सध्या बेरोजगारी भरपूर आहे आणि त्यातही नोकऱ्या कमी असल्याने युवकांना रोजगार मिळवण्यासाठी खूप परिश्रम करावे लागत आहेत. त्यात फ्रशर असल्यास नोकरी लवकर मिळत नाही. कारण कंपन्या अनुभव असलेल्या लोकांना नोकरीवर ठेवण्याला प्राधान्य देतात. पण, आता फ्रेशरना निराश होण्याची गरज नाही. एका सर्व्हेनुसार कंपन्यांना फ्रेशरकडून काही गोष्टी अपेक्षित आहेत. त्या पूर्ण केल्यास नोकरी मिळण्याची संधी वाढू शकते.

ग्लोबल एज्युकेशन सेक्टरवर संशोधन करणाऱ्या क्वाक्वेरेली सायमंड्सने हा सर्वे केला आहे. त्यानुसार, कम्युनिकेशन, टीम वर्क, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि फ्लेक्जिबिलिटी ही काही कौशल्ये नोकरी देणाऱ्यांना पदवीधारकांकडून अपेक्षित आहे. ही माहिती मिळवण्यासाठी जगातील विविध उद्योग आणि संस्थांमधील सुमारे २६ हजार ७४२ नियोक्त्यांना फ्रेशरकडून अपेक्षित असलेल्या कौशल्यांची यादी देण्याचे सांगण्यात आले होते. त्यातून ही माहिती मिळाली.

(शौचाशी संबंधित ‘या’ समस्या दूर होण्यास मदत करते तूप, जाणून घ्या इतर फायदे)

फ्रेशरमध्ये कोणती कौशल्ये गरजेची?

सर्व्हेमधील ५६ टक्के कंपन्या या आशिया – प्रशांत क्षेत्रातील, २८ टक्के युरोपमधील, तर १० टक्के आफ्रिका आणि मध्य पूर्व क्षेत्रातील होत्या, तर बाकी कंपन्या या उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतील होत्या. या कंपन्यांनी फ्रेशरमध्ये कम्युनिकेश, टीम वर्क, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि फ्लेक्जिबिलिटीची अपेक्षा ठेवली आहे.

अहवालानुसार, कंपन्यांकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा काही नवीन नाही. टीममध्ये सकारात्मक मुक्त संवाद, समस्या सोडवण्याची वृत्ती, कामाबाबत वचनबद्धता आणि आशावादी विचार असण्यासाठी अपेक्षित कौशल्ये गरेजेची आहेत. नवीन उद्योगांना ही कौशल्ये हवी असल्याने ती माहिती असणे गरजेची आहे.

(सहज उपलब्ध असणारे ‘हे’ द्रव्य उच्च रक्तदाब नियंत्रणात आणू शकते)

कंपन्या या गोष्टींपासून समाधानी

पदवीधारकांच्या तांत्रिक साक्षरतेपासून ते अधिक समाधानी असतात. कम्युनिकेशन, टीमवर्क, फ्लेक्जिबिलिटी आणि समस्या सोडवण्याच्या कौशल्याव्यतिरिक्त आशिया – प्रशांत क्षेत्रातील कंपन्या इंटरपर्सनल स्किल, कर्मशियल अवेयरनेस आणि बोलण्याच्या कौशल्याला देखील महत्व देतात.