scorecardresearch

Summer Tips: उन्हाळ्यात घरात थंडावा टिकवण्यासाठी ‘या’ टिप्स करा ट्राय!

उन्हाचा तडाखा वाढल्याने विजेची समस्याही वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे, अशा परिस्थितीत जोपर्यंत वीज आहे, तोपर्यंत कूलर किंवा एसीच्या मदतीने उन्हाळ्यावर मात करता येते.

खोलीत एका भांड्यात बर्फ ठेवा. काही मिनिटांतच खोलीचे तापमान खाली यायला सुरुवात होईल. (photo credit: jansatta)

उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत, तर यावर्षीच्या उन्हाळयाने सर्वांचेच हाल केले आहेत. सूर्याचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातच पार्‍याने तर तापमानाचा उच्चांक गाठला आहे. या महिन्यांत दिल्लीसह देशातील अनेक भागात दिवसा तापमान ४८ अंश सेंटीग्रेडपर्यंत पोहोचते. सध्या तर अशी परिस्थिति आहे की आपण एसी/ कूलर शिवाय राहूच शकत नाही. त्यात पंखा तो तर सुरू काय आणि बंद काय सारखाच आहे. त्याचबरोबर उन्हाचा तडाखा वाढल्याने विजेची समस्याही वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे, अशा परिस्थितीत जोपर्यंत वीज आहे, तोपर्यंत कूलर किंवा एसीच्या मदतीने उन्हाळ्यावर मात करता येते, मात्र त्यानंतर वीज गेली, पर्यायी उपाय शोधण्याची गरज आहे.

तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याद्वारे घर नैसर्गिकरित्या थंड ठेवता येते. या उन्हाळ्यात कोणत्या खास मार्गांनी तुम्ही स्वतःला फ्रेश ठेवू शकता ते जाणून घ्या.

उन्हाळ्यात तुमचे घर थंड ठेवण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

आजकाल लोकं काचेच्या बंद घरांमध्ये राहतात, उंच इमारतींमध्ये काचेच्या बंद घरांमध्ये इतर घरांपेक्षा जास्त उष्णता जाणवते. म्हणून, सर्वप्रथम घराच्या खिडक्यांपासून सुरुवात करा, क्रॉस वेंटिलेशनला प्रोत्साहन द्या आणि हिवाळ्यात उपयुक्त असलेल्या जड वस्तू काढून टाका किंवा स्टोअररूममध्ये कुठेतरी ठेवा. घरामध्ये पडदे वापरा ज्यामुळे हवा सहजतेने जाऊ शकेल आणि शक्यतो तुमचा एक्झॉस्ट फॅन वापरा.

खोली थंड करण्यासाठी काय करावे?

एसीशिवाय खोली थंड करणे ही काही मोठी गोष्ट नाही, काही टिप्स ट्राय केल्या तर खोली पूर्णपणे थंड होईल, जणू एसी चालू आहे. बाजारातून तुमच्या घरातील एक चादर घ्या आणि ती दारावर लटकवा व भिजवा. त्यामुळे थंड हवा मिळेल. यासोबतच रात्री खोलीत एका भांड्यात बर्फ ठेवा. काही मिनिटांतच खोलीचे तापमान खाली यायला सुरुवात होईल. खोलीत टेबल फॅन असेल तर त्याच्या समोर बर्फाने भरलेले भांडे ठेवा. मग बघा काही मिनिटांत रूम थंड होईल.

नारळ पाणी आणि ताक याचे सेवन करा

उन्हाळ्यातच घर थंड ठेवण्यासोबतच उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी ताक आणि नारळपाणी सेवन करायला हवे. ताकामध्ये लॅक्टिक ऍसिड असते जे त्वचेसाठी तसेच पचनासाठी खूप फायदेशीर असते. तर दुसरीकडे नारळ पाणी प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. यामध्ये कॅल्शियम, क्लोराईड आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Summer tips keep the house naturally cool in summer all you have to do is do this work scsm

ताज्या बातम्या