Skin Care: त्वचेवर साबण लावावा की बॉडीवॉश? कशाचा वापर आहे फायदेशीर, जाणून घ्या

आपले शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आंघोळ करणे आवश्यक आहे. जेणेकरुन तुम्हाला ऍलर्जी, खाज आणि इतर कोणत्याही प्रकारची त्वचेची समस्या होणार नाही. यासाठी तुम्ही योग्य साबण किंवा बॉडी वॉश वापरणे सर्वात महत्त्वाचे आहे.

Skin Care: त्वचेवर साबण लावावा की बॉडीवॉश? कशाचा वापर आहे फायदेशीर, जाणून घ्या
त्वचेवर साबण लावावा की बॉडीवॉश?( फोटो: संग्रहित फोटो)

Skin Care: पावसाळ्यात विशेषतः त्वचेची काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र, त्वचेची काळजी घेताना त्वचेवर साबण लावावा की फेसवॉश लावावा हा मोठा प्रश्न प्रत्येकाला पडतो. बघायला गेलं, तर दोघांचेही स्वतःचे वेगवेगळे फायदे आहेत. साबण त्वचेवर साचलेली घाण साफ करण्याचेही काम करते आणि बॉडी वॉशमुळे शरीरावर साचलेली अशुद्धताही साफ होते. चला तर मग जाणून घेऊया साबण त्वचेसाठी फायदेशीर आहे की बॉडी वॉश.

बॉडी वॉश आणि साबणाचे फायदे

मॉइश्चरायझिंग

बॉडी वॉश द्रव स्वरूपात असतात. यामुळे त्वचेच्या संबंधित समस्या इतर कोणालाही पसरत नाहीत. बॉडी वॉश शरीराला मॉइश्चरायझ करते. साबणाने अंघोळ केल्याने शरीरात कोरडेपणा राहतो. तसंच तुमच्यासोबत इतरही तोच साबण वापरतात आणि साबण उघडा राहतो. त्यामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता जास्त असते. पण बॉडी वॉश पॅकच राहतो आणि त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता कमी असते.

( हे ही वाचा: गरोदरपणाची लक्षणे दिसूनही रिपोर्ट निगेटिव्ह येत आहेत? मग जाणून घ्या यामागची मुख्य कारणे)

कोरडी त्वचा (dry skin)

ज्यांची त्वचा कोरडी आहे ते बॉडी वॉश वापरू शकतात. कारण बॉडी वॉशमध्ये असे हायड्रेटिंग घटक असतात जे शरीराला मॉइश्चरायझ करतात. कोरडी त्वचा असणाऱ्यांसाठी बॉडी वॉश खूप फायदेशीर आहे. तसंच, बाजारात अनेक प्रकारचे साबण उपलब्ध आहेत जे सामान्य साबणापेक्षा कोरड्या त्वचेसाठी अधिक फायदेशीर आहेत. तेही तुम्ही वापरू शकता. मात्र, कोरड्या त्वचेसाठी बॉडीवॉश वापरणे फायदेशीर ठरेल.

संवेदनशील त्वचा (sensitive skin)

संवेदनशील त्वचा असलेले लोक बॉडी वॉश वापरू शकतात. जेव्हा ते इतर कोणताही साबण वापरतात तेव्हा त्यांना त्वचेची ऍलर्जी होऊ शकते. यासोबतच तुम्हाला सोरायसिस, मुरुम इत्यादी गंभीर त्वचेचे आजार असले तर तुम्ही बॉडी वॉश वापरू शकता. यामुळे, ही समस्या इतर कोणालाही पसरणार नाही आणि घरातील बाकीचे लोक देखील ते बॉडी वॉश वापरू शकतात. सहसा साबण घरातील सर्व सदस्य वापरतात. जे त्वचेसाठी चांगले नाही आणि त्वचेची ऍलर्जी होण्याची शक्यता असते.

( हे ही वाचा: Blood Purifying Foods: नैसर्गिकरित्या रक्त स्वच्छ करण्यासाठी ‘हे’ पदार्थ खा; औषधं-गोळ्यांची गरज भासणार नाही)

तेलकट त्वचा (oily skin)

तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी बॉडी वॉश खूप फायदेशीर ठरू शकतो. कारण यामध्ये त्वचेतील तेलकट घटक दूर करणारे घटक असतात. तेलकट त्वचा असलेले लोक बॉडी वॉश वापरू शकतात. त्याच वेळी, बायो साबण तेलकट त्वचेशी संबंधित समस्या दूर करतो. तुम्ही बदाम, मार्गोसा आणि खोबरेल तेल असलेले साबण देखील वापरू शकता. कारण त्यात पौष्टिक गुणधर्म असतात. जे तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे. यासोबतच या साबणांमध्ये हळद देखील टाकली जाते जी अँटी-बॅक्टेरियल आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Soap or body wash find out what is beneficial gps

Next Story
किडनी स्टोन असल्यास ‘या’ गोष्टी नक्की खा; लवकरच समस्येपासून सुटका मिळेल
फोटो गॅलरी