Swine Flu Symptoms: भारतात पुन्हा एकदा स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. झारखंड, दिल्ली, महाराष्ट्र, केरळ, मिझोराम या राज्यांमध्ये गेल्या एका महिन्यात स्वाइन फ्लूचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. बहुतेक लोक कोविड चाचणी घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचत आहेत. स्वाइन फ्लू आणि कोविडची लक्षणे सारखीच असल्याने लोकांमध्ये याबाबत संभ्रम असल्याचे डॉक्टर म्हणत आहेत.

तसंच, ही देखील चिंतेची बाब आहे, कारण रुग्ण कोविडची लक्षणे घेऊन येत आहेत आणि त्यांची चाचणी नकारात्मक असल्यास त्यांना परत पाठवले जात आहे. त्यामुळे कोविड १९ चाचणी निगेटिव्ह आल्यास रुग्णाची H1N1 चाचणीही करावी.

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Clean Intestine In 20 Minutes In Morning With These Simple Five Asanas How Much Luke Warm Water To Drink First After Waking Up
Video: सकाळी उठताच १५ मिनिटांत पोट स्वच्छ होण्यासाठी करा ‘या’ पाच कृती; कोमट पाणी पिण्याचं प्रमाणही पाहा
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता

स्वाइन फ्लू काय आहे?

मेयो क्लिनिकच्या मते, H1N1 फ्लू, ज्याला स्वाइन फ्लू देखील म्हणतात, हा फ्लूच्या H1N1 स्ट्रेनमुळे होतो. H1N1 हा इन्फ्लूएंझा-ए व्हायरसचा एक प्रकार आहे. तर H1N1 हा फ्लूच्या अनेक प्रकारांपैकी एक आहे ज्यामुळे मौसमी फ्लू होऊ शकतो.

( हे ही वाचा; टोमॅटो फ्लूपासून मुलांना वाचवण्यासाठी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी वेळीच जाणून घ्या; धोका लवकर कमी होईल)

स्वाइन फ्लू ची कारणे

स्वाइन फ्लू हा इन्फ्लूएंझा विषाणूच्या ताणामुळे होतो, जो सामान्यतः डुकरांना संक्रमित करतो. टायफसच्या विपरीत, हा विषाणूजन्य संसर्ग टिक्सद्वारे पसरतो. हे सहसा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होते. प्राण्यांपासून माणसात नाही होत नाही. अत्यंत संसर्गजन्य स्वाइन फ्लू लाळ आणि श्लेष्माच्या कणांमुळे पसरतो.

  • शिंकणे
  • खोकल्याने
  • दूषित पृष्ठभागाला स्पर्श करणे आणि नंतर त्याच हातांनी डोळ्यांना किंवा नाकाला स्पर्श करणे

विशेषतः, ज्या लोकांना याची लागण झाली आहे त्यांना लक्षणे जाणवण्यापूर्वीच इतरांना संसर्ग होऊ शकतो. तसेच, आजारी पडल्यानंतर सात दिवसांपर्यंत त्याचा प्रसार होऊ शकतो. त्याच वेळी, मुले १० दिवसांपर्यंत संसर्गजन्य असू शकतात.

( हे ही वाचा: Coronavirus: भविष्यात करोनाचे आणखी संसर्गजन्य प्रकार येऊ शकतात; जाणून घ्या WHO दिलेली चेतावणी)

स्वाइन फ्लूची लक्षणे

स्वाइन फ्लूची लक्षणे ही सीझनल फ्लूसारखीच असतात.

  • खोकला
  • ताप
  • घसा खवखवणे
  • वाहणारे किंवा बंद नाक
  • अंगदुखी
  • डोकेदुखी
  • थंडी वाजून येणे
  • थकवा

जर तुम्हाला स्वाइन फ्लूची लागण झाली असेल तर तुम्हाला वर नमूद केलेली लक्षणे जाणवतीलच असे नाही. न्यूमोनिया, फुफ्फुसाचा संसर्ग आणि इतर श्वासोच्छवासाच्या समस्यांसारख्या लक्षणांसह हा संसर्ग अधिक गंभीर असू शकतो.