन आली आहे. ‘शिओमी’ने मागच्या वर्षी ‘रेडमी नोट थ्री’ हा फोन भारतामधे उपलब्ध केला आणि पूर्ण वर्षभर या मोबाइलने भारतीय बाजारपेठेत अधिराज्य केलं. ‘शिओमी’ने आपले अस्तित्व अधिक बळकट करण्यासाठी ‘रेडमी नोट थ्री’ची पुढची आवृत्ती ‘रेडमी नोट फोर’ भारतात आणली आहे.

यात ५.५ इंचांचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो आधीच्या आवृत्तीपेक्षा अधिक चांगला आहे, कारण यात २.५ डी ग्लास लावण्यात आली आहे ज्यामुळे मोबाइल अधिक आकर्षक दिसतो आहे. ‘रेडमी नोट फोर’चे तीन प्रकार उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात टू जीबी – थ्री जीबी रॅम आणि ३२ जीबी मेमरी, फोर जीबी रॅम आणि ६४ जीबी मेमरी असे तीन प्रकार निवडू शकता. हा मोबाइल पूर्णपणे मेटलचा बनविण्यात आला आहे. शिओमीने यात स्नॅपड्रॅगॉनचा ६२५ ऑक्टा कोर हा प्रोसेसर आणि अड्रिनो ५०६ हा जीपीयू वापरला आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाइलमधील गेम्स अधिक चांगल्या प्रकारे आणि विनाअडथळा खेळू शकता तसेच नेहमीच्या वापरातील लहान, मोठे अ‍ॅपसुद्धा सहज वापरू शकता. या प्रोसेसरचे वैशिष्टय़ असे की हा खूप कमी वीज वापरतो, ज्यामुळे कमी बॅटरीचा उपयोग होतो आणि तुम्ही तुमच्या मोबाइलचा वापर अधिक काळ करू शकता. शिवाय यात ४१०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे त्यामुळे एकदा मोबाइल चार्ज केल्यानंतर एक ते दीड दिवस सहज वापरू शकता. ‘रेडमी नोट फोर’मध्ये दोन सिम कार्डची सुविधा आहे. परंतु एका वेळी दोन सिम कार्ड किंवा एक सिम कार्ड आणि एक मेमरी कार्ड वापरू शकता. यात तुम्ही मेमरी कार्डच्या साहाय्याने स्टोरेज १२८ जीबीपर्यंत वाढवू शकता.

‘रेडमी नोट फोर’मधे मागील बाजूस १३ मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार मागच्या आवृत्तीपेक्षा यामध्ये कॅमेरा आणखी सुधारित केला आहे आणि पुढील बाजूस पाच मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे ज्याचा उपयोग तुम्ही सेल्फी काढण्यासाठी किंवा व्हिडीओ कॉल करण्यासाठी करू शकता. मोबाइलच्या मागच्या बाजूस िफगरिपट्र स्कॅनर देण्यात आले आहे ज्याचा उपयोग तुम्ही फोन अनलॉक करण्यासाठी किंवा सेल्फी काढण्यासाठी करू शकता. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत हा मोबाइल फोरजी विओएलटीई, एलटीई, थ्रीजी, टूजीला साहाय्य करतो. यात वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ, एफएम आहे. तुम्ही तुमचा पेन ड्राइव्ह या मोबाइलला जोडू शकता. स्मार्टफोनचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करता यावा म्हणून यात सगळ्या प्रकारचे महत्त्वाचे सेन्सर्स देण्यात आले आहेत. आपल्या घरातल्या टीव्ही, डीव्हीडी प्लेअर, एसी, म्यूझिक सिस्टिम या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना वेगवेगळे रिमोट असतात. एवढे रिमोट सांभाळणे कठीण जाते. यावर उपाय म्हणून ‘रेडमी नोट फोर’मध्ये आयआर ब्लास्टर देण्यात आले आहे. यामुळे तुम्ही तुमच्या मोबाइलचा उपयोग स्मार्ट रिमोटसारखा करू शकता. यात एमआय रिमोट नावाचे अ‍ॅप देण्यात आले आहे. याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे रिमोट यात संग्रहित करून ठेवू शकता व या वस्तू आपल्या स्मार्ट फोनद्वारे वापरू शकता. हा मोबाइल अ‍ॅण्ड्रॉइड ६.०.१ या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो. या मोबाइलमधे जलद चाìजग होऊ शकत नाही आणि फक्त ऑनलाइन उपलब्ध आहे. ‘रेडमी नोट फोर’ सोनेरी, काळ्या आणि राखाडी रंगामध्ये उपलब्ध आहे.

फायदे
‘रेडमी नोट फोर’चे फायदे : तीन प्रकारांत उपलब्ध असल्यामुळे तुम्ही हवा तो पर्याय निवडू शकता.दमदार प्रोसेसर बॅटरी मोठी असल्यामुळे मोबाइल अधिक काळ वापरू शकता. आयआर ब्लास्टरमुळे मोबाइलचा स्मार्ट रिमोटसारखा वापर करू शकता. महत्त्वाचे सगळे सेन्सर्स उपलब्ध.
तोटे
तुम्ही दोन सिम कार्ड वापरणार असाल तर मेमरी कार्ड वापरू शकणार नाही.अ‍ॅण्ड्रॉइड ६.०.१ या जुन्या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो.जलद चाìजगला साहाय्य नाही. फक्त ऑनलाइन उपलब्ध. बॅटरी मोबाइलमध्ये बंद असल्यामुळे वापरकर्ता स्वत: काढू किंवा बदलू शकत नाही. त्यासाठी ‘शिओमी’ च्या सेवा केंद्रामध्ये जावे लागेल.
मोबाइल किंमत :
टू जीबी रॅम / ३२ जीबी मेमरी रु. ०९,९९९/-थ्री जीबी रॅम / ३२ जीबी मेमरी रु. १०,९९९/-फोर जीबी रॅम/ ६४ जीबी मेमरी रु. १२,९९९/-

निखिल जोशी

सौजन्य – लोकप्रभा

response.lokprabha@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Smartphone redmi note 4 mobile and including price review in marathi