scorecardresearch

Sun Transit 2022 : सूर्य मकर राशीत प्रवेश करणार, या ३ राशींना सरकारी नोकरी मिळू शकते

नवीन वर्ष २०२२ सुरू होण्यासाठी काही दिवस उरले आहेत. १४ जानेवारी २०२२ रोजी सूर्य देव मकर राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य देवाचं राशी परिवर्तन तीन राशीच्या लोकांसाठी खूप शुभ आणि चांगले परिणाम देणारं आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या तीन राशी…

sun-transit-2022

नवीन वर्ष २०२२ सुरू होण्यासाठी काही दिवस उरले आहेत. मागील वर्ष कसे गेले हे महत्त्वाचे नाही, परंतु येणारं नवीन वर्ष सर्वांसाठी चांगलं आणि त्यांच्या आयुष्यात खूप आनंद घेऊन येवो, अशी प्रत्येकाची इच्छा असते. करोनाच्या काळात ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत त्यांनाही नवीन वर्षाकडून खूप अपेक्षा ठेवल्या आहेत.

ज्योतिष शास्त्रानुसार १४ जानेवारी २०२२ रोजी सूर्य देव मकर राशीत प्रवेश करणार आहे. जेव्हा जेव्हा एखाद्या ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. सूर्य देव एका राशीत सुमारे ३० दिवस राहतो. सूर्य देवाचं राशी परिवर्तन तीन राशीच्या लोकांसाठी खूप शुभ आणि चांगले परिणाम देणारं आहे आणि या राशीच्या लोकांना नशिबाचीही पूर्ण साथ मिळेल. तसंच या लोकांना सरकारी नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे.

मेष : सूर्याचे हे संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी चांगले राहील. कामाच्या ठिकाणी प्रचंड वाढ आणि यश मिळेल. यावेळी सूर्याचा इतर तीन ग्रहांशी संयोग होईल, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक कार्य पूर्ण करू शकाल. जे नोकरदार लोक नोकरी बदलण्याचा विचार करत होते, त्यांच्यासाठीही वेळ चांगली जाईल. या दरम्यान तुम्हाला सरकारी नोकरीही मिळू शकते. मंगळ हा मेष राशीचा स्वामी आहे आणि मंगळ हा सूर्य देवाचा मित्र आहे. त्यामुळे मंगळ राशीच्या लोकांसाठी सूर्याचे भ्रमण फलदायी ठरणार आहे.

आणखी वाचा : Wedding Tips : लग्नात चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवा आहे? मग हे ८ सोपे उपाय एकदा नक्की वापरा !

सिंह: सूर्य तुमच्या स्वतःच्या राशीचा स्वामी आहे आणि संक्रमणाच्या या काळात तो तुमच्या सहाव्या भावात असेल. सूर्याच्या भ्रमणाचा हा काळ विद्यार्थ्यांसाठी उत्तम ठरेल. सिंह राशीतही धन योग तयार होत आहेत. विशेषत: शासकीय किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले निकाल मिळू शकतील. जे लोक नोकरी बदलण्यास इच्छुक आहेत, त्यांच्यासाठीही काळ चांगला राहील. सरकारी नोकरीच्या इच्छा पूर्ण होण्याची जोरदार चिन्हे आहेत. व्यवसायाच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही चांगला नफा मिळेल.

आणखी वाचा : या ४ राशीच्या मुली पती आणि सासरच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरतात

धनु: या संक्रमणादरम्यान सूर्य तुमच्या दुसऱ्या घरात बसेल. ज्याने तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. यासोबतच तुमच्या राशीत धन योगही तयार होतील. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आर्थिक जीवनात चांगला नफा मिळेल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या या राशीच्या लोकांना यश मिळण्याची दाट शक्यता आहे. जे नोकरी करत आहेत, त्यांना करिअरमध्ये प्रचंड वाढ होईल, पगार वाढण्याची दाट शक्यता आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-12-2021 at 20:59 IST

संबंधित बातम्या