दिवसेंदिवस वाढत चाललेले ऑनलाइन व्यवहार बघता हे व्यवहार अधिक सुरक्षित करण्याची गरज आहे. रोज ऑनलाइन फसवणुकीच्या घटनाही घडत असतात. लोक आजकाल सहजपणे करता येणाऱ्या खरेदी मार्गाचा अर्थात ऑनलाइन खरेदीचा मार्ग जास्त वापरत आहेत. आपल्या आवडत्या शॉपिंग साईटवर तर अनेकदा आपल्या कार्डचे तपशीलही काहीजण सेव्ह करून ठेवतात. पण केवळ सीव्हीव्ही क्रमांक ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी पुरेसा असू शकत नाही असं आरबीआयचं मत आहे. कार्डची माहिती सुरक्षित करण्याच्या प्रयत्नात ग्राहकांना त्यांचे सर्व कार्ड तपशील अर्थात नाव, १६ -अंकी कार्ड क्रमांक आणि कालबाह्यता तारीख आणि प्रत्येक ऑनलाइन पेमेंटसाठी CVV प्रविष्ट करणे अनिवार्य करण्याची केंद्रीय बँक योजना करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार नवीन नियम जानेवारी २०२०  पासून लागू होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय असेल नियम?

सुधारित नियम असा असू शकतो, की प्रत्येक वेळी जेव्हा कोणी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर खरेदी करेल आणि त्याचं पेमेंट पेटीए, गुगल पे द्वारे पैसे देते करेलं तेव्हा त्यांना दरवेळी पुन्हा सगळा तपशील टाकावा लागणार आहे. ओटीती मंच जसं की नेटफ्लिक्सच्या सबस्क्रिप्शनचे नूतनीकरण (रिचार्ज) करतानाही पुन्हा सगळा तपशील टाकावा लागणार आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soon 16 digit number use for online payments will have new rules for customer safety and data security ttg
First published on: 24-08-2021 at 13:30 IST