जन्माष्टमीचा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी लोक भगवान श्रीकृष्णाची पूजा करतात आणि उपवास करतात. हे व्रत फलदायी आहे. असे मानले जाते की, या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याने संतती सुख मिळते, जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रगती होते आणि वैवाहिक जीवन आनंदाने भरते. अशा परिस्थितीत ज्यांना उपवास ठेवण्यास त्रास होतो त्यांनी काय करावे जेणेकरून ते दिवसभर उत्साही राहतील? आज आपण, उपवास करताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.

  • फळांचे सेवन करा

उपवासाच्या दरम्यान दिवसभर उत्साही राहण्यासाठी तुम्ही फळांचे सेवन करू शकता. फळे पोषक आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. ते रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास आणि पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही.

आहारातील चवळीचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? अनेक गंभीर आजारांवर आहे प्रभावी

  • फळांचा रस

तुम्ही जन्माष्टमीच्या दिवशी फळांचा रस पिऊ शकता. हा ऊर्जेचा चांगला स्रोत आहे. यामुळे शरीरात ताकद टिकून राहते. हे तुम्हाला हायड्रेटेड ठेवते. उपवासात जास्त चहा घेणे टाळा. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने आरोग्याला हानी पोहोचते.

  • सुका मेवा

उपवासात अशक्तपणा आणि थकवा जाणवत असेल तर तुम्ही सुका मेवा खाऊ शकता. ते पोषक तत्वांनी समृद्ध असतात आणि तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवण्यास मदत करतात. सुका मेवा तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात.

Photos : ड्रायफ्रुट्स खाऊन करा दिवसाची सुरुवात; होतील अनेक आश्चर्यकारक फायदे

  • दही

उपवासाच्या वेळी तुम्ही दही सेवन करू शकता. त्यात चांगले बॅक्टेरिया असतात. ते पचनसंस्था निरोगी ठेवतात. उकडलेल्या बटाट्यासोबतही दह्याचे सेवन करता येते. त्याचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे तुम्हाला ऊर्जावान ठेवण्यास मदत करेल.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)