Fruits Storage Hacks : फळं खाणं शरीरासाठी फायदेशीर असते, त्यामुळे लोक विविध प्रकारची फळं आणून फ्रिजमध्ये स्टोअर करतात, जेणेकरून ती अधिक काळ टिकावीत. पण, काही फळं फ्रिजमध्ये न ठेवणं फायद्याचं असत, कारण ही फळं फ्रिजमध्ये ठेवल्यास लवकर खराब होतात आणि त्यांची चव उतरते. त्यातील पौष्टिक मूल्य कमी होऊ शकतात, त्यामुळे कोणती फळं फ्रिजमध्ये ठेवावीत, कोणती नाही याविषयी जाणून घेऊ…
कोणती फळं फ्रिजमध्ये ठेवू नयेत?
पपई
पपई फ्रिजबाहेर स्टोअर करावी. पण, जर ती चांगली पिकली असेल तर ती फ्रिजमध्ये ठेवता येते.
केळी
केळी फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांची बाहेरील साल काळी पडू शकते, ज्यामुळे ती लवकर खराब होतात, त्यामुळे रूम टेम्प्रेचरवरचं केळी नीट पिकतात.
आंबे
आंबे चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नयेत. जर आंबे पिकले असतील तर ते फ्रिजमध्ये ठेवता येतात, पण यामुळे त्यांची चव बिघडू शकते, त्यामुळे ते शक्यतो बाहेरच ठेवा.
अननस
अननस नेहमी रूम टेम्प्रेचरवर साठवला पाहिजे. कापल्यानंतरच तो फ्रिजमध्ये ठेवता येतो.
टरबूज
उन्हाळ्यात लोक खूप टरबूज खातात. पण, तो जर कापला नसेल तर तो बाहेर ठेवू शकता.??? पण, कापल्यानंतर तो एका डब्यात ठेवून फ्रिजमध्ये ठेवा.
फळं स्टोअर करण्याची योग्य पद्धत
फळं धुवून फ्रिजमध्ये साठवू नयेत, कारण फळांना पाणी लागल्यानंतर ती लवकर खराब होऊ शकतात. तसेच फळं फ्रिजमध्ये ठेवताना ती नेहमी खालच्या ड्रॉवरमध्ये (क्रिस्पर ड्रॉवर) साठवावीत.
ही फळं एकत्र साठवल्यास होऊ शकतात खराब
केळी, सफरचंद आणि आंबा यांसारखी अनेक फळं इथिलीन वायू सोडतात, ज्यामुळे ती एकाच भांड्यात ठेवल्यास लवकर पिकतात आणि खराब होतात, त्यामुळे ही फळं इतर फळांपासून दूर ठेवावीत.
कापलेलं फळं नेहमी फ्रिजमध्ये ठेवताना हवाबंद डब्याचा वापर करा, यामुळे ती लवकर खराब होणार नाही.
फ्रिजमध्ये अशी साठवा फळं
द्राक्षे:
द्राक्षे हवाबंद डब्यात किंवा छिद्र असलेल्या पॅकेटमध्ये न धुता ठेवावीत.
स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी:
उन्हाळ्यात स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी फ्रिजमध्ये ठेवाव्यात. उष्णतेमुळे बाहेर साठवल्यास ती लवकर खराब होतात.
डाळिंब आणि सफरचंद
डाळिंब आणि सफरचंददेखील फ्रिजमध्ये साठवता येतात. फ्रिजमध्ये ती दोन ते चार आठवडे ताजी राहतात. याव्यतिरिक्त किवी, मोसंबी आणि संत्री यांसारखी फळं फ्रिजमध्ये ठेवल्यास २-३ आठवडे टिकू शकतात.
