Snoring Symptoms and Causes : तुम्हीही घोरता? आणि तुम्हाला ही सामान्य गोष्ट वाटते का? घोरणे ही केवळ एक सामान्य सवय नाही. जर ते वारंवार आणि मोठ्याने होत असेल, तर ते ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्नियासारख्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. या स्थितीत झोपेच्या वेळी श्वासोच्छ्वास वारंवार थांबतो आणि पुन्हा सुरू होतो, ज्यामुळे अनेक आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. म्हणून घोरण्याला केवळ सवय किंवा थकवा मानू नका. त्यामुळे विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. म्हणून तुमच्या घोरण्याकडे लक्ष द्या आणि स्वतःला आजारांपासून वाचवा. हे प्रत्येकासाठीच खरे असेल, असे नाही; परंतु जर ही समस्या अधिकच वाढली, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
स्वतःची काळजी कशी घ्यावी?
- आपले वजन नियंत्रणात ठेवा.
- तुमच्या दिनचर्येत योगाचा समावेश नक्की करा.
- मद्यपान आणि धूम्रपानाच्या सवयी टाळा.
- पाठीवर झोपण्याऐवजी कुशीवर झोपून बघा.
कोणती चिन्हे धोकादायक
- श्वसनक्रिया बंद पडणे
- गुदमरल्यासारखे वाटणे
- सकाळची डोकेदुखी किंवा दिवसा झोप येणे
घोरण्यामुळे या आजारांचा धोका वाढू शकतो. घोरण्याची लक्षणे आणि कारणे
उच्च रक्तदाब- घोरताना श्वास वारंवार थांबतो, ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि रक्तदाब वाढण्याचा धोका असतो.
हृदयरोग आणि हृदयविकाराचा झटका- या काळात, तीव्र स्लीप ॲप्निया असलेल्या लोकांना हृदयाशी संबंधित आजार आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असू शकतो.
पक्षाघात- या काळात अनेकदा झोप व्यवस्थित लागत नाही आणि अनियंत्रित स्लीप ॲप्नियामुळे पक्षाघाताचा धोकादेखील वाढू शकतो.
टाईप २ मधुमेह- खराब झोप आणि वारंवार श्वास थांबल्यामुळे इन्सुलिन प्रतिरोध वाढू शकतो, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.
दिवसभर थकवा आणि सुस्ती- रात्री चांगली झोप न लागल्यामुळे दिवसभर थकवा, सुस्ती आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते.
