scorecardresearch

Diabetes: स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये मधुमेह अधिक सामान्य का आहे? जाणून घ्या तज्ञांचे मत

मधुमेहाची प्रकरणे अनेकदा स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त आढळतात. पण का? या प्रश्नाकडे शास्त्रज्ञांचेही लक्ष लागले आहे. परिणामी यावर संशोधन झाले असून त्यापैकी नुकत्याच झालेल्या एका संशोधनाचे निष्कर्षही समोर आले आहेत.

संशोधनादरम्यान संशोधकांनी सुमारे २०० शोधनिबंधांचा अभ्यास केला. (photo credit: jansatta)

मधुमेहाची प्रकरणे अनेकदा स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त आढळतात. पण का? या प्रश्नाकडे शास्त्रज्ञांचेही लक्ष लागले आहे. परिणामी यावर संशोधन झाले असून त्यापैकी नुकत्याच झालेल्या एका संशोधनाचे निष्कर्षही समोर आले आहेत. महिलांपेक्षा पुरुषांना मधुमेह होण्याची शक्यता अधिक का असते याची काही कारणे यातून स्पष्ट होतात. त्यांच्याबद्दल जाणून घ्या.

कॅनडातील कॉनकॉर्डिया विद्यापीठातील संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. या विद्यापीठातील संशोधक कॅरी डेलेनी आणि सिल्व्हिया सॅंटोसा यांनी या अभ्यासाचे नेतृत्व केले. या अभ्यासाचा अहवाल ‘ओबेसिटी रिव्ह्यू’ जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. त्यांच्या संशोधनादरम्यान संशोधकांनी सुमारे २०० शोधनिबंधांचा अभ्यास केला. शरीरात साठलेली चरबी मधुमेह होण्यास आणि वाढविण्यात आपली भूमिका कशी बजावते हे पाहिले गेले आहे. यावरून असे दिसून आले की स्त्रिया आणि पुरुषांच्या शरीरात चरबी वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या प्रकारे साठवली जात असल्याने, मधुमेहाशी संबंधित परिस्थिती देखील भिन्न असल्याचे दिसून आले.

म्हणूनच पुरुषांमध्ये मधुमेह अधिक सामान्य आहे

कॉनकॉर्डिया युनिव्हर्सिटीच्या परफॉर्मन्स सेंटरमधील इतर तज्ज्ञांसमोर तिच्या संशोधन अभ्यासाचे निष्कर्ष सादर करताना कॅरी डेलनी ऊयणी सांगितले की, मधुमेहाचा पोटाभोवती साठलेल्या चरबीशी जवळचा संबंध आहे. महिलांच्या शरीरात ही चरबी त्वचेखालीच साठवली जाते, तर पुरुषांमध्ये अंतर्गत अवयवांभोवती चरबी जमा होते. इतकेच नाही तर पुरुषांमधील फॅट-सेल्स त्यांचा आकार वाढवतात. तर महिलांमध्ये त्यांची संख्या वाढते. मोठ्या आकाराच्या चरबीच्या पेशी नैसर्गिकरित्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला अधिक नुकसान करतात. म्हणूनच स्त्रियांपेक्षा पुरुषांनाही मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते.

दरम्यान मधुमेहावर संशोधन करून निष्कर्ष काढलेला हा अंतिम निकाल नाही. या विषयावर अजून संशोधनाची गरज आहे. असेही कॅरे यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Study finds origins of diabetes may different in men and women scsm98

ताज्या बातम्या