मोबाइलशिवाय राहण्याचा विचारही सध्याच्या घडीला कोणी करू शकणार नाही. फोन, लॅपटॉप, कॅमेरा आणि टीव्ही अशा चार गॅझेटची कामे एकाच स्मार्टफोनमधून होत असल्यामुळे स्मार्टफोन आयुष्यातील अविभाज्य घटक बनला आहे. मात्र, तरीही स्मार्टफोन किंवा एकंदरच मोबाइलची देखभाल करण्याबाबत अनेकजण उदासीन असतात. आपला मोबाइल ‘रफ अॅ ण्ड टफ’ वापरासाठी कसा उपयुक्त आहे, हे दाखवण्यासाठी म्हणून की काय अनेक जण त्याचा कसाही वापर करतात. याचा परिणाम स्मार्टफोनचं आयुर्मान कमी होण्यात होतोच; पण त्याहून अधिक प्रकर्षांने जाणवणारी समस्या म्हणजे स्मार्टफोनचं संथ होणं!

बाजारात दररोज नवनवीन आणि अद्ययावत तंत्रज्ञान असलेल्या स्मार्टफोनची रेलचेल आहे. उत्तम गुणवैशिष्टय़े आणि दर्जा या निकषांवर आधारित स्पर्धेत टीकून राहण्यासाठी कंपन्या नवीन मोबाइल निर्माण करताना विशेष काळजी घेत असतात. त्यातला एक भाग असतो मोबाइलची कार्यक्षमता वाढवणाऱ्या प्रक्रियेचा. मोबाइलमधील प्रोसेसर आणि रॅम हे दोन घटक त्याची कार्यक्षमता ठरवत असतात. जितक्या चांगल्या क्षमतेचा प्रोसेसर आणि रॅम असतात, तितका मोबाइल अधिक कार्यक्षम असतो. आता तर संगणक आणि लॅपटॉपमधील प्रोसेसरच्या क्षमतेचे तंत्रज्ञान असलेले प्रोसेसर स्मार्टफोनमध्ये मिळू लागले आहेत. पण असे असतानाही काही दिवसांतच स्मार्टफोन संथ का होतो?

मोबाइल फोनची देखभाल म्हणजे तो व्यवस्थित हाताळणे किंवा सतत स्वच्छ ठेवणे इतकीच नाही. या गोष्टी आवश्यक आहेतच. पण त्यासोबतच मोबाइलच्या अंतर्गत व्यवस्थेची देखभाल करणे जरुरीचे असते. ही अंतर्गत देखभाल अतिशय सोपी आहे. पण त्यासाठी काही सवयी आपल्या अंगवळणी पडायला हव्यात. शिवाय काही बाबतीत आपण स्वत:ला शिस्त लावून घेतली की मोबाइल संथ होणेच काय पण अन्य दोषही टाळणे सहजशक्य होते.

तुमचा स्मार्टफोन संथ होत असेल किंवा वारंवार हँग होत असेल तर खालील गोष्टी करून तुम्ही या समस्येवर मात करू शकाल.

१. अपडेट ठेवणे

स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर आपण त्याच्या वापरात इतके गुंतून जातो की त्याच्या नियमित अपडेटबाबत आपल्याला भानच राहत नाही. हे अपडेट्स मोबाइलची कार्यशैली सुधारण्यासोबतच त्याच्या सुरक्षिततेसाठीही आवश्यक असतात. अनेकदा या अपडेट्समध्ये ‘बग पॅचेस’ असतात. हे ‘बग पॅचेस’ आपल्या मोबाइलच्या विद्यमान सिस्टिममध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक चुका दुरुस्त करत असतात. त्यामुळे आपला स्मार्टफोन नियमितपणे अपडेट होत राहील, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

