स्नॅपचॅटने फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी नवीन फिल्टर लाँच केले आहे. हे फिल्टर वापरून वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्मवर आपल्या मित्रांना आभासी मिठी मारता येईल आणि त्यांच्यासोबत मजेशीर क्षण घालवता येतील. भारताबाहेर हा दिवस यंदा ३० जुलैला साजरा होत आहे. भारतात ऑगस्टच्या पहिल्या रविवारी म्हणजे या वर्षी १ ऑगस्टला फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. यंदाही आपल्या मित्र-मैत्रीणींना प्रत्यक्षात भेटणे शक्य नाही. पण या फिल्टरने तुम्ही फ्रेंडशिप डे नक्कीच साजरा करू शकता.हे फिल्टर सहजपणे व्यक्त होण्यासाठी आणि एकत्र छान आठवणी तयार करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे.

कसं आहे हे फिल्टर?

स्नॅपचॅट सामान्यत: येणारे सण, उत्सव, दिनविशेष किंवा अन्य कार्यक्रमांच्या आसपास त्या संबंधी अनेक नवीन फिल्टर लाँच करत असते. या फिल्टरमध्ये प्रवेश करण्यासाठी वापरकर्ते त्यांच्या स्नॅपचॅट कॅमेरा अॅपसह खालील चित्रात दिसणारा ‘स्नॅप’ कोड सहज स्कॅन करू शकतात. हे फिल्टर लेन्स २४  तासांपासून ४८  तासांच्या मर्यादित कालावधीसाठी अनलॉक केले जाऊ शकतात. लेन्स कॅमेरा वापरुन विविध प्रकारचे खेळही खेळू शकता.

थ्री डायमेंशल फिचर

अलीकडेच, स्नॅपचॅटने एक फिचर लाँच केले जे वापरकर्त्यांना प्रोफाइलमध्ये स्वतःची थ्री डायमेंशल आवृत्ती पाहण्याची परवानगी देते. स्नॅपचॅटने प्रोफाइललाही नवीन लूक दिले आहे. यात वापरकर्त्यांना डिजिटल अवतार अधिक चांगले वैयक्तिकृत करण्यासाठी १,२०० हून अधिक बॉडी पोझेस, चेहर्यावरील हावभाव, जेश्चर आहेत.वापरकर्ते त्यांच्या थ्रीडी बिटमोजीसह त्यांच्या मूडप्रमाणे प्रार्थना करणारे हात, निसर्गरम्य किनारे, प्राणी प्रिंट मागे वापरू शकता. कंपनीचे म्हणणे आहे की पिक्सर-गुणवत्ता ३ डी क्षमतांचा वापर करून, स्नॅपचॅट वापरकर्ते त्यांच्या अवतारात कपड्यांचे पोत, आवडी फॅशन, वेगळे अलंकारांचा समावेश करू शकतात.

नवीन स्नॅपचॅट फ्रेंडशिप डे लेन्स कसे वापरालं?

तुमचे स्नॅपचॅट अॅप उघडा आणि मागील (rear camera) कॅमेरा सुरु करा.

स्क्रीनवर टॅप करा आणि हवं त्या एका कोडला निवडा. कोडला कॅमेर्‍याने स्कॅन केले पाहिजे. कोड अनलॉक झाला की तुम्ही ते फिल्टर वापरू शकता. लेन्सनुसार हे फिल्टर  २४ तास किंवा ४८  तासांसाठी राहिलं.

अशा प्रकारे स्नॅपचॅटच्या नवीन फिल्टरसह आपला फ्रेंडशिप डे नक्की साजरा करा.