How To Stop Breaking of Nails: एखाद्या मोठ्या कार्यक्रमाच्या आधी आपण केसाला लावायच्या रंगीत पिनांपासून ते पायातील पैंजणांपर्यंत पूर्णपणे तयारी करता. म्हणजे साधारणतः तुम्ही कपड्यांकडे बारकाईने लक्ष देता, चप्पल कोणती घालावी, दागिने कोणते निवडावे, मेकअप कसा करावा एकूण एक गोष्ट आपण नेटाने निवडता. पण अगदी एखादी बारीक गोष्ट राहून गेली तरी सगळा लुक खराब होऊ शकतो. उदाहरणार्थ, तुमची नखे. एकवेळ तुम्ही नखांना नेलपेंट लावली नसेल तरी चालेल पण जर तुमची नखे पिवळट पडली असतील, किंवा वाकडी तिकडी तुटली असतील, नखाभोवतीची त्वचा फाटली असेल किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नखात घाण अडकली असेल तर ते पाहायला खूपच वाईट वाटतं. त्याहीपेक्षा ही अस्वच्छता तुम्हाला घातक ठरू शकते.

जेव्हा तुमची नखं स्वच्छ नसतात तेव्हा ती तुटण्याची सुद्धा अधिक शक्यता असते. पण नखे तुटण्याचे हे एकमेव कारण नाही. आज आपण डॉ. सुषमा यादव, त्वचारोगतज्ञ, कॉस्मेटोलॉजिस्ट, केस ट्रान्सप्लांट सर्जन आणि स्किनोलॉजी सेंटरच्या संस्थापक, यांनी इंडियन एक्सस्प्रेसला नखांच्या आरोग्याविषयी दिलेली माहिती जाणून घेणार आहोत.

Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय
How To Grow Mogra in Small Pot Money Saving Hack
२ रुपयांच्या खडूने मोगऱ्याचं रोप कळ्यांनी गच्च भरून जाईल; लहान कुंडीत फुलबाग सजवण्याचा उपाय, पाहा Video
Habit of chewing gum is good or not for health know drawbacks and benefits
च्युइंगम खाताय? च्युइंगम खाण्याचे तोटे वाचून बसेल धक्का; ही सवय तात्काळ सोडा, अन्यथा..

नखे का तुटतात?

सतत हात धुणे, केमिकलयुक्त नेलपॉलिश वापरणे आणि अगदी जास्त ओलावा यामुळे नखांमध्ये कोरडेपणा येऊ शकतो, ज्यामुळे नखं तुटण्याची अधिक शक्यता असते.

वय हा एक घटक आहे: जसजसे वय वाढत जाते तसतसे नखांची वाढ मंदावते, ज्यामुळे नखे कोरडी होतात, कमकुवत होतात.

अंतर्निहित समस्या: काही वैद्यकीय परिस्थिती जसे की थायरॉईड समस्या, त्वचा रोग आणि पोषण कमतरता नखांच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात.

वारंवार जेल मॅनिक्युअर, नेल आर्ट आणि नेलपॉलिशमुळे तुमची नखे कमकुवत होऊ शकतात.

नखांचे वारंवार तुटणे कमी करण्यासाठी उपाय

 • हात सतत पाण्यात ठेवू नका, स्वच्छता करताना मोजे घालावेत जेणेकरून नखांमध्ये धूळ किंवा घाणीचे कण अडकून बसणार नाहीत.
 • मॅनिक्युअर सारख्या ट्रीटमेंट आपल्याला नखाच्या स्वच्छतेसाठी फायद्याच्या ठरू शकतात पण वारंवार जेल नेलपेंट लावणे किंवा कृत्रिम केमिकल वापरून स्वच्छता करणे टाळायला हवे.
 • प्रथिने आणि बायोटिनने समृद्ध असलेला संतुलित आहार नखांचा मुख्य घटक मजबूत केराटिन तयार करण्यात मदत करतो.
 • नखे चावणे टाळावे यामुळे तुमची नखे कमकुवत होतात आणि खराब होतात.
 • नख तुटणे थांबवण्यासाठी वेळोवेळी ट्रिमिंग आणि फायलिंग करा. यासाठी बाजारात अगदी स्वस्तात स्ट्रिप्स उपलब्ध असतात.
 • तुमच्या नखांना हायड्रेटेड ठेवण्यासाठी विना अल्कोहोलचे मॉइश्चरायझर लावा.
 • एसीटोन-असलेले नेलपॉलिश रिमूव्हर्स नखांचे नुकसान करू शकतात सौम्य रिमूव्हर वापरा.
 • नखांना रात्री पेट्रोलियम जेली लावावी जेणेकरून नखांना मजबुती मिळते.
 • अतिरिक्त पोषणासाठी नखे ऑलिव्ह ऑइल किंवा कोमट पाण्यात काही थेंब सुगंधी तेलाचे थेंब घालून त्यात नख भिजवा.
 • अतिरिक्त तणाव नखांचे नुकसान करू शकतो.

डॉ यादव यांनी पुढे सांगितल्याप्रमाणे, सामान्यतः घरगुती काळजी पुरेशी असली तरी, तुम्हाला खालील लक्षणे दिसल्यास आपण तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

हे ही वाचा<< झोपण्याआधी डोळ्यावर ‘ही’ वस्तू लावल्याने स्मरणशक्ती व एकाग्रता सुधारते? परीक्षांच्या काळात तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती

 1. तुमच्या नखांभोवती सूज किंवा लालसरपणा
 2. रक्तस्त्राव किंवा पू
 3. नखांमध्ये गंभीर बदल (रंग, डाग किंवा पोत)

गरज भासल्यास सल्ल्यासाठी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.