पूर्वी बातमीसाठी लोक पूर्णपणे वर्तमानपत्र, टीव्ही चॅनल्सवर अवलंबून रहायचे. पण आता वर्तमानपत्र व टिव्ही चॅनेलवर बातमी येते मात्र तिचा प्रसार होतो सोशल मीडियावर. त्यामुळेच सगळे वृत्तसमूह आता केवळ आपल्या माध्यमावर अवलंबून न राहता सोशल मीडियाचा अवलंब करतात. एखादी मोठी घटना घडल्यानंतर अल्पावधीत ती फेसबुक व व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून लोकांच्या मोबाईलवर जाते आणि वणवा पेटावा तशी ती बातमी सर्वतोमुखी होते. आता त्याच्यापुढे एक पाऊल पडत आहे, ते म्हणजे सोशल मीडियाचा वापर केवळ बातमीच्या प्रसारासाठी होत नाही तर बातमीच्या उगमासाठी होतो. प्रसारमाध्यमे केवळ आपल्या बातम्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम म्हणून फेसबुक, टि्वटरकडे पाहत नाहीत तर या माध्यमांचा वापर बातम्या मिळवण्यासाठी करतात.

त्यामुळे सोशल मीडिया हा ही बातमीचा एक प्रमुख स्त्रोत बनला आहे. बिन चेहऱ्याचा हा बातमीदार समाजात खळबळ उडवून देण्याबरोबरच मोठा बदलही घडवून आणत आहे. पत्रकारांसाठी सोशल मीडिया आज दुहेरी फायद्याचे माध्यम बनले आहे. फेसबुक, टि्वटरवर आपल्या बातमीची लिंक पोस्ट करुन ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येते तसेच त्यावरुन एखादी बातमी सुद्धा मिळवता येते. डान्सिंग काका, डान्सिंग काकू आणि त्याआधी दिराच्या लग्नात लो चली मैं गाण्यावर ठेका धरणारी डान्सिंग वहिनी यांच्या व्हिडिओनी आधी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला नंतर ते बातमीचा विषय बनले.

entrepreneur and digital freelancer Saheli Chatterjee
सोशल मीडियावर ११० रुपयांनी सुरू झाली कमाई; आता आहे कोट्यावधींची मालकीण! जाणून घ्या ‘या’ उद्योजिकेचा प्रवास
Sudhir Mungantiwar reacts on social media trolling about controversial statement against congress
“काँग्रेसविरोधात मी असाच बोलत राहणार,” सोशल मीडियावरील ट्रोलिंगला सुधीर मुनगंटीवार यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “भाषणाचा अर्धवट व्हिडिओ…”
Newspaper hack
Kitchen Hack : फ्रिजमध्ये ठेवा रद्दी वृत्तपत्र अन् पाहा काय होईल कमाल, Viral Video येथे बघा
non marathi mobile phone professionals
अमराठी भ्रमणध्वनी व्यावसायिकांना समज, दुरुस्ती काम न करण्याचा मनसेचा इशारा

मुंबईत घाटकोपरला विमान कोसळलं त्यानंतर तिथल्या लोकांनी मोबाईलवर फोटो काढले, व्हिडीयो काढले आणि ते सोशल मीडियावर टाकले त्यानंतर तात्काल प्रसारमाध्यमांनी त्याची दखल घेतली. अशी अनेक उदाहरणं देण्यात येतील ज्यामध्ये सोशल मीडियावर आधी बातमी आली मग ती अधिकृत प्रसारमाध्यमांमध्ये आली. याचं आणखी एक उत्कृष्ट उदाहण म्हणजे अमेरिकेने केलेला ओसामा बिन लादेनचा खात्मा. तिथल्या एका स्थानिकानं या घटनेचं शुटिंग केलं व ते ट्विटरवर टाकलं, त्यालाही नंतर कळलं की त्यानं जे वर्णन केलं आहे ते ओसामाच्या खात्म्याच्या तयारीचं आहे.

आज सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची, पोस्टची प्रसारमाध्यमांकडून दखल घेतली जाते. त्यातून बातमी शोधली जाते. टीव्ही चॅनल्स तर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओचा अक्षरक्ष किस काढतात. काही वृत्त वाहिन्यांवर तर व्हायरल सत्य या नावाने अर्ध्या-अर्ध्या तासाचे बातमीपत्र चालवले जाते. यात व्हायरल व्हिडिओमागे किती सत्य आहे, किती खोटेपणा आहे त्याची माहिती लोकांना दिली जाते. मनोरंजनाचा भाग सोडला तर अनेक गंभीर विषयांवरही सोशल मीडियाने महत्वाची भूमिका बजावली आहे.

#METOO हा हॅशटॅग तर जगभरात ट्रेंडिंगमध्ये होता. या हॅशटॅगमधून संपूर्ण जगामध्ये एक चळवळ उभी राहिली. अनेक महिलांनी #METOO या हॅशटॅगचा वापर करुन त्यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाला वाचा फोडली. वर्षानुवर्षे मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात दबून राहिलेला असंतोष त्यांनी बाहेर काढला. अनेक महिलांनी स्वत:हून पुढे येत त्यांचे लैंगिक अत्याचाराचे अनुभव सांगितले. यात अभिनेत्री, प्रतिथयश महिलाच नव्हे तर सर्वसामान्य महिलाही होत्या.

पूर्वी अन्याय झाला कि, सर्वसामान्य वर्तमानपत्राच्या किंवा टीव्ही चॅनल्स ऑफिसमध्ये धाव घ्यायचे. पण आता लोकांना फेसबुक, टि्वटरचा पर्याय उपलब्ध झाला आहे. लोक फोटो, व्हिडिओसह तक्रार पोस्ट करतात. त्यातून माध्यमांना बातमी मिळते. मध्यंतरी मध्य प्रदेशात भररस्त्यात मॉडेलचा विनयभंग झाला होता. त्यामध्ये ती जखमी झाली होती. तिने सर्वातआधी टि्वटरवर फोटो पोस्ट करुन या घटनेची माहिती दिली. एकूणच फेसबुक, टि्वटरचा मीडियावर प्रभाव असून बातमीदारीचे विश्व मोठया प्रमाणात बदलून टाकले आहे. आता सोशल मीडिया केवळ बातम्या पोचवण्याचे माध्यम राहिले नसून बातम्या पुरवणारा स्त्रोत बनला आहे.