आपण आपले प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. इतिहासात अशा काही महत्वपुर्ण घटना घडलेल्या असतात त्यांच्या स्मरणार्थ आपण हे सण साजरे करतो. जस की दसरा, गुढीपाडवा, नवरात्र तसेच क्रिसमस, ईद असे सण साजरे करत असतो. कारण भूतकाळामध्ये त्यादिवशी काही चांगले घडले होते. असेच उत्सव साजरे होतात. तसेच दिवाळीचा हा तेजोमय, आनंदाचा, सुखाचा सण साजरा करण्यामागे देखील एक पौराणिक कथा आहे. चला तर मग जाणून घेऊयात या दिवाळीच्या कथा

दिवाळीच्या पौराणिक कथा


कार्तिक अमावास्येच्या दिवशी भगवान श्रीराम चौदा वर्षानंतर वनवास करून आणि लंकापती रावणचा नाश करून अयोध्या आले होते. या दिवशी भगवान राम यांच्या अयोध्येत आगमनाकरिता तेथील लोकांनी मोठ्या उत्सवात जल्लोषात त्यांचे स्वागत केले. तसेच या आनंदाने लोकांनी दिवे लावून उत्सव साजरा केला होता. तेव्हा पासून दिवाळीची सुरुवात झाली.

Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
hanuman jayanti 2024 date time shubh muhurat puja mantra and signification
Hanuman Jayanti 2024: २३ की २४ एप्रिल, यंदा हनुमान जयंती कधी आहे? जाणून घ्या योग्य तिथी, पूजेचा मुहूर्त, मंत्र आणि महत्त्व
sangeet natak akademi kolhapur marathi news
संगीत नाटक अकादमीच्या वतीने अंबाबाई मंदिरात बुधवार, गुरुवारी ‘शक्ती महोत्सवा’चे आयोजन

एक आणखीन कथे आहे, यात नरकासुर नावाच्या राक्षसाने आपल्या असुर शक्तींनी देवता आणि ऋषींना खूप त्रास दिला होता. या राक्षसाने साधू संतांच्या सोळा हजार स्त्रियांना बंदी केले होते. नरकासुरच्या वाढत्या अत्याचाराने चिंतीत देवी – देवता आणि साधू- संतांनी भगवान श्री कृष्णाकडे मदत मागितली. भगवान श्री कृष्णाने नरक चतुर्दशीला नरकासुराचा वध करून सर्वांना त्याच्या आतंकाने मुक्ती दिली. सोबतच सोळा हजार स्त्रियांना मुक्त केले. याच्या आनंदात दुसऱ्या दिवशी म्हणजे कार्तिक महिन्याच्या अमावास्येला लोकांनी आपल्या घरात दिवे लावले. तेव्हा पासून नरक चतुर्दशी आणि दीपावलीचा सण साजरा केला जातो. तसेच या व्यतिरिक्त दिवाळीला घेऊन अजून काही पौराणिक कारणं कथा आहेत.

दिवाळीला लक्ष्मी-गणेशाची पूजा कशी करावी? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि बीज मंत्र

धार्मिक मान्यतेनुसार ह्या दिवशी भगवान विष्णूने राजा बळीला पातळ लोकांचा स्वामी बनवले होते आणि इंद्राने स्वर्गाला सुरक्षित पाहून आनंदात दिवाळी साजरी केली होती. याच काळात समुद्र मंथनाच्या काळात क्षिरसागराने लक्ष्मी प्रगट झाली होती आणि त्यांनी भगवान विष्णूला पतीच्या स्वरूपात स्वीकार केले होते.