होळीनंतर खरा उन्हाळा सुरु होतो असं म्हणतात. त्यात उन्हाळ्यात सगळ्यात जास्त कोणतं फळं खात असतील तर ते आहे कलिंगड. हे फळ आपल्या सगळ्यांसाठी एक वरदान आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत प्रखर उष्णतेने अंगाची लाही लाही होते, त्या वेळी कलिंगडाच्या सेवनाने शरीराला शीतलता प्राप्त होते आणि अतिघामामुळे निर्माण झालेला थकवा दूर होऊन उत्साह निर्माण होतो. मधुर, शीतल, तृष्णाशामक आणि उत्साहवर्धक अशा कलिंगडाला शास्त्रीय भाषेत ‘स्रिटलस व्हल्गॅरिस’ असे म्हणतात. मूळ आफ्रिकेतील असणारे हे फळ भारतात कर्नाटकमध्ये सर्वाधिक प्रमाणात तयार होते. त्याच्या अनेक जाती आपल्याकडे प्रचलित आहेत. चला तर जाणून घेऊयात कलिंगडाची औषधी गुणधर्म.

१. मूतखडा झाला असेल तर तो लघवीतून पडून जाण्यासाठी कलिंगडाचा रस सतत काही दिवस द्यावा. आम्लपित्ताचा त्रास होत असेल तर पित्त कमी करण्यासाठी कलिंगड खावे.

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
scorching heat
उन्हाच्या झळांनी हापूस आंबा काळवंडला; डाळिंब, द्राक्ष, भाजीपाल्यावर परिणाम
Health Special
Health Special: उन्हाळ्याची झळ – काय काळजी घ्याल ?

२. उन्हातून आल्यानंतर किंवा उष्णतेच्या विकाराने डोकेदुखीचा त्रास होत असेल तर गर काढलेल्या अध्र्या कलिंगडाची टोपी डोक्यात घालावी. डोकेदुखी थांबून शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो.

३. कलिंगडामध्ये टोमॅटोप्रमाणे लायकोपिनचे प्रमाण भरपूर असते. लायकोपिन अ‍ॅण्टिऑक्सिटेंट असल्यामुळे कर्करोग दूर ठेवायला उपयुक्त ठरते.

४. कलिंगड खाल्ल्याने त्यामध्ये असणारा चोथा व आद्र्रतेमुळे मलावरोधाची तक्रार कमी होऊन पोट साफ होते.

आणखी वाचा : बागेत खेळत असलेल्या चिमुरड्याला गरुडाने उचललं आणि…; बघा Viral Video

५. उष्माघातामुळे शरीराची आग होत असेल तर तसेच उष्णतेमुळे डोळ्यांची, तळपायांची आग होत असेल तर कापलेल्या टरबुजाची साल त्या भागावर ठेवावी. थोडय़ाच वेळात शरीराची आग कमी होते.

६. सौंदर्यवर्धनासाठीही कलिंगड उपयुक्त ठरते. कलिंगडाची साल चेहऱ्यावर चोळल्याने चेहऱ्यावरचा तजेला वाढतो.

७. कलिंगडाचे बी हे अतिशय पौष्टिक व चवदार असते. मुखशुध्दीसाठी बडिशेपमध्ये कलिंगडाचे बी वापरावे तसेच घरी बनवलेले लाडू, बर्फी यामध्येही या बीचा सजावटीसाठी वापर करावा. यापासून केलेले तेल हे पौष्टिक असते. त्याच्याही खाद्यपदार्थ म्हणून वापर करता येतो.

८. कलिंगडाचे बी टणक असल्यामुळे सोलायला कठीण असते. म्हणून थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करावे व त्याचा रस गाळणीतून गाळून घ्यावा व हे गाळलेले पांढरे दूध रश्श्याच्या भाजीत किंवा आमटीत घालावे. या बियांमध्ये प्रथिने, क्षार व शरीरास उपयुक्त असा मेद भरपूर प्रमाणात असतात व त्याचा आरोग्य चांगले राहण्यासाठी उपयोग होतो.

आणखी वाचा : चक्क झाडावर शिकारीचा थरार! माकड आणि बिबट्याच्या लपंडावात कोण मारणार बाजी? पाहा VIRAL VIDEO

९. कलिंगडाचा लाल गर काढल्यानंतर, सालीचा पांढरा गर हा फेकून न देता त्याचा वापर कोशिंबीर, थालीपीठ, कटलेट, भजी, धिरडे, भाजी यांमध्ये करावा.

१०. कलिंगडाची हिरवी साल स्वच्छ धुऊन बारीक किसून सांडगे बनविण्यासाठी वापरावी यामध्ये लोह, चोथा व ‘ब’ जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असते.

११. कलिंगडामध्ये पाणी व पोटॅशिअमचे प्रमाण हे सर्वात जास्त असते. त्यामुळे मूत्राशयाच्या व किडनीच्या तक्रारींवर व लघवीला जळजळ होत असेल तर कलिंगड खाल्ल्यास फायदा होतो.

१२. कलिंगडमध्ये लाइकोपिन असते. लाइकोपिनने आपली त्वचा तरुण राहते.

आणखी वाचा : या ३ अक्षराच्या मुली असतात भाग्यवान, लग्नानंतर ज्या घरात जातील तिथे होईल धनवर्षाव

१३. अपचन, भूक वाढवणे तथा रक्ताची कमतरता असेल तर कलिंगड खूप लाभदायी ठरते.

१४. कलिंगडचा पल्प ‘ब्लकहेड्स’ने प्रभावित झालेल्या जागेवर चोळा आणि एक मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या.

काय सावधानता घेतली पाहिजे?

कलिंगड हे फळ पिकल्यानंतर माठाखाली ठेवावे. पाण्याने ओले केलेले थंड कापड त्यावर टाकावे. त्यानंतर चार ते पाच तासांनी कलिंगड खावे. फ्रिजमध्ये ठेवून थंड केलेले कलिंगड खाऊ नये. तसेच एकदा कापलेले कलिंगड पुन्हा फ्रिजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खाऊ नये. कारण फळ कापल्यानंतर त्यातील पौष्टिक घटक कमी होतात, म्हणून ते लगेचच खावे. अनेक जण कलिंगड खाताना त्यात मीठ टाकून खातात; परंतु कलिंगडामध्ये नैर्सिगकरीत्याच सोडियम क्लोराइड, पोटॅशिअम हे क्षार असतात व मीठ टाकून या क्षारांचे प्रमाण अधिकच वाढते, म्हणून मीठ, साखर यांचा वापर न करता आहे. त्यामुळे नैर्सिगकस्थितीतील पिकलेले कलिंगड कापून लगेचच खावे. फ्रिजमध्ये कापून ठेवलेले शिळे कलिंगड खाल्ल्यास अनेक वेळा फूड पॉयझिनग (अन्न विषबाधा) होऊन जुलाब, उलटय़ा, ताप, सर्दी, खोकला हे आजार होतात.

कलिंगड खाताना लक्षात ठेवण्याची गोष्ट

कलिंगड खाऊन झाल्यावर एक तासभर पाणी पिऊ नका. नाही तर लाभ होण्याऐवजी शरीराला नुकसान होऊ शकते.

– डॉ. शारदा महांडुळे

मूळ लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा