1Sonam Wangchuk Health : ‘नीट’ परीक्षेतील भ्रष्टाचार व गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत जंतर-मंतरवर बेमुदत उपोषणाला बसलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ५९ वर्षीय सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावू लागली आहे. वांगचुक यांच्या उपोषणाचा सोमवारी १६ वा दिवस होता. त्यांच्या ढासळणार्‍या प्रकृतीमुळे कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलकांची चिंता वाढू लागली आहे.

उपोषण सरु केल्यापासून त्यांचे वजन ८.२ किलोग्रॅमने कमी झाले आहे. त्यांचा रक्तदाब(ब्लड प्रेशर) १०७/७० mmHg इतका असून रक्तातील साखरेची पातळी (ब्लड शुगर) ६७ mg/dL घसरली असून त्यांची आरोग्याला धोका वाढला आहे. इतक्या दिर्घकाळासाठी उपवास केल्यानंतर शरीरावर कसा परिणाम होतो याबाबत तज्ज्ञांचे मत काय आहे हे जाणून घेऊ या.

वैज्ञानिक आणि वैद्यकीयदृष्टीकोनांतून समजून घेऊ या की, इतक्या दिर्घकाळासाठी उपाशी राहिल्याने शरीरातील अंतर्गत प्रणाली, मुत्रपिंड(kidney), हृदय(Heart) आणि मेंदू (Brain) यांच्यावर काय परिणाम होतो आणि ही स्थिती कधी आप्तकालीन स्थिती ठरू शकते?

जनसत्ताला माहिती देताना, गुडगाव(गुरुग्राम)च्या मारेन्गो हेल्थ केअरचे मधुमेह आणि लठ्ठपणा विभागाचे संचालक आणि प्रमुख डॉ. पारस अग्रवाल, यांच्या मते, (१६ दिवस) इतक्या दिर्घकाळासाठी उपोषण केल्याने योग्य पोषकतत्वांशिवाय शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलन आणि शरीरावर मोठा परिणाम होतो.

८ किलो वजन कमी होणे चिंतेचा विषय (8 kg weight loss is a matter of concern)

डॉक्टरांनी सांगितले की, १६ दिवसांमध्ये साधरण ८.५ किलोग्रॅम वजन कमी होणे सामन्य मानले जात नाही. दीर्घकाळापर्यंत अन्न न खाल्यास शरीर सर्वात आधी उर्जेसाठी साठवलेल्या चरबीचा उपयोग करते, पण हळू हळू स्नायूंचे देखील नुकसान होण्यास सुरुवात होते. हे शरीरासाठी हानिकारक स्थिती आहे आणि ते हलक्यात घेऊ नये.

ब्लड शुगर ६७ mg/dL असेल तर आरोग्याला धोका आहे का? (Is blood sugar healthy if it is 67 mg/dL?)

डॉक्टरांच्या मते, सामन्यत: फास्टिंग ब्लड शुगर ७०mg/dLपेक्षा खाली घसरू नये. शरीर कित्येक जैविक प्रक्रियांमधून ब्लड शुगरमध्ये या पातळीच्या आसपास ठेवण्याचा प्रयत्न करते. पण ६७mg/dL हे लो ब्लड शुगर मानले जाईल. दीर्घकाळापर्यंत जेवण न केल्यास ब्लड शुगर कमी होऊ शकते पण शरीर ही पातळी राखण्यासाठी ऊतींचा आणि साठवलेल्या उर्जेचा वापर करते ज्यामुळे शरीराचे नुकसान वाढू शकते.

ब्लड शुगरमुळे कोण-कोणते लक्षण दिसत आहेत? (What are the symptoms of blood sugar?)

रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यावर व्यक्तीला खूप अशक्तपणा जाणवू शकतो. याशिवाय, चक्कर येणे, डोके हलके वाटणे, हात थरथरणे, घाम येणे आणि तीव्र भूक लागणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात. परंतु जर एखादी व्यक्ती उपवास करत असेल, तर ती खाऊन ही लक्षणे दूर करू शकत नाही, ज्यामुळे धोका वाढू शकतो.

