Best Lentil for Kidney Stones: आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीत अनेक लोकांना किडनीमध्ये स्टोन, सांध्यांमध्ये वेदना, वजनाचा त्रास किंवा डायबेटीससारख्या समस्या भेडसावत आहेत. अशा परिस्थितीत घरच्या स्वयंपाकघरातील एकच साधा पदार्थ तुमच्यासाठी वरदान ठरू शकतो, ज्यामुळे शरीरातील अनेक समस्या नैसर्गिक पद्धतीने नियंत्रित करता येतात.

एका डाळीमध्ये नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म आहेत. त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स कमी आणि प्रोटीन व फायबर जास्त प्रमाणात असते. त्यामुळे ही डाळ ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी व आरोग्यसंपन्न राहण्यासाठी उपयुक्त ठरते.  ही डाळ खाल्ल्याने फायबर, प्रोटीन, आयरन, फॉस्फोरस, व्हिटॅमिन सी मिळतं. हे पोषक तत्व ब्लड शुगर, भूक, हाडांची मजबुती कंट्रोल करण्यास मदत करतात. आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, डायबेटीज असणाऱ्यांसाठी ही डाळ नैसर्गिक उपाय म्हणून उपयोगी ठरू शकते तरी आधुनिक विज्ञानाने अजून पूर्ण पुष्टी केलेली नाही.

मूतखड्यासाठी फायदेशीर

आयुर्वेदानुसार ही डाळ शरीरातील मूतखडा हळूहळू विरघळवून बाहेर काढण्यास मदत करू शकते. पारंपरिक पद्धतीत याचा सूप किंवा रस नियमितपणे पिण्याची शिफारस केली जाते. मात्र, जर खडा मोठा असेल किंवा सतत वेदना होत असतील, तर फक्त घरगुती उपायांवर अवलंबून राहू न राहता, डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

कमी कार्ब आणि जास्त फायबर असल्यामुळे ही डाळ लांब वेळेपर्यंत पोट भरण्याची जाणीव ठेवते, त्यामुळे अनावश्यक भूक कमी होते आणि कॅलरीजचे सेवन नियंत्रित राहते. त्यामुळे लठ्ठपणाने त्रस्त लोक या डाळीचा समावेश डाएट प्लॅनमध्ये करतात.

सांध्यांमधील वेदनांवर लाभ

आयुर्वेदानुसार, ही डाळ वात रोगांमध्ये फायदेशीर ठरते. ती संधिवात, सांध्यांतील वेदना, कमर किंवा गुडघे सुजणे या समस्यांमध्ये आराम देते. त्याचे पाणी पचनशक्ती सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी करते.

कसे सेवन करावे?

ही डाळ सहजपणे उपलब्ध असून, ती सोप्या पद्धतीने वापरता येते. रात्री भिजवून उकळवून खाल्ल्यास किंवा त्याचे पाणी प्यायल्यास त्याचा जास्त फायदा होतो. ग्रामीण भागात ही डाळ नियमित आहाराचा भाग म्हणून घेतली जाते.

ही डाळ कुळीथ डाळ म्हणून ओळखली जाते. आयुष मंत्रालयाने या डाळीला सुपरफूड म्हणून मान्यता दिली आहे. ही डाळ मूत्रपिंडातील स्टोन विरघळवण्यासाठी, रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी व सांध्यातील वेदनांवर आराम मिळवण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून उपयुक्त ठरते.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)