भाऊबीजेनिमित्त ‘बेस्ट’कडून महिलांना खास दिवाळी गिफ्ट; चालवणार विशेष एसी बस

बेस्ट कडून महिलांसाठी बस प्रवास अधिक आरामदायी होण्यासाठी महिला प्रवाशांसाठी १३७ बस फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.

sepical best bus for bhaubeej
मुंबईत ‘भाऊ बीज’ निमित्त बेस्ट महिला विशेष एसी बस चालवणार (फोटो: Indian Express File photo)

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहनने (BEST) ६ नोव्हेंबरपासून ‘भाऊ बीज’ निमित्त लेडीज स्पेशल आणि ‘लेडीज फर्स्ट’ बसेस पुन्हा सुरू करणार आहेत. बुधवारी, बेस्टने शहर आणि उपनगरातील ७० मार्गांवर १०० बस फेऱ्यांना परवानगी दिली. आवश्यक महिला विशेष बसेसची संख्या ओळखल्यानंतर, उपक्रम त्यांना कलर-कोड करेल.

सध्या सुरू असलेल्या ३७ ट्रीपव्यतिरिक्त, शनिवारपासून मुंबईतील ७० मार्गांवर महिलांसाठी आणखी १०० बस जोडणार आहेत. या नवीन जोडण्यात आलेल्या इलेक्ट्रिक बसेस असतील आणि बेस्टच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यातील ९० टक्के वातानुकूलित असतील. उर्वरित १० टक्के बस नवीन नॉन-एसी, सीएनजी बस असतील.

“आम्ही महिला प्रवाशांसाठी १३७ बस फेऱ्या चालवणार आहोत. आता अधिक लोक प्रवास करत असल्याने, महिलांसाठी बस प्रवास अधिक आरामदायी बनवायचा आहे. बसमध्ये दररोज सरासरी २८ लाख एकूण प्रवासी प्रवास करतात, त्यापैकी १०-१२ टक्के महिला प्रवासी आहेत” असं बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र म्हणाले.

(हे ही वाचा: Gold Silver: दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोन्याच्या भावात घसरण; जाणून घ्या आजचा दर )

कोणत्या मार्गावर धावणार विशेष बस?

एकूण ७० मार्गांपैकी महिला विशेष बस फक्त १० मार्गांवर धावतील ज्यात दक्षिण विभागातील आठ आणि मध्य विभागातील दोन मार्गांचा समावेश आहे. या दोन झोनमधील आगारांमध्ये कुलाबा, बॅकबे, वरळी, वडाळा, कुर्ला, धारावी आणि मजास या आगारांचा समावेश आहे, तेथून या बसेस सुटतील आणि येतील. पश्चिम विभागात एकही नाही. उर्वरित ६० मार्गांवर ‘लेडीज फर्स्ट’ मार्ग असतील.

“या लेडीज फर्स्ट मार्गांवर, महिलांना बसमध्ये चढण्यासाठीही प्रथम प्राधान्य मिळेल. जर बहुतेक प्रवासी महिला असतील तर ते आपोआप लेडीज स्पेशल बसच बनतील,” बेस्टच्या अधिकाऱ्याने सांगितले. विशेषत: गर्दीच्या वेळी गर्दीचे मार्ग निवडले गेले आहेत आणि यामुळे महिला ऑफिसर्स आणि /लांब बसच्या रांगेत थांबलेल्या इतरांना दिलासा मिळेल.

(हे ही वाचा: Vastu Tips: दिवाळीच्या दिवशी घरात आवर्जून करा ‘या’ पाच गोष्टी )

ओपन-डेक पर्यटक बस

बुधवारी, बेस्टने गेटवे ऑफ इंडिया-मंत्रालय-मरीन ड्राईव्ह-चर्चगेट-सीएसएमटी आणि मागे जाणाऱ्या नव्याने नूतनीकरण केलेल्या ओपन-डेक पर्यटक बसचे उद्घाटन केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Special diwali gift to women from best on the occasion of bhaubeej special ac bus to run ttg

ताज्या बातम्या