ब्लड शुगर पातळी कोसळणे शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याचा संकेत (A drop in blood sugar levels is a sign of low water levels in the body)

डॉक्टर पारस यांच्यामते १०७/७० mmHg इतके ब्लड प्रेशर दीर्घकाळाच्या ‘उपोषणादरम्यान शरीरात निर्जलीकरण म्हणजे पाण्याची पातळी कमी होऊ शकते. जर शरीराला आवश्यक पुरेसे तर द्रव पदार्थ मिळाले नाही तर रक्तदाब आणखी कमी होऊ शकतो ज्यामुळे व्यक्ती बेशुद्ध होऊ शकतो किंवा इतर गंभीर गुंतागुंती होण्याचा धोका वाढतो.

इलेक्ट्रोलाइट असंतुलन गंभीर स्थिती निर्माण करू शकते (Electrolyte imbalance can cause serious conditions)

डॉक्टर पारस यांच्यामते, बऱ्याच काळ अन्न किंवा द्रव पदार्थांचे सेवन केल्याने शरीरात सोडीयम आणि पोटॅशिअरम सारख्या इलेक्ट्रोलाइट्सचे तुलन बिघडू शकते. इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलनामुळे सामान्य कामावरही विपरित परिणाम होतो आणि ही अस्थान वैद्यकिय आपात्कालीन स्थिती ठरू शकते. त्यामुळे अशा आंदोलकांची/रुग्णांची नियमित वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे

दिर्घकाळापासून उपाशी राहिल्याने हृदय, मुत्रपिंड आणि मेंदूवर परिणाम होतो (Prolonged starvation affects the heart, kidneys, and brain)

डॉक्टरांनी सांगितले की, दीर्घकाळ उपवास केल्याने शरीरातील जवळपास सर्वच अवयवांवर परिणाम होऊ शकतो. पण सर्वात जास्त परिणाम हृदय आणि मुत्रपिंड आणि मेंदूच्या कार्यावर होतो. सातत्याने पोषण आणि पाणीच्या कमतरतेने या लोकांच्या अवयवांची कार्यक्षमता प्रभावित होऊ शकते.

कोणते लक्षण दिसल्यास त्वरित हॉस्पिटलमध्ये भरती केले पाहिजे (If any symptoms appear, you should be hospitalized immediately)

साधरणत: उपोषण करणाऱ्या व्यक्तीला अत्याधिक अशक्तपणा जाणवत असेल, व्यवस्थित बोलता येत नसेल, वारंवार चक्कर येत असेल, रक्तदाब कमी होत असेल किंवा त्यांच्या बोलण्याच्या क्षमतेत बदल दिसत असेल तर त्यास गंभीर संकेत मानले पाहिजे. अशा स्थितीत उशीर न करता वेळीच हॉस्पिटलमध्ये भरती करा.

रोज कोण-कोणती तपासणी आवश्यक आहे? (Which checks are necessary daily?)

डॉक्टरांच्या मते, दिर्घकाळापासून उपाशी असलेल्या व्यक्तीला मेडिकल टीमला नियमित देखरेखीची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत खालील तपासणींची आवश्यकता असते.

  • ब्लड शुगरची चाचणी
  • सोडीयम पोटॅशिअमसह इलेक्ट्रोलाईट्सची चाचणी
  • किडनी फंक्शन चाचणी
  • रक्तदाब आणि इतर महत्त्वाच्या शारीरिक क्रियांचे निरीक्षण
  • उपोषण संपल्यानंतर बरे होण्यासाठी वेळ लागतो

डॉक्टरांनी सांगितले की, दीर्घकाळापासून उपोषणानंतर शरीराला सामान्य स्थितीमध्ये येण्यासाठी वेळ लागतो. रिकव्हरी अवधी शरीराची स्थिती आणि पोषण स्तर आणि उपोषणाचा कालावधीवर अवंलबून असते. त्यामुळे उपवास समाप्त झाल्यानंतरीही डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहणे आणि संतुलित पोषण अत्यंत आवश्यक आहे.

काय आहे आंदोलकांची मुख्य मागणी? ( What is the main demand of the protesters?)

  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा.
  • कथित परीक्षा अनियमिततेमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची नुकसान भरपाई.
  • परीक्षा प्रणालीमध्ये उत्तरदायित्व आणि पारदर्शकता सुनिश्चित करणे.
  • सीजेपीचे हे आंदोलन २० जूनपासून सुरु झाले आहे. संघटनेने २० जुलै रोजी संसदेवर शांततापूर्ण मोर्चा काढण्याची घोषणाही केली आहे.