Stain Removal Tricks: अनेकांना सतत पांढऱ्या रंगाचे कपडे घालायला खूप आवडतात. परंतु, सततच्या वापरामुळे या कपड्यांवर काळे, पिवळे हट्टी डाग पडतात. अनेकदा हे चिवट डाग जाता जात नाहीत. अशा वेळी तुम्ही काही सोप्या टिप्सच्या मदतीने घरच्या घरी पांढऱ्या कपड्यांवरील चिवट डाग कमी करू शकता. या लेखात आम्ही तुमच्यासाठी काही उपाय घेऊन आलो आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही पांढऱ्या कपड्यांवरील डागदेखील सहजपणे काढून टाकू शकता.

पांढऱ्या कपड्यांवरील डाग काढण्यासाठी उपाय

सोडा आणि लिंबाचे मिश्रण

बेकिंग सोडा आणि लिंबाच्या मिश्रणाने तुम्ही पांढरे कपडे सहज स्वच्छ करू शकता. त्यासाठी एक चमचा बेकिंग सोड्यात अर्धा लिंबू पिळून पेस्ट बनवा. आता हे मिश्रण डाग असलेल्या भागावर लावा. सुमारे १५ मिनिटांनंतर ब्रशने हलके घासून घ्या. त्यानंतर तुम्ही ते स्वच्छ पाण्याने धुवा. या पद्धतीने तुम्ही तुमचे पांढरे कपडे सहजतेने स्वच्छ करू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पांढरे व्हिनेगर आणि डिटर्जंट पावडर

तुम्ही पांढऱ्या व्हिनेगर आणि डिटर्जंट पावडरच्या मदतीने पांढरे कपडेही स्वच्छ करू शकता. जर पांढऱ्या कपड्यांवर चिवट डाग असतील, तर त्यासाठी एक बादली गरम पाण्यात अर्धा कप पांढरे व्हिनेगर आणि एक चमचा डिटर्जंट पावडर मिसळून मिश्रण तयार करा आणि त्यात पांढरे कपडे ३० मिनिटे भिजवा. त्यानंतर डाग असलेली जागा व्यवस्थित चोळून स्वच्छ पाण्याने धुवा. या कृतीमुळे सर्वांत हट्टी डागदेखील सहजपणे निघून जातील.