पाणी आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. चांगल्या आरोग्यासाठी दिवसभरात किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिण्याचा सल्लाही तज्ज्ञ देतात, मात्र पाणी पिणे पुरेसे नाही, तर आपण पाणी कसे पितो हेही खूप महत्त्वाचे आहे. बहुतेक लोक उभे राहून पाणी पितात. आजच्या धावपळीच्या जीवनात आणि घाईगडबडीत लोक उभे राहून पाणी पितात किंवा थेट बाटलीतून पाणी पितात, पण उभे राहून पाणी प्यायल्याने आपण अनेक आजारांना कुठेतरी आमंत्रण देतो. ही स्थिती आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असू शकते. त्यामुळे ही सवय आजच सोडलेली बरी. उभे राहून पाणी प्यायल्याने आपल्या आरोग्यावर कोणते गंभीर परिणाम होतात जाणून घेऊया.

  • ऑक्सिजन पुरवठ्यावर परिणाम होतो

जेव्हा आपण उभे राहून पाणी पितो तेव्हा शरीराला आवश्यक ते पोषण मिळत नाही. त्याचा वाईट परिणाम केवळ फुफ्फुसावरच नाही तर हृदयावरही होतो. उभे राहून पाणी प्यायल्याने पोटात पाण्याचे प्रमाण वाढते, ज्यामुळे पोटाच्या खालच्या भागात दाब निर्माण होतो आणि अशा स्थितीत लोक हर्नियाचे शिकार होतात.

printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
cabbage for weight loss
तुमच्या घरी कायम असणारी ‘ही’ भाजी वाढलेले वजन झपाट्याने करेल कमी; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश
Rural Health Services pregnant woman from Nandurbar lost her life due to lack of timely medical care
ग्रामीण आरोग्य सेवा : ठसठसती जखम!
  • तणाव वाढतो

उभे राहून पाणी प्यायल्याने तुमचा ताण वाढतो. तज्ज्ञांच्या मते, उभे राहून पाणी पिण्याचा थेट परिणाम मज्जासंस्थेवर होतो आणि अशा स्थितीत पोषक तत्व पूर्णपणे निरुपयोगी ठरतात. याच कारणामुळे शरीराला तणावाचा सामना करावा लागतो.

हे ही वाचा : घरातील ‘हा’ पदार्थ कोलेस्ट्रॉल, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा झटपट करेल कमी; कसे ते जाणून घ्या

  • सांधेदुखी वाढते 

उभे राहून पाणी प्यायल्याने गुडघे दुखतात, असे तुम्ही वडीलधाऱ्यांकडून अनेकदा ऐकले असेल. हे अगदी खरे आहे. उभे राहून पाणी प्यायल्याने गुडघ्यांवर दाब पडतो, त्यामुळे सांधेदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागते.

  • किडनीवर परिणाम

उभे राहून पाणी पिण्याच्या या सवयीचा थेट परिणाम तुमच्या किडनीवरही होतो. जेव्हा एखादी व्यक्ती उभे राहून पाणी पिते तेव्हा पाणी गाळल्याशिवाय पोटाच्या खालच्या बाजूकडे वेगाने जाते आणि पाण्यातील अशुद्धता पित्त मूत्राशयात जमा होते. ही स्थिती किडनीसाठी अत्यंत हानिकारक आहे.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)