अभिनेत्री सुष्मिता सेनचे केवळ सौंदर्यच नाही तर फिटनेसचेही आहेत चाहते, जाणून घ्या ‘हा’ फिटनेस मंत्र

अभिनेत्री सुष्मिता सेन ही अभिनेत्री तिच्या शारीरिक तंदुरुस्तीसोबतच तिच्या मानसिक आरोग्याची विशेष काळजी घेते.

lifestyle
सुष्मिताला कार्डिओ व्यायाम आणि ध्यानासोबतच पोहणे देखील आवडते. (photo: indian express)

मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनचा जन्म १९ नोव्हेंबर १९७५ रोजी हैदराबादमध्ये झाला. आज त्यांचा वाढदिवस आहे. सुष्मिता सेन केवळ दिसायलाच सुंदर नाही, तर तिचे शब्दही लोकांना भुरळ पाडतात. तरुणाईलाही तिचं हसणं, सौंदर्य आणि तिचा फिटनेस याची खात्री पटली आहे. ती किती फिटनेस फ्रीक आहे हे सुष्मिता सेनच्या प्रत्येक चाहत्याला माहित असेलच. वाढत्या वयातही अभिनेत्री तरूण दिसते आणि त्यासाठी ती खूप मेहनतही करतात.

सुष्मिता सेन ही अभिनेत्री तिच्या शारीरिक तंदुरुस्तीसोबतच तिच्या मानसिक आरोग्याची विशेष काळजी घेते. ती अनेकदा तिच्या हेल्थ-फिटनेसशी संबंधित व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. आज सुष्मिता सेनच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या तिचा ‘फिटनेस मंत्र’

अशा प्रकारे सुष्मिता स्वतःला ठेवते फिट

स्विमिंग करून स्वतःला ठेवा फिट

सुष्मिताला कार्डिओ व्यायाम आणि ध्यानासोबतच पोहणे देखील आवडते. पोहल्याने कॅलरीज बर्न होतात आणि वजन संतुलित राहते.

मेडिसिन बॉल प्लांक (Medicine Ball Plank)

या व्यायामामुळे तुमच्या शरीराचे संतुलन सुधारते आणि शरीर तंदुरुस्त राहते. सुष्मिताचा ‘मेडिसिन बॉल प्लँक’ तुम्ही व्हिडीओ नक्की पहा.

शिरशासन

शिरशासनामुळे मेंदूतील रक्ताभिसरण वाढते. यासोबतच शरीराला ताकद मिळते. बर्थडे गर्ल फिट राहण्यासाठी हे करते.

पुशअप्स

तुम्ही दररोज पुशअप्स केल्याने तुमचे संपूर्ण शरीर तंदुरुस्त राहते आणि हातांचे स्नायू देखील टोन होतात. त्याचबरोबर त्यांना बळकटी देखील मिळते. मिस युनिव्हर्स व अभिनेत्री सुष्मिता सेनचेही हेच फिटनेस सिक्रेट आहे.

डान्स

अभिनेत्री सुष्मिता सेनलाही डान्स करायला खूप आवडतो. नृत्यामुळे शरीर तर निरोगी राहतेच, पण मूडही सुधारतो. तुम्ही सुश्मिता सेनला नाचताना पाहून तुम्हालाही नाचल्यासारखे वाटेल. याशिवाय सुष्मिता सेन ‘शिव मंत्र’ किंवा ‘शिवांचा ताल’ देखील अतिशय काळजीपूर्वक ऐकते. पावसात या धूनवर नाचतानाचा एक व्हिडीओही तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सुष्मिता सेनच्या फिटनेस बद्दल आणखीन सांगायच झालं तर, सुष्मिता जिम, ध्यान आणि नियमित व्यायाम-योगासोबत योग्य प्रमाणात योग्य पोषणही घेते. स्वतःला हायड्रेट ठेवणे आणि पुरेशी झोप घेणे हे देखील तिच्या फिटनेसचे रहस्य आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sushmita sen has not only beauty but also fitness fans know the fitness mantra scsm

Next Story
अकाली जन्मणा-या बाळांच्या फुप्फुसांच्या रक्षणासाठी हळद उपयोगी
ताज्या बातम्या