२. फोन रिस्टार्ट करणे

आपला मोबाइल स्विच ऑफ किंवा रिस्टार्ट केव्हा होतो? जेव्हा त्याची बॅटरी संपते तेव्हाच! पण हे बरोबर नाही. आपला मोबाइल दिवसातून (अर्थातच रात्री) काही मिनिटे तरी स्विच ऑफ ठेवणे कधीही चांगले. याखेरीज मोबाइल संथ होतोय, असे वाटत असेल तर तो रिस्टार्ट करणे हा तात्पुरता पण उपयुक्त पर्याय आहे. सतत सुरू राहिल्यामुळे, अँड्रॉईड सिस्टम मोबाइलच्या प्रत्येक प्रRियेची तात्पुरती (टेम्परारी) फाईल तयार करत असते . तसेच  फोनची फिजिकल मेमरी म्हणजे रॅमचा मोठा हिस्सा सतत वापरल्यामुळे व्यापला असतो. त्यामुळे फोन स्लो होतो किंवा हँग होत असतो. म्हणूनच ठरावीक काळानंतर आपला फोन रीस्टार्ट करा, ज्यामुळे तात्पुरत्या फाइल्स डिलीट होतील आणि फिजिकल मेमरीही विनाकारण व्यापलेली जागा मोकळी होईल.

. अंतर्गत स्टोअरेजवर लक्ष ठेवा

आपण कोणत्या ना कोणत्या निमित्ताने अनेक अॅोप मोबाइलमध्ये डाऊनलोड करतो. यातील अनेक अॅ्प आपण महिनोन्महिने वापरलेलेही नसतात. वापरात नसल्याने ते निष्क्रिय असल्याचा आपला समज असतो. मात्र, हे अॅ्प फोनच्या सिस्टिममध्ये बॅकग्राऊंडवर सक्रिय असतात. याचा परिणाम रॅमची शक्ती खर्च होण्यात होतो. तसेच ते अॅफप आपल्या अंतर्गत स्टोअरेजची जागाही बळकावत असतात. अंतर्गत स्टोअरेजची जागा जसजशी कमी होत जाते तसतसा मोबाइल संथ होत जातो. त्यामुळे आपली अंतर्गत स्टोअरेज दोन तृतीयांशपेक्षा अधिक भरणार नाही, याची काळजी घ्या. त्यासाठी महिन्यातून किमान एकदा तरी, अंतर्गत स्टोअरेजमध्ये डोकावून नको असलेले अॅ्प, फायली हटवून टाका. तुम्हाला नक्कीच परिणाम दिसेल. स्टोअरेज रिकामा केल्यानंतर स्मार्टफोन पूर्वीसारखा काम करू लागेल. सोशल मीडियाचा वापर करताना डेटा कॅश जमा होतो. काही वेळा कॅश २ जीबीपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे तुम्ही सेटिंग्जमध्ये जाऊन कॅश डिलीट करावा .

४. फॅक्टरी रिसेटचा वापर

जर इतर  कोणत्याही उपायाने आपल्या फोनचा स्पीड वाढत नसेल, तर फोन फॅक्टरी रिसेट (Factory Reset) चा वापर करावा . ते करण्यापूर्वी  डेटा बॅकअप करून  घ्यावा.

प्रा यमेगेश अशोक हांडगे

(लेखक पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)

युक्तीच्या गोष्टी

’ लाईव्ह  वॉलपेपरमुळे स्मार्टफोनची बॅटरी कमी होते. त्यामुळे फोन बंद होतो. म्हणून  वॉलपेपरमुळे आपल्या फोनला एक हटके लूक येत असला तरी देखील लाईव्ह वॉलपेपरचा वापर टाळा.

’ लॅपटॉपला फोन  जोडत्यावेळी   डेटा ट्रान्सफर करतांना आपल्या मोबाईलमध्ये व्हायरस जाण्याची शक्यता असते.  अशावेळी आपण मोबाईलचा व्हायरसपासून बचाव करायला हवा. यासाठी Settings > Google > Security > Google Play Protect > Turn on ही प्रक्रिया करून सेटींग्जमध्ये बदल करावा