snakes Hate this Smell : पावसाळ्याच्या दिवसांत घराभोवती कीटक, किडे आणि विशेषतः साप आढळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते. जर तुमचे घर जंगल, शेत, पार्क, नाला, डोंगर किंवा तलावाच्या जवळ असेल, तर साप आढळण्याचा धोका अधिक असतो. अनेक साप अत्यंत विषारी असतात, ज्यांच्या एका दंशाने व्यक्तीचा जीव जाऊ शकतो. अशा वेळी सपेऱ्याला शोधणे किंवा सापाचा सामना करणे अत्यंत भीतीदायक ठरू शकते.

सापांची वास घेण्याची क्षमता अत्यंत तीव्र असतात. काही विशिष्ट तीव्र वास सापांना अजिबात सहन होत नाही. अशा गोष्टींचा वापर करून तुम्ही सापांना घरापासून दूर ठेवू शकता.

साप कोणत्या वासाचा सर्वाधिक तिरस्कार करतात? (Which Smells Do Snakes Hate the Most?)

साप त्यांच्या जिभेच्या साहाय्याने हवेतील वासाचा अंदाज घेतात. काही तीव्र आणि उग्र वास सापांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करतात, ज्यामुळे ते त्या ठिकाणाहून लगेच पळ काढतात.

  • लसूण आणि कांदा: यामधील सल्फरच्या तीव्र वासामुळे सापांना अस्वस्थ वाटते.
  • फिनेल आणि रॉकेल (केरोसीन): फिनेल किंवा रॉकेलचा तीव्र रसायनांचा वास सापांना सहन होत नाही.
  • व्हिनेगर: व्हिनेगरमधील ॲसिडचा तीव्र वास सापांना दूर ठेवण्यास मदत करतो.
  • पुदिना : पुदिन्याचा उग्र सुगंध सापांसाठी त्रासदायक ठरतो.
  • लवंग आणि दालचिनीचे तेल: या अत्यावश्यक तेलांचा (Essential Oils) उग्र वास सापांना पळवून लावतो.

साप पळवून लावण्यासाठी कोणती झाडे लावावीत? (Which Plants Drive Snakes Away?)

  • घराच्या अंगणात, बाल्कनीत किंवा दाराजवळ काही विशिष्ट सुगंधी आणि औषधी वनस्पती लावल्यास साप घराच्या परिसरात पाऊलही टाकत नाहीत.
  • सर्पगंधा (Sarpagandha): सर्पगंधा ही वनस्पती सापांना दूर ठेवण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. या वनस्पतीच्या मुळांचा आणि पानांचा तीव्र वास सापांना आवडत नाही.
  • नागदोन (Nagdona): या वनस्पतीला एक विशेष तीव्र वास असतो, ज्यामुळे विषारी जीव आणि साप लांब राहतात.
  • स्नेक प्लांट (Snake Plant): याच्या टणक आणि टोकदार पानांमुळे साप याच्या जवळ येणे टाळतात.
  • झेंडूचे फूल (Marigold): झेंडूच्या फुलांचा आणि मुळांचा तीव्र वास सापांना आणि इतर कीटकांना दूर ठेवतो.
  • गवती चहा (Lemongrass): गवती चहामध्ये सायट्रसचा तीव्र वास असतो, जो सापांना अजिबात आवडत नाही.
  • तुळस (Tulsi): तुळशीचा तीव्र गंध आणि औषधी गुणधर्म सापांना घरापासून लांब ठेवण्यास मदत करतात.
  • निवडूंग (Cactus): निवडुंगाचे काटे सापांच्या त्वचेला दुखापत करू शकतात, त्यामुळे साप अशा झाडांपासून दूर राहतात.
  • गरुड वृक्ष / फळ (Garud Tree): गरुड वृक्षाचे फळ लांब आणि हुबेहूब सापासारखे दिसते. याच्या विशेष औषधी गुणांमुळे आणि वासामुळे विषारी जीव दूर राहतात. हे झाड सापाचे विष उतरवण्यासाठीही उपयुक्त मानले जाते.

घरात काय शिंपडल्याने साप लगेच पळून जातो? (What to Spray to Drive Snakes Away Instantly?)

जर घरात चुकून साप शिरला असेल, तर खालील गोष्टींचा वापर करून त्याला सुरक्षितपणे बाहेर घालवता येते:

  • फिनेलचा फवारा: घरात फिनेलचे पाणी किंवा फिनेलचे द्रव शिंपडल्यास त्याच्या तीव्र वासाने साप लगेच बाहेर पडण्याचा मार्ग शोधतो.
  • लवंग आणि दालचिनीच्या तेलाचा स्प्रे: लवंग तेल आणि दालचिनीचे तेल समप्रमाणात एकत्र करून सापाच्या दिशेने दूरवरून स्प्रे केल्यास साप वासाने पळून जातो.
  • रॉकेल (केरोसीन): सापाच्या जवळ किंवा त्याच्या लपण्याच्या जागेभोवती रॉकेल शिंपडल्यास तो वासाने बाहेर पडतो.
  • (टीप: फवारणी करताना सापापासून सुरक्षित अंतर ठेवा आणि त्याला बाहेर जाण्यासाठी दारे-खिडक्या उघड्या ठेवा.)

सापाचा सर्वात मोठा शत्रू कोणता? (Snake Vs Mongoose)

सापाचा सर्वात मोठा आणि नैसर्गिक शत्रू मुंगूस (Mongoose) मानला जातो. आकाराने लहान असला तरी मुंगूसअत्यंत चपळ असतो. मुंगूसच्या शरीरात सापाच्या विषाविरुद्ध लढण्याची नैसर्गिक प्रतिकारशक्ती असते, ज्यामुळे सापाच्या दंशाचा त्याच्यावर सहजासहजी परिणाम होत नाही.

मुंगूसव्यतिरिक्त साप माणसांना सर्वाधिक घाबरतात. तसेच घार, घुबड आणि मोठे पक्षी हे देखील सापांचे शत्रू असतात. साप आग आणि मोठ्या आवाजाला खूप घाबरतात

साप घरापासून दूर ठेवण्याचे सोपे उपाय (Tips to Keep Away Snake From House)

पावसाळ्यात घराभोवती सापांचा वावर रोखण्यासाठी या महत्त्वाच्या टिप्स पाळा:

  • परिसराची स्वच्छता: घराभोवती वाढलेले गवत, लहान छोटी झाडे आणि झाडेझुडपे वेळेवर कापून परिसर स्वच्छ ठेवा.
  • उंदरांचा बंदोबस्त: सापांचे मुख्य खाद्य उंदीर असतात. घरातील आणि परिसरातील उंदरांवर नियंत्रण मिळवा, जेणेकरून सापांचे येणे आपोआप थांबेल.
  • भिंतीच्या भेगा बंद करा: घराची दारे, खिडक्या, भिंती किंवा फर्निचरमधील भेगा आणि छिद्रे पूर्णपणे बुजवून घ्या.
  • घराबाहेर पडण्याचे मार्ग मोकळे ठेवा: जर साप घरात शिरलाच तर घाबरून न जाता घरातील एक-दोन दारे/खिडक्या उघड्या ठेवा आणि फिनेल शिंपडा, जेणेकरून वासाने साप स्वतःहून बाहेर निघून जाईल.
  • मोठ्या सापांशी छेडछाड टाळा: जर घरात अत्यंत विषारी किंवा मोठा साप आला असेल, तर त्याला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नका. घरातील सदस्यांना सुरक्षित अंतरावर नेऊन स्नेक हेल्पलाइन (Snake Helpline) किंवा तज्ज्ञ सर्पमित्रांना त्वरित संपर्क साधा.