How to Control Expenses While Traveling: उन्हाळ्यात अनेक जण ट्रिपचा प्लॅन करतात. मुलांना शाळांच्या सुट्या पडल्याने फॅमिली ट्रिपचा प्लॅन केला जातो. अशा वेळी रोजच्या धावपळीपासून दूर नवीन सुंदर ठिकाणांचा शोध घेतला जातो. एकदा का ठिकाणं फायनल झाली की, बॅग भरून निघण्याची तयारी करतो. अशा प्रकारे ट्रिपसाठी जेव्हा आपण प्रवास सुरू करतो, तसा आपला बजेट हाताबाहेर जाऊ लागलो. कारण- आपण बजेट ठेवतो त्यापेक्षा जास्त खर्च होतो. अशा वेळी काय करायचे सुचत नाही आणि मग एका छोट्या चुकीमुळे संपूर्ण ट्रिपचे बजेट बिघडते. त्यामुळे तुम्हीही कधी ट्रिपला जाणार असाल, तर पैशांच प्लॅनिंग करण्यासाठी तुम्ही खालील टिप्स फॉलो करू शकता.

ही चूक तुम्ही करू नका?

खर्चाचं तिथे गेल्यावर बघू, असा विचार करून आपण प्रवासाला निघतो. अशा वेळी आपण हॉटेल बुकिंग, तिकीट बुकिंग करीत नाही. एक ठरावीक रक्कम आपल्याबरोबर ठेवतो; पण ती कशी कुठे खर्च करायची याचा काहीच प्लॅन नसतो. प्रवासाचा हिशोब ठेवत नाही. खाण्यापिण्यावर किती खर्च करायचा याचा काही प्लॅन करीत नाही. मग अशा वेळी प्रत्येक गोष्टीसाठी जास्त पैसे मोजावे लागतात.

ट्रिपला जाताना बजेट का बिघडतं?

१) नियोजनाशिवाय खर्च वाढवणे

जेव्हा तुम्ही आधीच माहिती न घेता, ऐन वेळी महागडी हॉटेल्स, टॅक्सी आणि रेस्टॉरंट्स निवडता. त्यामुळे तुमचे बजेट पूर्णपणे बिघडते.

२) ट्रिप म्हटल्यावर खर्च होणारच, असे समजून खर्च करणे

कधी कधी आपल्याला वाटतं, “आपण फिरायलाच आलो आहोत, तर खर्च करायला काय हरकत आहे?” याच विचारामुळे तुम्ही नकळतपणे जास्त पैसा खर्च करता.

३) लहान खर्चांकडे दुर्लक्ष करणे

कॉफी, नाश्ता, प्रवेश तिकिटे, स्थानिक वाहतूक व्यवस्था या लहानसहान खर्चांची बेरीज केल्यास एक मोठा खर्च होतो. त्यामुळे त्याबाबत आधीच नियोजन करणे नेहमीच अधिक सुरक्षित असते.

४) रोख आणि डिजिटल बॅलन्सचे चुकीचे व्यवस्थापन

जेव्हा तुम्ही तुमच्या खर्चाची योग्य पद्धतीने नोंद ठेवत नाही, तेव्हा किती पैसे कुठे खर्च होत आहेत हे तुम्हाला कळू शकत नाही. त्यामुळे ???केलेला खर्च कुठेतरी नोट करणे (की- केलेल्या खर्चाची वेळोवेळी कुठेतरी नोंद करून ठेवणे)??? महत्त्वाचे आहे.

ट्रिपला जाण्यापूर्वी ‘या’ गोष्टी कराच?

१) आगाऊ नियोजन आवश्यक

फिरायला जाण्याआधी हॉटेल्स, वाहतूक आणि महत्त्वाच्या स्थळांबद्दल माहिती घ्या. आधीच कुठे कुठे फिरणार आहात ते लक्षात घेऊन, त्यानुसार तेथील हॉटेल बुक करून ठेवा. ट्रान्स्पोर्टची काय व्यवस्था आणि त्याचा खर्च पाहा, स्वत:चे वाहन घेऊन जाणार असाल, तर आधी पेट्रोल पंप कुठे कुठे आहेत, याची माहिती घ्या. त्यामुळे अनपेक्षित खर्च कमी होतो.

२) किती दिवस राहणार त्यानुसार खर्चाचे बजेट ठरवा

प्रत्येक दिवसासाठी खर्चाची एक मर्यादा निश्चित करा. त्यामुळे अनावश्यक खर्च आपोआप नियंत्रणात येतील.

३) खर्चाची नोंद ठेवा

मोबाईलमधील नोट्स किंवा ॲपमध्ये प्रत्येक खर्च लिहून ठेवा. त्यामुळे किती खर्च झाला आहे याचा हिशोब ठेवण्यास मदत होते.

४) गरजा आणि आवड यांतील फरक समजून घ्या.

फिरायला जाताना कुठे काही वेगळी गोष्ट दिसली की, ती आवडली म्हणून लगेच विकत घेऊन नका, तुम्हाला त्याची खरंच गरज आहे का याचा आधी विचार करा. कारण- त्यामुळेच अधिक पैसा खर्च होतो.

प्रवासाला निघण्यापूर्वी खर्चाचे छोटे नियोजन करा

१) आगाऊ बुकिंग करून पैसे वाचवा.
२) स्थानिक वाहतुकीचा वापर करा.
३) अनावश्यक खरेदी टाळा.
४) नेहमी थोडे जास्तीचे बजेट ठेवा.

तणावमुक्त होऊन त्याचा आनंद घेऊ शकता. जर तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला तडजोड करावी लागली, तर प्रवासाचा हवा तसा आनंद घेता येत नाही आणि मग त्याबाबत कायमची रुखरुख लागून राहते.