धुम्रपानामुळे मुलांसह पुढच्या काही पिढ्यांवरही होतो परिणाम? संशोधनातून समोर आली धक्कादायक बाब

धूम्रपान केल्याने केवळ फुप्फुसे खराब होत नाहीत तर ही सवय कँसरसारख्या जीवघेण्या आजाराचेही कारण ठरू शकते.

smoking freepik
तुम्ही धूम्रपान करत असाल तर या सवयीचा वाईट प्रभाव फक्त तुमच्या मुलांवरच नाही तर पुढच्या पिढ्यांवरही पडू शकतो. (Photo : Freepik)

धूम्रपानाचा आपल्या शरीरावर अत्यंत वाईट परिणाम होतो ही गोष्ट सगळेच जाणतात. शेकडो वर्षांपासून धुम्रपानामुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर अगणित संशोधने करण्यात आली आहेत. धूम्रपान केल्याने केवळ फुप्फुसे खराब होत नाहीत तर ही सवय कँसरसारख्या जीवघेण्या आजाराचेही कारण ठरू शकते. परंतु तुम्हाला माहित आहे का, धूम्रपान केल्याने फक्त आपल्याच शरीरावर प्रभाव होत नाही, तर आपल्या येणाऱ्या पिढयांवरही त्याचा वाईट परिणाम होतो.

धूम्रपानाच्या सवयीमुळे येणाऱ्या पिढ्यांवर कशाप्रकारे होऊ शकतो परिणाम ?

ब्रिटनमध्ये ब्रिस्टल विद्यापीठाच्या (University of Bristol) संशोधकांनुसार जर तुम्ही धूम्रपान करत नसाल परंतु तुमचे आजोबा-पणजोबा यांना धूम्रपानाची सवय होती तर त्यांच्या सवयीचे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. संशोधनानुसार, जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर या सवयीचा वाईट प्रभाव फक्त तुमच्या मुलांवरच नाही तर पुढच्या पिढ्यांवरही पडू शकतो.

तरुणांमध्ये वाढू लागलंय Love Addiction; तुम्हालाही दिसत असतील ‘ही’ लक्षणं तर आताच सावध व्हा

संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती

सायन्टिफिक रिपोर्ट या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासाचा उद्देश जनुकीय आणि पर्यावरणाचा लोकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची माहिती मिळवणे हा होता. या अभ्यासात संशोधकांनी मागील ३० वर्षात विविध लोकांचे रक्त, लघवी, प्लेसेंटा, दात, केस आणि नखे यांचे १५ लाख नमुने जमा केले. यातून संशोधकांना असे आढळून आले की धूम्रपानाच्या सवयीमुळे लोकांच्या आरोग्यावरच परिणाम होत नाही, तर त्याचे दुष्परिणाम त्यांच्या पुढील पिढ्यांवरही दिसून येतात.

आजोबा-पणजोबांच्या धूम्रपानाच्या सवयीचा येणाऱ्या पिढ्यांवरही होतो परिणाम

अभ्यासात असे आढळून आले की ज्या महिलांचे आजोबा आणि पणजोबा त्यांच्या तारुण्यात धूम्रपान करू लागले त्यांच्या शरीरातील चरबीचे प्रमाण अधिक होते. तर ज्या महिलांचे आजोबा किंवा पणजोबांनी वयाच्या १३ वर्षाच्या आधी धूम्रपान करण्यास सुरुवात करतात त्यांना आनुवंशिक लठ्ठपणाचा धोका जास्त असतो. तथापि, या अभ्यासानंतर इतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जसे की, धूम्रपान करणाऱ्या लोकांच्या पिढीमध्ये येणाऱ्या काळात एकसामान परिणाम का दिसत नाहीत? परंतु, अभ्यासातून हे स्पष्टपणे दिसून आले आहे की धूम्रपानाचा परिणाम केवळ तुमच्या आरोग्यावरच नाही तर तुमच्या भावी पिढ्यांवरही होतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Smoking affect the next few generations research revealed shocking fact pvp

Next Story
Republic Day 2022: प्रजासत्ताक दिनासाठी पाल्याकडून ऑनलाइन किंवा ऑफलाइन भाषणाची अशी तयारी करून घ्या, वाचा सविस्तर
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी