हिवाळा महिना सुरू झाला की आपल्याला थंडीची चाहूल लागते. या ऋतूमध्ये वातावरणात पसरलेल्या गाराव्यामुळे आपल्याला प्रसन्न वाटत असलं तरीही या ऋतूमध्ये अनेक आजारांचे प्रमाणही वाढते. हिवाळ्यात उद्भवणारी एक सामान्य समस्या म्हणजे सांधेदुखी. बहुतेकवेळा ही समस्या वयानुसार वाढत जाते. मात्र आता अनेकांना यामुळे त्रास होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सांधेदुखीची समस्या निर्माण झाल्यास व्यक्तीची संपूर्ण जीवनशैली विस्कळीत होते. पण वेळीच लक्षणे लक्षात आल्यास आपण या समस्येला वेळीच आळा घालू शकतो.

स्वस्थ राहण्यासाठी निरोगी आहार घेणे अतिशय आवश्यक आहे. यामुळे आपण अनेक आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकतो. सांधेदुखीची समस्या कमी करण्यासाठीही आपण आहारात काही गोष्टींचा समावेश करू शकतो. या पदार्थांच्या मदतीने सांधेदुखीची समस्या तर दूर होऊ शकते, पण त्याचबरोबर हिवाळ्यात आपल्या शरीराचा अनेक आजारांपासून बचाव करणेही शक्य होऊ शकते. हे पदार्थ कोणते आहेत ते जाणून घेऊया.

Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स
  • पपई

पपई हे फळ आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. यामध्ये फायबर आणि व्हिटॅमिन सीची मात्रा मुबलक प्रमाणात असते. पपई आपली रोगप्रतिकरक शक्ती मजबूत करते पण त्याचबरोबर ते सांधेदुखी कमी करण्यासही मदत करते.

महागड्या औषधांशिवायच कमी करता येईल उच्च रक्तदाबाची समस्या; जाणून घ्या, कसं

  • बदाम

हिवाळ्यात बदाम खाणे चांगले मानले जाते. यामध्ये असणारे ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड अवयवांना सूज येणे किंवा गाठ येण्यासारख्या समस्या कमी करण्यास मदत करते. तसेच हिवाळ्यामध्ये बदामाचे सेवन केल्याने शरीर आतून गरम राहते.

  • लसूण

जेवणाची चव वाढवण्यासाठी लसूणचा वापर होतो. तसेच लसूण आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते. यांचे सेवन केल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो. लसूणमध्ये सांधेदुखीच्या समस्येपासून आराम देणारे अनेक गुणधर्म असतात.

  • ब्रोकली

ब्रोकली ही अशी फळभाजी आहे ज्यामध्ये अनेक पोषक तत्त्व असतात. विशेष म्हणजे ब्रोकोलीमध्ये कॅरोटीनॉइड ल्युटीन नावाचे घटक आढळतात. सांधेदुखीपासून आराम मिळण्यासाठी या घटकाची विशेष मदत होते.

Women Health: योनीतुन होणाऱ्या स्रावाचा रंग कोणता असावा? गंभीर आजाराची प्रमुख लक्षणे वेळीच ओळखा

  • चेरी

चेरी हे फळ अँटिऑक्सिडंट्स आणि अँथोसायनिन्सचे उत्तम स्रोत आहेत. सांधे आणि स्नायूंमधील सूज कमी करण्यासाठी हे घटक कार्य करतात.

  • कच्ची हळद (आंबेहळद)

हळदीचे अनेक आयुर्वेदिक फायदे आहेत. भारतीय जेवणामध्ये याचा सर्रास वापर केला जातो. यामध्ये कर्क्यूमिन नावाचे रासायनिक घटक असते. यामुळे शरीरातील जळजळ कमी होते.

  • आले

भारतीय मसाल्यामध्ये आल्याचे महत्त्वाचे स्थान आहे. ग्रेव्हीपासून चहापर्यंत अनेक पदार्थांमध्ये आल्याचा वापर आवर्जून केला जातो. खोकला-कफ इत्यादी आजारांवरही आले प्रभावी असते. त्याचप्रमाणे आल्यामध्ये असणारे गुणधर्म सांधेदुखीवर प्रभावी ठरतात.

  • अखरोड

अखरोड हे अतिशय पौष्टिक फळ आहे. यामध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिडचे प्रमाणही जास्त असते. यामुळे शरीरातील वेदना कमी होतात. यामध्ये निरोगी चरबी, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. या गुणधर्मामुळे सांधेदुखी आणि जळजळीचे प्रमाण कमी होते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)