Jalebi Benefits: जिलेबी हा भारतातील एक प्रसिद्ध गोड पदार्थ आहे, जो कोणत्याही शुभ कार्यात आवर्जून बनवला जातो. परंतु, हल्ली डाएटमुळे अनेक लोक जिलेबी खाणं टाळतात. पण, तुम्हाला ठाऊक आहे का? जर जिलेबीचे मर्यादित प्रमाणात सेवन केले, तर जिलेबीचे आरोग्यासाठी फायदेही आहेत. जसे की अर्धशिशी, नैराश्यापासून प्रजनन क्षमता वाढविण्यापर्यंतच्या अनेक आजारांचा धोका जिलेबीमुळे कमी होऊ शकतो. जिलेबी तणाव कमी करते आणि मानसिक शांती देते. या मिश्रणामुळे शरीरातील आनंदाच्या संप्रेरकाची (सेरोटोनिन) पातळी वाढते, ज्यामुळे मानसिक थकवा आणि तणाव दूर होतो आणि तुम्हाला दिवसभर आनंदी भावनेचा अनुभव येतो.

जिलेबी खाण्याचे फायदे

  • काही लोकांसाठी सकाळी लवकर जिलेबी खाणे फायदेशीर ठरू शकते. डोकेदुखी आणि अशक्तपणा यांसारख्या समस्या असलेल्यांसाठी हे विशेषतः फायदेशीर आहे. तसेच, डोकेदुखी, अर्धशिशी, बद्धकोष्ठता या त्रासांत सुधारणा होण्यासह सुधारित पचनक्रिया, रोगप्रतिकारशक्तीत वाढ यांसारख्या इतर गोष्टींसाठीही ही बाब फायदेशीर असल्याचे म्हटले जाते.
  • जिलेबी दिसायला जितकी सुंदर आहे, तितकीच खाण्यासाठीही फायदेशीर आहे. हाता-पायांवरील खरचटलेले व्रण लवकर बरे होऊ शकतात. त्यामुळे खाज कमी होते. कोमट दुधाबरोबर जिलेबी खाल्ल्याने दमा, सर्दी व खोकला बरा होऊ शकतो. तसेच, यामुळे मानसिक एकाग्रता वाढण्यासही मदत होते.
  • ज्यांना अर्धशिशी किंवा डोकेदुखीचा त्रास होतो आणि जे औषधांचे जास्त डोस घेतात, त्यांनी थोडी जिलेबी खाण्याचा विचार करावा. कारण- ती अर्धशिशीवर रामबाण उपाय आहे. सकाळी दुधाची जिलेबी खाल्ल्याने कोणत्याही प्रकारची डोकेदुखी कमी होण्यास मदत होऊ शकते.
  • जिलेबीमध्ये कर्बोदके असतात, जी शरीराला त्वरित ऊर्जा देतात. सकाळी लवकर तिचे सेवन केल्याने तुम्हाला दिवसभर उत्साही राहण्यास मदत होऊ शकते. जिलेबी इतर अनेक आजारांवरही रामबाण उपाय म्हणून काम करते.
  • जिलेबी अनेक प्रकारे फायदेशीर आहे; पण दूध आणि जिलेबीचे मिश्रण सेवन केल्याने पचनसंस्था सुधारण्यास आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होऊ शकते.
  • फक्त मधुमेहींनी जिलेबी खाताना सावधगिरी बाळगावी. कारण- त्यामुळे त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. तसेच सकाळी लवकर जिलेबी खाणे फायदेशीर असले तरी ते सर्वांसाठीच योग्य नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच जिलेबीचे सेवन करावे. मधुमेह, हृदयरोग इत्यादी आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी जिलेबी खाणे टाळावे.