Summer Diseases And How To Avoid Them : उन्हाचा कडाका वेगाने वाढतोय. या वाढत्या उष्णतेचा आपल्या शरीरावर अतिशय वाईट परिणाम होतो, त्यामुळे अनेक आरोग्य समस्या वाढतात. यामुळे या दिवसांत आरोग्याची काळजी घेणे आवश्यत असते. अचानक तापमानात वाढ झाल्याने शरीराला या बदलाशी जुळवून घेण्यास वेळ लागतो. खूप वेळ उन्हात राहिल्याने शरीराचे तापमान नियंत्रण करणारी यंत्रणा बिघडते. या समस्यांवर मदत करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.
सनबर्न
कडक उन्हामुळे सनबर्नचा त्रास होतो, अशाने त्वचा जळजळू लागते. अशावेळी त्वचेला त्वरित थंडावा देण्यासाठी कोरफडीचा गर लावू शकता, तसेच लालसरपणा कमी करण्यासाठी तुम्ही फ्रिज केलेली ग्रीन टीची बॅग लावू शकता.
डास चावणे
उन्हाळ्यात डासांची संख्या वेगाने वाढते, त्यामुळे घराबाहेर नैसर्गिक डास प्रतिबंधक फवारण्यांचा वापर करा आणि घराच्या जवळ किंवा कुड्यांमध्ये पाणी साचू देऊ नका. डासांच्या चावण्यामुळे होणारी तीव्र खाज कमी करण्यासाठी बेकिंग सोडा पेस्ट लावू शकता.
थकवा
उष्माघाताचा सामना करण्यासाठी इलेक्ट्रोलाइट्सचे योग्य सेवन करा. पुदिना आणि लिंबू पाणीदेखील शरीर थंड ठेवण्यास मदत करू शकते.
उन्हाळ्यात ताप
आलं आणि मधाचा चहा प्यायल्याने या समस्येपासून आराम मिळू शकतो. निलगिरीच्या तेलाने वाफ घेतल्यानेही आराम मिळू शकतो.
पचनाच्या समस्या किंवा पोट फुगणे
या समस्येवर उपाय म्हणून पुदिना आणि आल्याचा चहा प्या. याशिवाय प्रोबायोटिक्सकडेही लक्ष द्या.
डोकेदुखी
कडक उन्हातून परत आल्यावर होणाऱ्या डोकेदुखीवर उपाय म्हणून डायल्यूट केलेले पेपरमिंट तेल लावा. त्याच्या थंडाव्यामुळे आराम मिळेल. शरीरातील पाण्याची पातळी पुन्हा पूर्ववत करण्यासाठी थोडे मीठ घालून थंड लिंबू पाणी प्या.
निरोगी जीवनशैली
योग्य आहार, व्यायाम आणि विश्रांती घेऊन तुम्ही उन्हाळ्यात निरोगी राहू शकता आणि आनंदी आयुष्य जगू शकता.
ताजे आणि हलके अन्न खा
उन्हाळ्यात आहाराची खूप काळजी घ्यावी. हलके आणि सहज पचणारे पदार्थ खा.फळांचे सेवन करा, जास्तीत पाणी प्या, फायबरयुक्त आहार खा.
