Amazing health benefits of raisins: मनुका हे एक सुके फळ असून, मुळात ती वाळवलेली द्राक्षेच असतात. त्यांची गोड आणि आंबट चव खूप लोकप्रिय आहे. ते सर्वांत लोकप्रिय सुक्या फळांपैकी एक आहे. द्राक्षांच्या पौष्टिक मूल्याबद्दल बोलायचे झाल्यास, ती अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे व खनिजांनी समृद्ध असतात. बहुतेक भारतीय घरांमध्ये मनुके सुके आणि भिजवलेले अशा दोन्ही प्रकारे खाल्ले जातात. आता प्रश्न असा निर्माण होतो की, भिजवलेले मनुके आरोग्यासाठी फायदेशीर आहेत का?

होमिओपॅथिक डॉक्टर लोकेंद्र गौर यांच्या मते, मनुके हे वर्षभर सहज उपलब्ध होणारे आणि परवडणाऱ्या दरात मिळणारे एक सुके फळ आहे. चार दिवस त्याचे सेवन केल्याने असंख्य आरोग्यदायी फायदे मिळतात. मनुका नैसर्गिकरीत्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असतात. खाण्यापूर्वी ते भिजवल्याने त्यातील आणखी घटक बाहेर पडतात. चला तर, तज्ज्ञांकडून जाणून घेऊया की, मनुके शरीराला कोणते फायदे देतात आणि त्यांचे सेवन कसे करावे…?

रक्तदाब नियंत्रित करतात

मनुक्यांमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, जे शरीरातील क्षारांचे प्रमाण संतुलित ठेवते आणि रक्तदाब नियंत्रित करते. त्याव्यतिरिक्त, मनुक्यांमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात, जे रक्तवाहिन्यांमधील कडकपणा कमी करतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

यकृतातील विषारी द्रव्ये काढून टाकतात

मनुके खाल्ल्याने यकृतातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात. जर तुमच्या यकृतामध्ये विषारी द्रव्ये असतील, यकृताला इजा झाली असेल, सूज आली असेल किंवा यकृत कमजोर झाले असेल, तर तुम्ही मनुके खाल्ले पाहिजेत. मनुका हे एक असे सुके फळ आहे, जे यकृताच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी प्रभावी आहे.

क्तातील अशुद्धता दूर करतात

मनुके खाल्ल्याने रक्तातील अशुद्धता दूर होण्यास मदत होते. पाण्यात भिजवलेले मनुके खाल्ल्याने दुप्पट फायदा होतो. दररोज सात-आठ मनुके पाण्यात भिजवून, त्यांचे सेवन करणे फायदेशीर ठरेल.

पचनक्रिया सुधारण्यासाठी भिजवलेले मनुके खा

भिजवलेले मनुके नैसर्गिक आहारातील तंतुमय पदार्थांचा (फायबरचा) उत्तम स्रोत आहेत. भिजवलेले मनुके शौचाला साफ होण्यास, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यास आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

कॅल्शियमची कमतरता भरून काढते

कॅल्शियमची कमतरता असलेले लोक भिजवलेले मनुके खाऊ शकतात. ऑस्टिओपोरोसिस, हाडांची कमजोरी व हाडांची झीज यांसारख्या हाडांच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी भिजवलेले मनुके प्रभावी ठरतात.