आरोग्य विमा कंपनी स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्सने आपल्या ग्राहकांसाठी व्हॉट्सअ‍ॅप सेवा सुरू केली आहे. स्टार हेल्थने करोनाच्या काळात ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन ही सेवा सुरू केली आहे. ग्राहकांना ही सेवा मोफत आणि घरी बसून वापरता यावी यासाठी सेवा सुरू करण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांचा वेळही वाचणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून स्टार हेल्थचे ग्राहक एंड-टू-एंड सेवेचा लाभ घेऊ शकतात. कॅशलेस क्लेम दाखल करण्यापासून, ग्राहक मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर अनेक कामं चुटकीसरशी पूर्ण करू शकतात. व्हॉट्सअ‍ॅपवरील ही सेवा ग्राहकांसाठी नेहमीच सुरक्षित राहील. व्हॉट्सअ‍ॅप मेसेजिंग प्लॅटफॉर्मचे एन्क्रिप्शन हे सुनिश्चित करते की ग्राहकांसोबत शेअर केलेले तपशील सुरक्षित राहतील. याशिवाय, स्टार हेल्थचे ग्राहक कंपनीच्या चॅट असिस्टंट – ट्विंकल, कस्टमर केअर नंबर, एजंट, अधिकृत वेबसाइट, शाखा कार्यालय आणि स्टार पॉवर अ‍ॅपद्वारे विमा कंपनीपर्यंत पोहोचू शकतात. कंपनीने सांगितलेल्या नियमांनुसार, व्हॉट्सअ‍ॅप सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एकच मेसेज पाठवायचा आहे.

  • सर्वप्रथम तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवरून +९१ ९५९७६ ५२२२५ वर ‘HI’ मॅसेज पाठवा.
  • कंपनीच्या या सेवेद्वारे तुम्ही नवीन पॉलिसी सहज खरेदी करू शकता.
  • याशिवाय तुम्ही कॅशलेस क्लेम दाखल करू शकता.
  • तुम्ही तुमच्या सोयीनुसार पॉलिसी दस्तऐवज डाउनलोड करू शकता.

स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आनंद रॉय म्हणाले की, “व्हॉट्सअ‍ॅपची देशात प्रचंड लोकप्रियता आहे. म्हणूनच आम्हाला विश्वास आहे की हे एक चांगले व्यासपीठ आहे जे आम्हाला आमच्या ग्राहकांना उत्तम सेवा प्रदान करण्यात मदत करेलच पण त्यांच्याशी संवाद देखील वाढवेल. आम्हाला विश्वास आहे की या माध्यमातून पॉलिसीधारकांशी कधीही आणि कुठेही मदत करता करेल, विशेषत: जेव्हा त्यांना आमची सर्वात जास्त गरज असेल.”

Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा
Three major announcements for RBI customers investors
रिझर्व्ह बँकेच्या ग्राहक, गुंतवणूकदारांसाठी तीन प्रमुख घोषणा
Vacancies 2024 Intelligence Bureau Recruitment For 660 Various Posts Read For How to Apply and Other Details Her
IB Recruitment 2024: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची संधी! ‘या’ ६६० पदांसाठी बंपर भरती सुरू, जाणून घ्या सविस्तर
Kinetic Green introduces E Luna an electric scooter for gig workers
गिग’ कामगारांसाठी आता ई-लुना, कायनेटिक ग्रीन कंपनीचे पाऊल; १३० दुचाकींचे वितरण

करोनामुळे शुक्राणूंची संख्या कमी झाल्याबद्दल काळजी वाटते? हे पाच पदार्थ ठरतील बूस्टर

स्टार हेल्थ आपल्या ग्राहकांना रिटेल हेल्थ, ग्रुप हेल्थ, वैयक्तिक अपघात आणि परदेशी प्रवास यासारखे विविध विमा कवच देते. भारतीय आरोग्य विमा बाजारपेठेत १५.८ टक्के बाजारहिस्सा असलेली ही एक आघाडीची विमा कंपनी आहे.